शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
3
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
4
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
5
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
6
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
7
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
8
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
9
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
10
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
11
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
12
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
13
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
14
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
15
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
16
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
17
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
18
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
19
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
20
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   

पाशांकुश एकादशी : आजच्या दिवशी झालेली राम-भरत भेट; चित्रकूट पर्वतावर अजूनही आहेत पुरावे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2021 15:48 IST

अशा बंधुप्रेमाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, भगवान विष्णूंची आराधना करून आपणही पाशांकुश एकादशी साजरी करूया. जय श्रीराम! 

दसऱ्याच्या दिवशी रावणाचा वध करून प्रभू श्रीराम सीतामाई, लक्ष्मण आणि हनुमंतासह दंडकारण्यातून परतले. या दिवसाची भरत अतिशय आतुरतेने वाट पाहत होता. तो दिवस होता पाशांकुश एकादशीचा. दसऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी श्रीराम-भरत भेटीचा हृद्य सोहळा या सृष्टीने पाहिला होता. त्या प्रसंगाच्या खुणा आजही चित्रकूट पर्वतावर सापडतात. 

या बंधू द्वयींच्या भेटीचे वर्णन वाल्मिकी रामायणापासून ते तुलसी रामायणापर्यंत सर्व ग्रंथात सापडते. ही भेट झाली ते ठिकाण होते श्रीरामांची तपोभूमी चित्रकूट पर्वत. चित्रकूट पर्वतावर स्थित कामतानाथ मंदीर हे श्रीराम भरत मिलाप मंदिर म्हणून उभारले आहे. तिथे श्रीराम आणि भरत यांची पदचिन्हे आढळतात. 

दशरथ राजाच्या निधनानंतर भरतानेश्रीरामांची भेट घेतली व आपल्या वडिलांच्या निधनाची दुःखद वार्ता त्यांना सांगितली. आईच्या वचनातून मुक्त होऊन त्यांनी पुन्हा राज्य कारभार सांभाळावा अशी भारताने विनवणीदेखील केली. परंतु वचनबद्ध श्रीरामांनी हा प्रस्ताव नाकारला व भरताला अयोध्येचा कारभार सांभाळ असे सांगितले. यावर भरतानेही अयोध्येत राहून वनवासी जीवन व्यतीत केले आणि प्रभू श्रीरामांच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्यकारभार सांभाळला. 

त्यागात पुढे आणि भोगात मागे असणारी ही चारही भावंडे बंधुप्रेमाचे आदर्श उदाहरण होती. त्यावेळेस भरताने प्रभू श्रीरामांकडून वचन घेतले, की चौदा वर्षाचा वनवास संपवून पुढचा दिवस संपायच्या आत तुम्ही परतला नाहीत, तर चित्रकूट पर्वतावर मी अग्निकाष्ठ भक्षण करेन. 

भरताला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी श्रीराम पुष्पक विमानातून वाऱ्याच्या गतीने लगबगीने परत आले व त्यांनी त्यांच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या भरताला कडकडून मिठी मारली. तो हृदयद्रावक प्रसंग पाहून तिथले दगडही मऊ पडले आणि त्यावर भरत व श्रीरामाच्या पावलाचे ठसे उमटले, असे म्हणतात. आजही तिथल्या मंदिरात हे पदचिन्ह बघायला मिळते. उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश यांच्या मध्यावर चित्रकूट पर्वत आहे व तिथेच हे मंदिर स्थित आहे. जेव्हा शक्य होईल तेव्हा या पवित्र स्थळाचे दर्शन घेऊन पावन व्हा. 

अशा बंधुप्रेमाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, भगवान विष्णूंची आराधना करून आपणही पाशांकुश एकादशी साजरी करूया. जय श्रीराम! 

टॅग्स :ramayanरामायण