शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अतिविचाराने काही साध्य होत नाही; सुखी जीवनासाठी वाचा भगवान बुद्धांनी दिलेली शिकवण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 12:58 IST

चिंता ही मनुष्याला चितेकडे नेते, अर्थात आरोग्यासाठी घातक ठरते, अनेक रोग जडतात, म्हणून चिंतामुक्त राहण्यासाठी भगवान बुद्धांची शिकवण लक्षात ठेवा.

भगवान बुद्धांनी जनमानसाची मनःस्थिती ओळखली आणि वेळोवेळी बोध केला.  आजच्या काळात ज्याला बघावे तो आपापल्या दु:खात अडकलेला आहे. परंतु दु:खाचे मूळ काय याचा आपण कधी विचारच करत नाही. हाच प्रश्न उपस्थित केला भगवान बुद्धांच्या शिष्याने...

एकदा भगवान बुद्धांना त्यांच्या शिष्याने विचारले, `भगवान दु:खाचे मूळ कारण काय?'भगवान म्हणाले, 'एक गोष्ट सांगतो म्हणजे तुला दु:खाचे कारण आपोआप कळेल.' भगवान बुद्ध गोष्ट सांगू लागले...एका गावात एक व्यापारी होता. तो अतिशय श्रीमंत होता. त्याने एकदा बाहेर गावाहून एक छान शोभेची वस्तू विकत आणली. घरी आल्यावर आपल्या प्रामाणिक नोकराच्या हाती वस्तू सोपवून म्हणाला, `ही शोभेची वस्तू अतिशय महाग आहे, हलक्या हातांनी कपाटात नेऊन ठेव.'

नोकराने जबाबदारीने वस्तू हातात घेतली आणि सांभाळून ती वस्तू कपाटात ठेवणार, तोच हातातून निसटून ती खाली पडली आणि फुटली. नोकर थरथर कापू लागला. व्यापारी रागाने लालेलाल झाला. त्याक्षणी नोकराला नोकरीवरून काढून टाकावे, हा विचारही त्याच्या मनात डोकावला. परंतु त्याने क्षणभर विचार केला, की या एका चुकीसाठी त्याची आयुष्यभराची प्रामाणिकपणे केलेली सेवा विसरून चालणार नाही. त्याने नोकराला माफ केले. पण त्या रात्री व्यापाऱ्याला झोप लागली नाही. त्याने बाहेर येऊन पाहिले तर नोकर घोरत झोपला होता. व्यापाऱ्याला राग आला, एवढी महागडी वस्तू फुटली याचे शल्य न बाळगता, हा खुशाल झोपलाय. 

दुसऱ्या दिवशी व्यापाऱ्याने नोकराला सांगितले, `काल तुझ्या हातून जी महागडी वस्तू फुटली, ती मी तुला भेट देण्यासाठी आणली होती. पण ती देण्याआधीच फुटलीयाचे मला वाईट वाटले.' हे कळल्यापासून नोकर अस्वस्थ झाला. स्वत:ला, स्वत:च्या नशीबाला दोष देऊ लागला. त्या रात्री नोकराला झोप आली नाही, पण व्यापारी घोरत झोपला.

अशा रितीने गोष्ट पूर्ण करून भगवान बुद्धांनी शिष्याला विचारले, आता सांग दु:खाचे मूळ कारण काय?शिष्य म्हणाला, 'भगवान, विचार हेच दु:खाचे मूळ कारण आहे.'भगवान म्हणाले, 'अगदी बरोबर! या जगात कायमस्वरूपी काहीच नाही. जे आहे ते क्षणभंगूर आहे. हे लक्षात न घेता आपण छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करत बसतो आणि दु:खी होतो. म्हणून अति विचार टाळणे म्हणजे दु:खाचे मूळ मिटवणे!' 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी