शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
2
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
3
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
4
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
5
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदसेनेच्या नेत्यावर बंदूक
6
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
7
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
8
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
9
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
10
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना
11
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
12
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
13
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
14
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
15
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
16
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
17
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
18
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
19
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
20
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी

November Born Astro: नोव्हेंबरमध्ये जन्मलेले लोक म्हणजे सुप्त ज्वालामुखी; वाचा गुण-दोष!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 14:17 IST

November Born Astro: तुमचा किंवा तुमच्या ओळखीत कोणाचा वाढदिवस नोव्हेंबर मध्ये असेल तर त्यांचे गुण-दोष दिलेल्या माहितीशी जुळतात का ते बघा!

नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या (November Born people Astrology) व्यक्तींची ओळख एका वाक्यात सांगायची, तर ज्योतिषशास्त्र सांगते की या व्यक्ती जगात सर्वांचे भले करण्यासाठी जन्माला आलेल्या असतात. जर तुमचा वाढदिवस नोव्हेंबर मध्ये असेल किंवा तुमच्या कुटुंबातील आवडत्या व्यक्तीचा किंवा मित्र मैत्रिणीचा वाढदिवस या महिन्यात असेल तर तुम्हाला त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्याबद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडेल, बरोबर ना? तर हा घ्या नोव्हेंबर मधील व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय...  

तुम्ही सर्वांमध्ये एकोपा आणण्याचे काम उत्तम प्रकारे करता. तुमच्या मित्रांना जुळवून घेणे ही अनेकदा तुमची जबाबदारी असते. जरी जग तुम्हाला खूप शांत आणि सौम्य स्वरुपात ओळखत आहे, परंतु ज्याने तुमचा राग पाहिला आहे त्याला माहित आहे की तुमच्यात किती ज्वालामुखी सुप्त स्वरूपात दडलेला आहे. मात्र या स्वभावामुळे तुम्ही कमी वयात रक्तदाबासारख्या आजारांना बळी पडू शकता. तुमच्या चेहऱ्यावर निरागस भाव असल्यामुळे तुमचे खोटे बोलणे ही समोरच्याला सहज खरे वाटू शकते. मात्र त्याचा गैरफायदा घेऊ नका. आरोग्याची विशेषतः केसांची काळजी घ्या. अन्यथा वाढत्या वयाआधीच टक्कल पडू लागेल. 

नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या  तरुणांमध्ये प्रेमाचा अमर्याद सागर असतो.तुम्ही उत्तम जीवनसाथी असता. तुम्हाला तुमची प्रिय व्यक्ती मिळाली नाही तरी तुम्ही तिला मिळवण्याचा अट्टहास करणार नाही, वा तिला विसरू शकणार नाही. आणि मिळाली तर तिच्यासाठी तुम्ही तुमचे सर्वस्व अर्पण करता. तुम्ही आपले जीवन दुसऱ्याच्या सुखासाठी खर्च करता. परंतु तेवढे प्रेम तुम्हाला न मिळाल्याने तुम्ही अस्वस्थ राहता. 

करिअर बाबतीत तुम्ही संवेदनशील लेखक, पोलीस, पत्रकार, कलाकार, सर्जन किंवा गुप्तचर विभागातील काम चांगल्या प्रकारे सांभाळू शकता. भावनांवर थोडा आवर घातलात आणि रागावर नियंत्रण मिळवले तर तुम्ही तुमच्या क्षेत्राचे शिखर गाठू शकाल. तुमच्या ठायी असलेल्या अतुलनीय सहनशक्तीमुळे, तुम्ही जीवनाची प्रत्येक लढाई जिंकू शकता. तुमच्या सौम्य स्वभावाचा इतरांना गैरफायदा घेऊ देऊ नका. सत्य आणि प्रामाणिकपणा ही तुमची ताकद आहे, त्याचा वापर करा.

या महिन्यात जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती - झाशीची राणी लक्ष्मीबाई, इंदिरा गांधी, चाचा नेहरू, सी.व्ही. रमण, कमल हसन, ऐश्वर्या राय, विराट कोहली, तब्बू, सानिया मिर्झा, नीता अंबानी ई. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष