शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
3
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
4
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
5
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
6
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
7
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
8
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
9
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
10
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
11
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
12
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
13
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
14
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
15
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
16
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
17
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
18
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
19
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
20
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या

Nirjala Ekadashi 2025: २४ एकादशीचे पुण्य निर्जला एकादशीत, पण उपास कधी करावा ६ की ७ जूनला? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 12:09 IST

Nirjala Ekadashi 2025 Vrat Information: स्मार्त आणि भागवत एकादशी असा उल्लेख आला की लोक गोंधळतात; निर्जला एकादशी दोन दिवसात विभागून आल्याने हे व्रत कधी करावे ते जाणून घ्या!

ज्येष्ठ मासातील एक महत्त्वाचे व्रत म्हणजे निर्जला एकादशी. यंदा ६ आणि ७ जून रोजी विभागून निर्जला एकादशी(Nirjala Ekadashi 2025) तिथी आली आहे. हिला 'भीमसेनी एकादशी' असेही म्हणतात. वर्षभरात येणाऱ्या एकूण २४ एकादशीचा उपास केला नाही तरी चालेल, पण या एकादशीचा उपास करावा असे म्हणतात. ज्यामुळे २४ एकादशीचे पुण्य लाभते. या व्रताच्या दिवशी उपासाचे पदार्थ न खाता अन्न पाण्याचा उपास करायचा असतो. हो! पाण्याचाही उपास! म्हणूनच तिला निर्जला एकादशी म्हणतात. यंदा ही तिथी दोन दिवसात विभागून आल्यामुळे हे व्रत कधी करावे याबाबत अनेक भाविक संभ्रमित झाले आहेत. हा संभ्रम दूर करण्यासाठी आपण स्मार्त आणि भागवत यातील भेद जाणून घेऊया. 

दिनदर्शिकेवर दाखवल्यानुसार ६ जून रोजी शुक्रवारी स्मार्त निर्जला एकादशी असा उल्लेख आढळतो. ही एकादशी ६ जून रोजी पहाटे ४ वाजून २८ मिनिटांनी सुरु होणार आहे, त्यामुळे तिथी सुरु होऊनही ती सूर्योदय पाहणार आहे तो ७ जूनचा! म्हणून ७ जूनची तिथी निर्जला एकादशी व्रतासाठी ग्राह्य धरली जाईल. या दिवशी उपास आणि उपासना करावी असे शास्त्रसंकेत आहेत. 

भागवत एकादशी (Difference between Bhagavat and Smart Ekadashi): 

जी तिथी सूर्योदय पाहते ती तिथी आपल्याकडे ग्राह्य धरली जाते. म्हणजेच एकादशी तिथी आदल्या दिवशी सुरू झालेली असली तरी तिने जर दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय पाहिला असेल तर ती तिथी पाळली जाते आणि दिन दर्शिकेवर देखील सूर्योदय पाहिलेल्या तिथीवर भागवत धर्माचे ध्वजचिन्ह दिसून येते. भागवत धर्म पाळणारे वारकरी बांधव त्यालाच भागवत एकादशी म्हणतात. वैष्णव उदय तिथी मानतात. स्मार्त वाले जिथून तिथी सुरू झाली ती तिथी मानतात आणि व्रत सुरु करतात. हा तो फरक. 

मग स्मार्त एकादशी म्हणजे काय?

तर दशमी संपून एकादशी सुरू होताना त्या तिथीने सूर्योदय पाहिला नाही पण तो दिवस नव्या तिथीच्या नावे सुरू झाला असेल तर त्याला स्मार्त तसेच दर्श असा उल्लेख केला जातो. म्हणजे तिथी सुरू झाली पण तिथीशी संबंधित व्रत सूर्योदय पाहिलेल्या दिवशीच करायचे यासंबंधी ती सूचना असते. म्हणून ती स्मार्त एकादशी!

तसेच स्मार्त आणि भागवत यातील आणखी एक मुख्य फरक आहे संप्रदायाचा!

विष्णुभक्तांसाठी एकादशी हे व्रत म्हणजे एक पर्वणीच असते. त्यामुळे ते नेमाने सर्व एकादशी करतात. ज्यांना उपास करणे शक्य नसते त्यांनी भगवान विष्णूची पूजा करतात. तसेच साधा सात्त्विक आहार घेतात. 'ऊँ नमो भगवते वासुदेवाय नम:' या मंत्राचा जप करतात. अथवा विष्णुसहस्त्रनामाचे श्रवण-पठण करतात. अशा उपासकांना वैष्णव म्हणतात. 

स्मार्त म्हणजे जे लोक वेंदांवर, श्रुती स्मृती, पुराण यांना प्रमाण मानतात, ज्यांना वैदिक धर्माचं ज्ञान आहे, ते स्मार्त एकादशी पाळतात. थोडक्यात ऋषी, मुनी तसेच कर्मकांड करणारे योगी स्मार्त एकादशी करतात. तर वैष्णव म्हणजे जे विष्णू भक्त आहेत, संसारी आहेत, जे सूर्योदय पाहणारी तिथी ग्राह्य धरतात ते भागवत एकादशीचे व्रत करतात. म्हणून विष्णू भक्तांनी स्मार्त एकादशीला विष्णू पूजा करावी मात्र एकादशी व्रताचे पालन भागवत एकादशीला करावे असे शास्त्र सांगते. त्यानुसार निर्जला एकादशीला(Nirjala Ekadashi 2025) ६ जून रोजी विष्णुपूजा आणि ७ जून रोजी उपास आणि उपासना करावी. 

टॅग्स :Puja Vidhiपूजा विधीekadashiएकादशीspiritualअध्यात्मिकIndian Festivalsभारतीय उत्सव-सणFasting & Foodनवरात्री उपवास आणि पदार्थ २०२४