या तीनही गोष्टी आपण पाहिलेल्या नाहीत आणि ज्यांनी पाहिल्या असतील ते सांगायला परत आले नाहीत. तरीही काळानुकाळ त्यावर विश्वास ठेवून आपण शब्दप्रयोग करतो. कारण ज्या योगीऋषींनी त्यांच्या तप:साधनेवरून जाणल्या, त्यावरून आपण या गोष्टींची कल्पना करू शकतो. ...
कालिदासांचे मूळ साहित्य संस्कृतात असले, तरीदेखील अनेक मराठी साहित्यिकांनी त्याचा मराठीत रसाळ भावानुवाद केलेला आहे. त्यामुळे या साहित्यपर्वणीचा लाभ आपण अवश्य घेतला पाहिजे. ...