शहरं
Join us  
Trending Stories
1
अपक्ष उमेदवार तेजल पवार यांचा राहुल नार्वेकरांवर धक्कादायक आरोप; 'बिनविरोध'साठी घडला थरार?
2
"हिंदुत्व विरोधी काँग्रेसची भाजपानं घेतली साथ, आता महापालिकेत परिणाम भोगा" शिंदेसेना संतप्त
3
महापुरुषांच्या फोटोसमोर महिलेला नाचवलं, उद्धवसेनेकडून 'तो' व्हिडिओ ट्विट; भाजपाचा पलटवार
4
Navi Mumbai: नवी मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्या 'या' भागांत ७ तास पाणीपुरवठा राहणार बंद
5
केंद्र सरकारचा 'X' ला शेवटचा इशारा! 'Grok AI' मधील अश्लील मजकूर हटवण्यासाठी दिली डेडलाइन
6
अजबच! इथे भाजपाने चक्क काँग्रेससोबत केली युती, मित्रपक्षाला बाहेर ठेवण्यासाठी जुळवलं समीकरण 
7
"वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही, अजित पवारांनी..."; देवेंद्र फडणवीसांचे सडेतोड मत
8
Video: अपघाताने हात हिरावले, पण स्वप्ने नाही; रत्ना तमंगची कहाणी ऐकून जजेस झाले भावूक..!
9
खरंच किंग कोहलीनं पळ काढला? संजय मांजरेकरांचं कसोटीतील ‘विराट’ निवृत्तीवर मोठं वक्तव्य, म्हणाले…
10
भारत फिरायला आली अन् 'इथलीच' होऊन गेली; चक्क ऑटो ड्रायव्हरच्या प्रेमात पडली परदेशी तरुणी!
11
एक खुलासा आणि रिलायन्सचे शेअर्स धडाम! एका दिवसात १ लाख कोटी स्वाहा; गुंतवणूकदारांनी काय करावे?
12
'गजवा-ए-हिंद'साठी पाक फौजा तयार, लष्कर ए तैयबाने पुन्हा भारताविरोधात ओकली गरळ, थेट मोदींना धमकी
13
फक्त एका कुपनच्या जोरावर जगाला लुटणारा 'महाठग'; आजही त्याच मॉडेलवर चालतात मोठमोठे स्कॅम
14
युद्ध पेटणार? US विरोधात ७ देश एकवटले, ट्रम्प यांना केले सतर्क; ग्रीनलँडला दिली होती धमकी
15
साखरपुडा झाला, पूजेसाठी घरी आला आणि होणाऱ्या पत्नीवर दोन वेळा बलात्कार केला; छत्रपती संभाजीनगरमधील तरुणावर गुन्हा
16
"मी राजसाहेबांना डायरेक्ट बोललो, याला तिकीट देऊ नका, कारण..."; आमदार महेश सावंतांचा गंभीर दावा
17
बंटी जहागीरदार कुठे पोहोचला? हत्या करणाऱ्यांना लोकेशनची माहिती देणाऱ्या दोघांना अटक, पोलिसांनी कसे शोधले?
18
Vijay Hazare Trophy : देवदत्त पडिक्कलचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज
19
काहीही केलं तरी वजन कमीच होईना... 'रताळं' ठरेल सुपरफूड; 'ही' आहे खाण्याची योग्य पद्धत
20
"आम्ही सुधारणार नाही’ हीच निवडणूक आयोगाची भूमिका"; 'बिनविरोध'च्या मुद्द्यावर काँग्रेसची टीका
Daily Top 2Weekly Top 5

Angaraki Sankashti Chaturthi 2026: अंगारक संकष्ट चतुर्थी गणेश पूजन विधी, चंद्रोदय वेळ, शुभ मुहूर्त, राहु काळ कधी? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 11:18 IST

Angaraki Sankashti Chaturthi 2026 Chandrodaya Time: मंगळवारी ०६ जानेवारीला सन २०२६ या वर्षीची पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी आहे. सविस्तर जाणून घ्या...

Paush Angaraki Sankashti Chaturthi January 2026: इंग्रजी नववर्ष २०२६ सुरू झाले आहे. मराठी वर्षाचा पौष महिना सुरू आहे. नववर्षाची सुरुवात होताच अनेक शुभ योग जुळून आलेले आहेत. विघ्नहर्ता, सुखकर्ता गणपती बाप्पाची कृपा लाभावी, यासाठी विविध उपासना केल्या जातात. यामध्ये चतुर्थी व्रताचरण विशेष शुभ फलदायी मानले गेले आहे. २०२६ या नववर्षातील पहिल्या संकष्ट चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे. काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया...

२०२६ची पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी: ३ गोष्टी करा, बाप्पा संकट दूर करेल; सगळे मनासारखे होईल!

कोणत्याही कार्याची सुरुवात प्रथमेश गणपती स्मरण, पूजनाने केली जाते. जे कार्य हाती घेतलेले आहे, ते निर्विघ्नपणे पार पडावे, अडथळे, संकटे, समस्या, अडचणी दूर होऊन कार्यसिद्धी यशस्वी व्हावी, यासाठी गणपतीचे आवाहन केले जाते. गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत! गणपती हाच सृष्टीचा निर्माण कर्ता असल्याचे मानले जाते. तोच ब्रह्म आहे, विष्णू आहे, रुद्र आहे, इंद्र आहे, असे सांगितले जाते. तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोड-धोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे. गणपती बुद्धीची देवता आहे. गणपती ही वैश्विक देवता आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. विविध कलांच्या अविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. यामुळेच देवत्व असलेला गणपती जवळचा आणि आपल्यातलाच वाटतो. पौष महिन्यातील संकष्ट चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे.

पौष महिन्यात अंगारक संकष्ट चतुर्थी

अंगारकी संकष्टी चतुर्थी हा योग वारंवार येत नाही. मंगळवारी चतुर्थी आली की, अंगारक योग जुळून येतो. अंगारक म्हणजे मंगळ ग्रह, जो निखाऱ्यासारखा लालभडक दिसतो. त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेशमंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली. त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला की, 'माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती, म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल! मुद्गल पुराणात तसेच गणेश पुराणात याचे संदर्भ आढळून येतात. अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरदविनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत केले जाते.

संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ

प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे. प्रत्येक संकष्टीला गणेशभक्त आपापल्या परिने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत-पूजत असतात. संकष्ट चतुर्थीचे व्रत फार प्राचीन आहे. गेली हजारो वर्षे हे व्रत भारतवर्षात अगदी निष्ठेने पाळले जाते. यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते. कोट्यवधी गणेश भक्त या दिवशी उपवास करतात. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो, अशी मान्यता आहे. संकष्ट चतुर्थीचे व्रत कोणालाही करता येते. मंगळवार, ०६ जानेवारी २०२६ रोजी अंगारक संकष्ट चतुर्थी आहे. या दिवशी दुपारी ०३ वाजेपासून ते सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत राहु काळ आहे. 

अंगारक संकष्ट चतुर्थी व्रताचा सोपा विधी

संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. यानंतर फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणपती बाप्पाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे.

रात्री चंद्रोदय झाल्यावर चंद्राला अर्घ्य अवश्य द्यावे

रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप, दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य  द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा. संकष्टीच्या दिवशी गणेशाला जास्वंदाचे फूल आणि दुर्वांची जुडी अवश्य अर्पण करावी, असे सांगितले जाते. अगदी काहीच शक्य नसल्यास एकदा तरी भक्तिभावाने अथर्वशीर्ष म्हणावे अथवा श्रवण करावे. चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपास सोडू नये, असे म्हटले जाते. 

अंगारक संकष्ट चतुर्थी जानेवारी २०२६ विविध शहरांतील चंद्रोदय वेळ (Angaraki Sankashti Chaturthi January 2026 Moonrise Time)

शहरांची नावेचंद्रोदयाची वेळ
मुंबईरात्रौ ०९ वाजून २२ मिनिटे
ठाणेरात्रौ ०९ वाजून २० मिनिटे
पुणेरात्रौ ०९ वाजून १७ मिनिटे
रत्नागिरीरात्रौ ०९ वाजून २१ मिनिटे
कोल्हापूररात्रौ ०९ वाजून १८ मिनिटे
सातारारात्रौ ०९ वाजून १८ मिनिटे
नाशिकरात्रौ ०९ वाजून १६ मिनिटे
अहिल्यानगररात्रौ ०९ वाजून १३ मिनिटे
धुळेरात्रौ ०९ वाजून ११ मिनिटे
जळगावरात्रौ ०९ वाजून ०८ मिनिटे
वर्धारात्रौ ०८ वाजून ५५ मिनिटे
यवतमाळरात्रौ ०८ वाजून ५८ मिनिटे
बीडरात्रौ ०९ वाजून ०९ मिनिटे
सांगलीरात्रौ ०९ वाजून १६ मिनिटे
सावंतवाडीरात्रौ ०९ वाजून २० मिनिटे
सोलापूररात्रौ ०९ वाजून १० मिनिटे
नागपूररात्रौ ०८ वाजून ५३ मिनिटे
अमरावतीरात्रौ ०८ वाजून ५८ मिनिटे
अकोलारात्रौ ०९ वाजून ०२ मिनिटे
छत्रपती संभाजीनगररात्रौ ०९ वाजून १० मिनिटे
भुसावळरात्रौ ०९ वाजता ०७ मिनिटे
परभणीरात्रौ ०९ वाजून ०४ मिनिटे
नांदेडरात्रौ ०९ वाजून ०२ मिनिटे
धाराशीवरात्रौ ०९ वाजून ०९ मिनिटे
भंडारारात्रौ ०८ वाजून ५० मिनिटे
चंद्रपूररात्रौ ०८ वाजून ५३ मिनिटे
बुलढाणारात्रौ ०९ वाजून ०६ मिनिटे
मालवणरात्रौ ०९ वाजून २२ मिनिटे
पणजीरात्रौ ०९ वाजून २१ मिनिटे
बेळगावरात्रौ ०९ वाजून १८ मिनिटे
इंदौररात्रौ ०९ वाजून ०४ मिनिटे
ग्वाल्हेररात्रौ ०८ वाजून ५१ मिनिटे

॥ गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ॥

English
हिंदी सारांश
Web Title : Angaraki Sankashti Chaturthi, January 6th: Auspicious timings, rituals, moonrise.

Web Summary : January 6th marks Angaraki Sankashti Chaturthi. Observe the fast, perform Ganapati puja, and offer Arghya to the moon at the specified moonrise time for blessings and fulfillment of desires. Rahu Kaal is between 3 PM to 4.30 PM.
टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थीganpatiगणपती 2025Puja Vidhiपूजा विधीGanpati Festivalगणपती उत्सव २०२५Ganesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीspiritualअध्यात्मिक