शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
5
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
6
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
7
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
8
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
9
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
10
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
11
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
12
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
13
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
14
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
15
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
16
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
17
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
18
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
19
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
20
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 

Navratri Puja Vidhi 2024: इच्छित मनोकामनापूर्ती करणारे 'काम्य व्रत' ललिता पंचमीला कसे करायचे? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 13:09 IST

Navratri Puja Vidhi 2024: यंदा ७ ऑक्टोबर रोजी ललिता पंचमी आहे, त्यादिवशी देवीचे हे विशेष आणि महाफलदायी व्रत कसे करायचे ते जाणून घ्या.

शारदीय नवरात्रीत (Navratri 2024)अश्विन शुद्ध पंचमीला ललिता पंचमीचे (Lalita Panchami Vrat 2024) व्रत केले जाते. हे काम्य व्रत आहे. म्हणजे इच्छापूर्ती साठी केले जाणारे व्रत आहे. ललिता मातेला उद्देशून हे व्रत केले जाते आणि त्याला पूजापाठाची जोड दिली जाते. या व्रताबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

पौराणिक मान्यता : पौराणिक कथेनुसार या दिवशी ललिता मातेने  'भांडा' नावाच्या राक्षसाचा वध केला होता. हा राक्षस कामदेवाच्या राखेतून उत्पन्न झाला होता. या असुरापासून महिला, मुलांना धोका होता.. देवीने तो दूर केला म्हणून नवरात्रीच्या पंचमीला स्कंद मातेची अर्थात कार्तिकेयाच्या आईची म्हणजेच माता पार्वतीची पूजा केली जाते. हे व्रत केले असता देवीची कृपा मिळते आणि जीवनात सुख-समृद्धी आणि शांती नांदते.. 

देवी ललिता  : शक्तिची देवी ललिताचे पुराणात वर्णन आढळते. जेव्हा दक्ष राजा आपली कन्या सती हीचा अपमान करतो तेव्हा ती आत्मदहन करून घेते तेव्हा शिव सतीचे पार्थिव आपल्या खांद्यावर घेऊन चारी दिशेत फिरतात. मृत पार्थिव असे फिरवणे योग्य नाही, मात्र शंकर बेभान झाले असल्याने त्यांना आपल्या कृतीची जाणीव करून देणे शक्य नव्हते. तेव्हा ही भ्रमंती थांबवण्यासाठी विष्णू चक्राने सतीची देह विभाजित करतात. सतीला मुक्ती मिळते आणि ती नंतर भगवान शंकराच्या हृदयात प्रवेश करते आणि तिला 'ललिता' नावाने ओळख मिळते.  पूजा पद्धत : ललिता मातेच्या पूजेकरिता छोटी ताटली घेतात. त्यात देव्हाऱ्यातली देवीची मूर्ती आसन घालून विराजित करतात. फुलं पत्री, गंधाक्षता वाहून तिची पूजा करतात.काही ठिकाणी चौरंगावर देवीची आरास करून त्यात स्थानापन्न करतात आणि चौरंगाला केळीचे खांब बांधून पूजा करतात. ही पूजा करताना म्हणावयाचे मंत्र -

नील कौशेयवसनां हेमाभं कमलासनाम। भक्तांना वरदां नित्यं ललितां चिन्तयाम्यहम्।। 

''कमलावर अधिष्ठित, निळे, रेशमी वस्त्र परिधान करणारी, सुवर्णकांतीची, भक्तांना नित्य वर देणारी अशा ललितेचे मी चिंतन करतो.''  ललिता पंचमीचे व्रत झालेल्या दिवशी उपास करावा, कथा कीर्तन ऐकावे, जागरण करावे आणि देवीची भक्ती करावी. हे व्रताचरण शक्य नसेल तर घटस्थापना केलेल्या जागीच देवीला ललिता माता संबोधून वरील मंत्र १०८ वेळा म्हणावा आणि गूळ खोबरं, दूध साखर, लाडू, पेढे यथाशक्ती जे शक्य असेल त्या गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. 

टॅग्स :Navratri Mahotsav 2024शारदीय नवरात्रोत्सव २०२४Navratriनवरात्रीPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२४