मूड ठीक नाहीये? अस्वस्थ वाटतंय? मग घरच्या घरी हा संगीतोपचार घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 02:21 PM2021-06-18T14:21:44+5:302021-06-18T14:22:01+5:30

राग आणि रोग या दोन्हीवर प्रभावी औषध म्हणजे संगीत!

Not in a good mood? Feeling unwell? Then take this music therapy at home! | मूड ठीक नाहीये? अस्वस्थ वाटतंय? मग घरच्या घरी हा संगीतोपचार घ्या!

मूड ठीक नाहीये? अस्वस्थ वाटतंय? मग घरच्या घरी हा संगीतोपचार घ्या!

googlenewsNext

संगीत हे तना मनाला तजेला देणारे, उत्साह देणारे, मनःस्थिती बदलणारे अतिशय प्रभावी माध्यम आहे. या माध्यमाचा वापर आपण कसा करतो, यावर ते अवलंबून आहे. त्यातही भारतीय शास्त्रीय हे केवळ संगीत नसून ती एक प्रकारे उपचार पद्धती आहे. म्हणून अलीकडच्या काळात संगीतोपचार हे शास्त्र अधिक अभ्यासले जात आहे आणि त्यानुसार लोकांवर उपचारही केले जात आहेत. भारतीय शास्त्रीय संगीताची तुम्हाला माहिती असो वा नसो, त्यांच्या ठरलेल्या वेळेत ते ते राग ऐकले, तर ते तुमच्या आजारावर प्रभावी ठरतात. त्यातून आपसुख संगीताची गोडी लागते आणि त्यातूनच भारतीय शास्त्रीय संगीताचा समृद्ध वारसा जपला जातो. वाचनात आलेली ही छानशी माहिती तुम्हालाही उपयोगी पडू शकेल. 

प्रत्येक रागाचे ठरलेले प्रहर असतात. त्या प्रहरात ते राग ऐकले तर त्याचा प्रभाव अधिक जाणवतो. कारण दिवसाच्या प्रहरानुसार रागांची रचना केलेली असते. या शास्त्रीय माहितीत तुम्हाला फारसे डोकवायचे नसेल, तर हरकत नाही. परंतु कोणता राग कधी ऐकावा हे कळण्यासाठी उदाहरणादाखल काही रागांचे वेळेनुसार वर्गीकरण दिले आहे. इंटरनेटवर हे सर्व राग गायन आणि वादन रूपात उपलब्ध आहेत. तुम्ही त्यानुसार त्याचे श्रवण करू शकता. 

सकाळी    २ ते ४  :- सोहिनी, पारज
सकाळी    ४ ते ६  :- ललित, भटीयार,भनकर
सकाळी    ६ ते ८  :- जोगीया, रामकली, भैरव, कलींगा, विभास,गुनकली
सकाळी    ८ ते १० :- तोडी, कोमल रिषभ आसावरी, बिलासखानी तोडी, अहिरभैरव, नटभैरव, हिंदोल 

दुपारी १० ते १२:- जौनपुरी, अलाहिया बिलावल, देसकर, भैरव, देसी, आसावरी, 
दुपारी १२ ते २ :- गौड सारंग, शुद्ध सारंग, वृंदावनी ,सारंग
दुपारी २ ते ४  :- भिमपलासी ,मुलतानी
दुपारी ४ ते ६  :- पटदीप, श्री, पूर्वी, धानी

सायंकाळी ६ ते ८  :- हमीर, शुद्ध कल्याण, यमन, पुरीया, मेघ, गौ्री, हंसध्वनी, परीय़ाधनाश्री, लक्ष्मी कल्याण, हमीर, यमन कल्याण, कलावती
रात्री ८ ते १० :-  देश , दुर्गा, केदार, जयजयवंती, मीयामल्हार, सुरदासी मल्हार, काफी, रामदासी मल्हार, बहार, जोग, दुर्गा, हेमकल्याण नटभैरव, भूपाली, गारा , कामोद, तिलंग, शाम कल्याण, नंद, जोग, केदार, चांदनी केदार, देश, गौड मल्हार, तिलक कामोद, खमाज, कलावती
रात्री १० ते १२ :- चंद्रकंस, शंकरा, बागेश्री, बिहाग, अभोगी, नायकी कन्नडा, कौ्शिक अवनी, बिहागडा, सरस्वती, 
रात्री १२ ते २  :-अडाणा, शहाणा, दरबारी कानडा, आणि मालकंस..

शास्त्रीय संगीतातील विविध राग आणि ते ऐकल्याने मिळणारे फायदे 
राग दुर्गा – आत्मविश्वास वाढविणारा.
राग यमन – कार्यशक्ती वाढवणारा.
राग देसकार – उत्थान व संतुलन साधणारा.
राग बिलावल – अध्यात्मिक उन्नती व संतुलन साधणारा.
राग हंसध्वनी – सत्य असत्याची जाणिव करून देणारा राग.
राग शाम कल्याण – मुलाधार उत्तेजीत करणारा व आत्मविश्वास वाढविणारा.
राग हमीर – आक्रमकता वाढविणारा, यश देणारा व शक्ती आणि उर्जा निर्माण करणारा.
राग केदार – स्वकर्तृत्वावर पूर्ण विश्वास निर्माण करणारून भरपूर उर्जा निर्माण करणारा तसेच मुलाधार उत्तेजित करणारा.
राग भूप – शांतता निर्माण करणारा व संतुलन साधून अहंकार संतुलनात आणणारा.
राग अहिरभैरव – शुद्ध इच्छा प्रेम आणि भक्तीभाव निर्माण करणारा व आध्यात्मिक उन्नतीस पोषक वातावरण निर्मिती करून समाधान देणारा.
राग भैरवी – इडा नाडी सशक्त करणारा भावनाप्रधान राग सर्व सदिच्छा पूर्णकरून प्रेम वृध्दिंगत करणारा असा सहस्त्राराचा राग.
राग मालकंस – अतिशय शांत - मधुर राग प्रेमभाव निर्माण करणारा व संसारिक सुख वृध्दिंगत करणारा.
राग भैरव – शांत वृत्ती व शुध्द इच्छा निर्माण करणारा राग हा आध्यात्मिक प्रगतीस पोषक असून शिवतत्व जाग्रुत करणारा असा आहे.
राग जयजयवंती – सुख समृद्धि देणारा राग असून यश दायक आहे विशुद्धीच्या सर्व समस्या दूर करण्याची क्षमता बाळगतो.
राग भिम पलासी – संसार सुख व प्रेम देणारा.
राग सारंग – कल्पना शक्ती व कार्यकुशलता वाढीस लावून नवनिर्मितीचे ज्ञान प्रदान करतो आत्मविश्वास वाढीस लावून परिस्थितीचे भान देणारा अत्यंत मधुर राग.
राग गौरी – शुध्द ईच्छा, मर्यादाशिलता, प्रेम, समाधान, उत्थान इत्यादी गुणवर्धक राग. डाव्या विशुद्धीच्या सर्व बाधा नाहिशा करण.

याशिवाय काही गंभीर आजारावरदेखील शास्त्रीय रागांचा वापर संगीतोपचार म्हणून केला जातो. जसे की-
हृदयरोग : राग दरबारी व राग सारंग
विस्मरण : लक्षात रहात नाही त्यांनी शिवरंजनी राग ऐकावा.
मानसिक ताण : ज्यांना मानसिक ताण भरपूर प्रमाणात असेल त्यांनी राग बिहाग आणि राग मधुवंती वर आधारित गाणी ऐकावीत.
रक्तदाब : हाय ब्लड प्रेशर साठी हळू (धीमी गती) चालीची, तर लो ब्लड प्रेशर साठी जलद चालीची गाणी फायदेशीर ठरतात.
रक्ताची कमतरता: अशा वेळी राग पिलू वर आधारलेली गाणी ऐकावी.
अशक्तपणा : शक्ती ताकद कमी झालेली वाटतेय ,उत्साहाचा अभाव काही करण्याचा कंटाळा येतो अशा वेळी राग जयजयवंती वरील आधारित गाणी ऐकावी.
जळजळ : यावर उपाय म्हणून राग खमाज वर आधारित असलेली गाणी ऐकावीत.
 

Web Title: Not in a good mood? Feeling unwell? Then take this music therapy at home!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.