शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
4
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
5
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
6
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
9
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
10
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
11
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
12
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
13
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
14
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
15
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
16
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
17
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
18
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
19
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
20
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

Navratri Mahotsav 2023: अश्विन शुद्ध सप्तमीला करा देवी सरस्वतीला आवाहन आणि सप्तमीला करा पूजन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 18:00 IST

Navratri Mahotsav 2023 : आपल्या आयुष्यात देवी लक्ष्मीचे जेवढे अढळ स्थान आहे तेवढेच देवी सरस्वतीचेदेखील आहे, म्हणून नवरात्रीत तिचेही पूजन केले जाते. 

नवदुर्गांमधील देवीचे प्रत्येक रूप काही ना काही शिकवण देणारे आहे. २० ऑक्टोबर रोजी नवरात्रीचा सहावा दिवस असला तरी सप्तमी तिथी सुरू होत आहे. या दिवशी आपण देवी शारदेला आवाहन करतो व दुसऱ्या दिवशी अर्थात अष्टमीला तिचे पूजन करतो. सप्तमी विभागून आल्याने पुढच्या तिथी देखील विभागून आल्या आहेत. सरस्वती माता आपल्या जीवनात असलेली जडता दूर करते. जीवनात तेजस्विता आणण्यासाठी तिची उपासना केली पाहिजे. खऱ्या सारस्वताने माता शारदेच्या मंदिराचे पावित्र्य जपले पाहिजे. प्रथेनुसार सप्तमीला देवी सरस्वतीला आवाहन करूया. 

या कुन्देन्दुतुषारहार धवला या शुभ्रवस्रावृता,या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना,या ब्रह्माच्युतशंकर प्रभृतिभिर्दैवै: सदा वंदिता,सा मां पातु सरस्वती भगवती, नि:शेष जाड्यापहा।।

बालपणापासून आपल्या नित्य प्रार्थनेत या श्लोकाचा समावेश आहे, त्याचा अर्थही समजावून घेऊ.

जी कुंद कळीसारखी, चंद्र, तुषार व मुक्ताहारासारखी धवल आहे, जिने शुभ्र वस्त्र परिधान केली आहेत. जिचे हात वीणारूपी  वरदंडाने शोभत आहेत. जी पद्मावर विराजित आहे. जिला ब्रह्मा, विष्णु, महेश यांच्यासारखे मुख्य देव वंदन करत आहेत. अशी जडतेला दूर करणारी सरस्वती माता माझे रक्षण करो. सरस्वतीच्या उपासकाला सारस्वत म्हणतात. जो खरा सारस्वत असतो, तो देवी शारदेप्रमाणे आपले आचार, विचार नेहमी शुद्ध ठेवतो. देवी शारदेचे रूप आपल्याला रूपातून अनेक गोष्टींची शिकवण मिळते.

देवी कुंद कळीसारखी, चंद्रासारखी धवल आहे, शितल आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक ज्ञानी माणसाने धवल असावे, परंतु त्याच्या विद्वत्तेला उग्रतेचा दर्प नसावा. त्याच्या सहवासात असणाऱ्या व्यक्तीला चंद्राप्रमाणे शितलता जाणवली पाहिजे. त्याच्या ज्ञानाच्या प्रकाशाने अंधारावर मात केली पाहिजे आणि इतरांना मार्ग दाखवला पाहिजे. 

शारदेने शुभ्र वस्त्र परिधान केली आहेत. आपल्याला माहित आहेच, पांढरे कपडे घातले, की खूप जपावे लागते. कारण, कुठेही डाग लागण्याची भीती असते. मात्र, शारदेच्या शुभ्र वस्त्रातून संदेश मिळतो, की तिच्या उपासकाने आपल्या चारित्र्याला डाग लागू न देतो, ते कायम शुभ्र ठेवले पाहिजे. 

देवी सरस्वती १४ विद्या ६४ कलांची जननी आहे. तिला संगीत प्रिय आहे. म्हणून हातात वीणा धरली आहे. देवीला आपण आई म्हणतो आणि आई आपल्या मुलांना शिस्त लागावी म्हणून हातात दंड घेते. मात्र देवी शारदेने वीणेचा दंड घेऊन आपले जीवन सुरेल व्हावे, म्हणून प्रेरणा दिली आहे. तिच्याप्रमाणे आपणही आपल्या अस्तित्त्वाने इतरांचे आयुष्य सुरेल केले पाहिजे.

देवी पद्मासना आहे. एक म्हणजे ती शुभ्र कमळावर विराजमान झाली आहे आणि दुसरे म्हणजे ती पद्मासन घालून बसली आहे. ज्याप्रमाणे कमळ चिखलात राहूनही स्वच्छ राहते, त्याप्रमाणे सरस्वतीच्या उपासकाने आपल्या पदाला लांछन लागेल, असे वर्तन करता कामा नये. तसेच पद्मासनात बसण्याचा सराव म्हणजे, ज्ञानार्जन करताना आपली बैठक पक्की हवी. पद्मासनात बसून मन आणि देह स्थिर ठेवून संपूर्ण लक्ष अभ्यासात केंद्रीत केले पाहिजे.

ब्रह्मा, विष्णू, महेशही देवी सरस्वतीला वंदन करतात. याचे कारण म्हणजे, देवीच्या एका हातात जपाची माळ आणि दुसऱ्या हातात पोथी आहे. पोथी हे ज्ञानाचे प्रतीक आहे, तर जपमाळ भक्तीचे. त्रिदेवांच्या ठायी शक्ती आहेच, परंतु त्याला भक्ती आणि युक्तीचीही जोड हवी, ती प्रेरणा ते शारदेपासून घेतात.अशी देवी सरस्वती आपल्याही आयुष्यातील जडत्त्वाचा नायनाट करो, अशी आपण तिच्या चरणी प्रार्थना करावी. आयुष्यात एकवेळ लक्ष्मी प्राप्त झाली नाही, तरी ठीक, परंतु सरस्वतीची आराधना प्रत्येकाने केलीच पाहिजे. कारण, विद्वानं सर्वत्र पूज्यते! हे लक्षात घेऊन आपण दरवर्षी दसऱ्याला वहीवर सरस्वती काढून तिची पूजा करतो आणि जास्तीत जास्त वैचारिक सोने लुटण्याचा प्रयत्न करतो!

टॅग्स :Navratri Mahotsav 2023शारदीय नवरात्रोत्सव 2023Puja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३Navratriनवरात्री