शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

NIrjala Ekadashi 2025: निर्जला एकादशीला कोणते पदार्थ खाऊ नये, याची आजच नोंद करून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 11:02 IST

Nirjala Ekadashi 2025: ७ जून रोजी निर्जला एकादशी आहे, या तिथीला कोणते पदार्थ खाऊ नये, याची पूर्ण यादीच दिली आहे, त्यामुळे पळवाटा अजिबात शोधू नका!

भारूड हा शब्द उच्चरताच आठवण होते, ती संत एकनाथ महाराजांची. भारूड नामक काव्यातून समाजातील परिस्थितीचे मार्मिक वर्णन केले जाते. नाथ महाराजांनी सुरू करून दिलेली परंपरा अद्याप सुरू आहे. चंदाताई तिवाडी यांचा बुरगुंडा, निरंजन बाक्रे यांचा विंचू चावला, शाहीर साबळे यांचा दादला नको गं बाई अशी अनेक भारुडे आपण ऐकली असतील. अलीकडच्या काळात या सर्व कलाकारांनी त्याला आधुनिक विषयांची जोड देऊन भारूड काव्य जिवंत ठेवले आहे. त्यातलाच एक प्रकार निर्जला एकादशीच्या (Nirjala Ekadashi 2025) निमित्ताने खास लोकमत वाचकांसाठी... 

Nirjala Ekadashi 2025: २४ एकादशीचे पुण्य निर्जला एकादशीत, पण उपास कधी करावा ६ की ७ जूनला? 

शिरपूर, धुळे जिल्हा येथील श्रीमती विजयाबाई गाडगीळ यांनी निर्जला एकादशीचे गमतीदार भारूड लिहिले आहे. 'एकादशी आणि दुप्पट खाशी' असे आपण नेहमी म्हणतो आणि तसे वागतोही. पण निर्जला एकादशीला तर पाणीही प्यायचे नसते. तसे असताना आपण पाण्याला पर्याय कसा शोधत जातो, याचे रसभरीत वर्णन त्यांनी या भारुडात केले आहे... 

बाई माझी एकादशी, एकादशी, पाणी पिऊ कशी? पाणी पिऊ कशी?बाई माझी एकादशी।।

सुनेने केला सुंठवडा,मला म्हणाली देऊ का थोडा, अहो आग झाली अशी, बाई माझी एकादशी ।।१।।

शेजारणीने केला शिंगाड्याचा शिरा,मला म्हणाली देऊ का जरा, तिला नाही म्हणू कशी, बाई माझी एकादशी ।।२।।

मैत्रिणीने केले साबुदाण्याचे वडे,त्यातले मी खाल्ले ५-७ थोडे, आता आणखी मागू कशी,बाई माझी एकादशी ।।३।।

लेकीने केला दुधाचा चहा,(आज निर्जला एकादशी आहे ना, म्हणून बिना पाण्याचा चहा)मला म्हणाली पिऊन तर पहा,तिला नाही म्हणू कशी?बाई माझी एकादशी ।।४।।

अहो पण अशी एकादशी करून का फळ मिळणारे? म्हणून... तुम्ही एकादशी करा, आणि त्या विठ्ठलाचे स्मरण करा,तरच, जागा मिळेल पायाशी,बाई माझी एकादशी ।।५।।

थोडक्यात काय? तर निर्जला एकादशीला खाण्या-पिण्यावर नाही तर उपासनेवर लक्ष द्या आणि आपले काम प्रामाणिकपणे करा, जेणेकरून भगवंत कृपा होणारच!

Nirjala Ekadashi 2025 Vrat: निर्जला एकादशीला खाणे तर दूरच, पण पाणीही पिऊ नये, असा नियम का?

टॅग्स :Puja Vidhiपूजा विधीfoodअन्नekadashiएकादशी