शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; 9 प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानाला नेमकं काय घडलं?
2
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
3
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
4
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
5
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
6
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
7
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
8
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
9
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
10
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
11
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
12
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
13
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
14
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
15
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
16
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
17
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
18
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
19
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
20
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र

नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 15:13 IST

Navratri 2025: ‘जगदंब उदयोऽस्तु’ असे मुक्तकंठाने म्हणूया. सर्व विश्वाची आई असलेल्या मायभवानीला भक्तिभावे वंदन करूया, तिच्या चरणी नतमस्तक होऊया.

Navratri 2025: नवरात्र हा सत्त्व-रज-तम अशा त्रिगुणविशेषात अवतरलेल्या महाकाली, महालक्ष्मी, आणि महासरस्वती अशा तीन देवतांच्या पराक्रमाचा गुणगौरव करणारा व्रतोत्सव आहे. आपल्याकडे नवरात्र उत्सव साजरा करण्याची परंपरा फार प्राचीन काळापासून आहे. देवीच्या भक्तिपरंपरेचा उगम अतिप्राचीन कालाएवढा मागे जाऊ शकतो. वैदिक काळातही देवीची उपासना रूढ होती. चातुर्मासात आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते अश्विन शुद्ध दशमी या कालावधीत साजरा केला जाणारा एक मोठा उत्सव म्हणजेच नवरात्र. नऊ दिवस दुर्गा देवीचा उत्सव असतो. त्यास शारदीय नवरात्र असे म्हणतात.

यंदा २०२५ मध्ये २२ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे. नवरात्राचा उत्सव हा एक कुलाचारही असल्याने त्यामध्ये विविधता दिसून येते. बंगालमध्ये काली देवीचे उपासक अधिक आहेत त्यामुळे तेथे हा नवरात्र-उत्सव विशेष प्रकारे साजरा केला जातो. या उत्सवास दुर्गापूजा वा पूजा-उत्सव म्हणतात. दुर्गा देवीने वेगवेगळे अवतार घेऊन शुंभ-निशुंभ, रक्तबीज, महिषासुर इ. राक्षसांशी नऊ दिवस युद्ध केले व त्यांचा वध केला. म्हणून हा नवरात्राचा उत्सव केला जातो. विजयादशमी हा तिच्या विजयाचा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 

दुर्गा देवीच्या उपासनेसाठी नवरात्र हा सर्वश्रेष्ठ काळ

अगदी प्राचीन काळापासून नवरात्रात विशेष व्रत आचरण्याची परंपरा आपल्याकडे आहे. देशभरातील भाविक या नऊ दिवसात आपापल्या पद्धतीप्रमाणे देवीचे पूजन, व्रताचरण करतात. असे सगळे असले, तरी काही गोष्टींचे भान किंवा व्रतपूजनाचे नियम पाळणे आवश्यक असते, असे म्हटले जाते. दुर्गा देवीचे पूजन, आराधना, नामस्मरण, उपासना, जप-जाप, होम-हवन करण्यासाठी नवरात्र हा सर्वश्रेष्ठ काळ मानला जातो. नऊ दिवस देवीची पूजा करतात. रोज माळ बांधणे, कुमारीचे पूजन करणे, अखंड दीप लावणे, उपवास करणे, सप्तशतीचा पाठ करणे, सुवासिनींना भोजन घालणे, असे विविध कुळाचार, कुळधर्म केले जातात. नवरात्रोत्सवातील अष्टमी ही महाअष्टमी किंवा दुर्गाष्टमी म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी दुर्गेची महालक्ष्मीस्वरूपात पूजा करतात. महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती ही दुर्गेची तीन महत्त्वाची रूपे आहेत. 

 नवदुर्गांचे महात्म्य

नवदुर्गाचे प्रथम स्वरुप असलेली शैलपुत्री देवी तिच्या त्रिशुलाप्रमाणे त्रीलक्ष्य, धर्म, अर्थ आणि मोक्ष यांसह मनुष्याच्या मूलाधार चक्राचे सक्रीय बळ आहे. तर, बह्मचारिणी देवी आपल्या कमंडलू म्हणजेच पूर्व कर्म, प्रारब्ध आणि हातातील माळ म्हणजे नवनीत कर्म यांसह कुंडलिनी शक्तीचे प्रतिनिधित्व करत स्वाधिष्ठान चक्रची शक्ती आहे. आपल्यातील मणिपूर चक्र अर्थात नाभी चक्राची ऊर्जा असलेली चंद्रघंटा देवी जीवनात अनेक उत्तम क्षण आणि ब्रह्मांड ध्वनींसह हातातील कमळाच्या रुपात चिखलातही पवित्रता आणि स्निग्धतेच्या माध्यमातून अनेक लक्ष्य साध्य करण्यासाठी लागणाऱ्या एकाग्र आणि एकत्रितपणाचे द्योतक आहे. अनाहत चक्र म्हणजेच हृदय चक्र गतिशील, ऊर्जा प्रवाहित करणारी कुष्मांडा देवी हातातील शस्त्र, कमंडलू, पुष्प, अमृत, कलश, चक्र व गदा यांसह धनुष्यबाण यांसारख्या अनेक सिद्धी आणि निधींना एकत्रित करून लक्ष्याकडे अग्रेसर होण्याचे संकेत देते. विशुद्ध चक्र म्हणजेच कंठ चक्राची क्रियाशील शक्ती असलेली स्कंदमाता आपल्या हातातील पंकजाच्या रुपात एका केंद्रस्थानी चेतनाचा विस्तार परिलक्षित करते.

महागौरी सहस्राचाराची मध्यशक्ती

आज्ञा चक्राच्या ऊर्जेला कात्यायणी म्हटले जाते. आपल्या तलवारीच्या धारेप्रमाणे जीवात्माला आपल्या तत्व शब्दांनी बांधून परम चेतना सद्गुरू म्हणजेच परमात्म्यात एकरूप होण्याची प्रेरणा देते. कालरात्रि मुख्यत्वे करून सहस्रार चक्राचा पाया मानली जाते. आपल्या कृपाणाने सर्व बंधनातून मुक्त करत काल म्हणजे समय ज्याला ईश्वर मानले गेले आहे, त्यांची सहमती आणि कृपा प्रदान करून स्थूल शरीराच्या पुढे जाण्यासाठी कालरात्रि प्रेरित करते. महागौरी सहस्राचाराची मध्यशक्ती आहे. अभय मुद्रा, वर मुद्रा, डमरू मुद्रा आणि शूल यांच्या माध्यमातून महाध्वनी अर्थात परम नादाला जोडण्यास सहाय्यक होते. सहस्राचाराची उच्च ऊर्जा सिद्धिदात्री आपल्या अष्टसिद्धी, अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्यप, ईशित्व आणि वशित्व यांच्या मदतीने मोक्षाची गती प्रदान करते.

पराक्रमाचा गुणगौरव करणारा व्रतोत्सव

महासरस्वती ही सात्त्विक तेजाची देवता, महालक्ष्मी ही राजस तत्त्वाची निदर्शक, आणि महाकाली हे आदिमायेचे तामसी रूप अशी ही गुणविभागणी आहे. त्रिगुणाच्या रूपात अवतरलेली देवी सर्व भूतमात्रांच्या ठायी सामावलेली आहे. तिने आपल्या भक्तांना एक आश्वासन देऊन ठेवले आहे ज्या ज्या वेळी पृथ्वीवर अनाचार माजेल, सज्जनांना सुखाने जगणे अशक्य होईल त्या त्या वेळी मी अवतार घेऊन दुर्जनांचा संहार आणि सज्जनांचा उद्धार करीन, असे तिचे अभिवचन देवी भागवतात नमूद आहे. देवीची उपासना करणाऱ्यांनी विविध प्रकारे देवीची स्तोत्रे गायिली आहेत. दुर्गासप्तशती ऊर्फ देवी-माहात्म्य, श्रीदेवी भागवत इत्यादी अनेक ग्रंथांतून देवीचे पराक्रम, देवीच्या रूपाने स्त्रीशक्तीने या जगाला दुःख, दुर्दशेतून सोडविण्यासाठी केलेले प्रचंड पराक्रम, शब्दबद्ध केले आहेत. देवीच्या आरत्या, देवीची गीते, देवीवरील पदे अगणित संख्येत उपलब्ध आहेत. 

अत्यंत विलक्षण आणि अद्भूत असे नऊ दिवसांचे पर्व 

दोन ऋतुंच्या संधिकालात साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे नवरात्र. स्वतःचा शोध घेण्यासाठी अत्यंत विलक्षण आणि अद्भूत असे नऊ दिवसांचे पर्व आहे. हे महापर्व मानवाच्या अंतरिक ऊर्जेच्या विभिन्न प्रकारांचे प्रतिनिधित्व करते. याच ऊर्जेला नऊ देवींच्या शक्तीची उपमा दिली जाते. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायणी, कालरात्रि, महागौरी, सिद्धिदात्री या मनुष्यातील ऊर्जेची वेगळेवेगळी रुपे असल्याचे म्हटले जाते.

स्वतःमधील ऊर्जेला ओळखण्याचा हा काळ

भारतात साजरे केले जाणारे नवरात्री पर्व नितांत वैज्ञानिक धारणांची एक जीवंत परंपरा आहे. नवरात्री पर्वाला अंबा पर्व म्हटले गेले आहे. अंबा शब्द अम्म आणि बा यांपासून बनला आहे. काही ठिकाणी अम्मचा अर्थ जल आणि बा याचा अर्थ अग्नि म्हणजेच विद्युत वा वीज. म्हणूनच काही ठिकाणी नवरात्रीला विद्युतरात्री म्हणजेच शक्तीरात्र असेही म्हटले जाते. नवरात्रीला अहोरात्री असेही म्हटले जाते. स्वतःमधील ऊर्जेला ओळखण्याचा हा काळ मानला जातो.

नवरात्री हा स्वतःचा स्वत्वाचा शोध घेण्याचा काळ

आध्यात्मिक दृष्टिकोनातून याला स्वजागरण आणि आत्मबोधाचा काळ मानले गेले आहे. अपूर्ण आध्यात्मिक सामान्य ज्ञान याला शक्ती प्रदान करणे, संघर्ष करण्याच्या विस्ताराशी जोडण्याचे काम करते. संघर्ष याचा अर्थ बाह्य युद्ध नाही, तर शक्तीच्या माध्यमातून स्वतःमधील महाऊर्जा आहे. अंतर्मनाची शक्ती आहे. नवरात्री हा स्वतःचा स्वत्वाचा शोध घेण्याचा काळ आहे. त्रिरात्री स्वपरिचय आणि ज्ञान बोध, त्रिरात्री संकलन आणि संचरण म्हणजे प्रसार आणि त्रिनिशा अर्थ प्राप्ती असल्याचे सांगितले जाते. वैज्ञानिक चिंतनाप्रमाणे आपण आपल्या मेंदूचा काही टक्के वापर करतो. मात्र, आपल्यातील चेतना शक्तीत मेंदूपेक्षा नऊपट जास्त क्षमता असते. त्यामुळे चेतना शक्ती जागृत करून एकूणच आपली क्षमता वाढवण्याचा काळ म्हणजे नवरात्र असल्याचे म्हटले जाते. अंबामातेचा जयजयकार करूया. ‘जगदंब उदयोऽस्तु’ असे मुक्तकंठाने म्हणूया. देवीच्या नावाच्या मंत्राचा जप करून सर्व विश्वाची आई असलेल्या त्या परम करुण मायभवानीला भक्तिभावे वंदन करूया, तिच्या चरणी नतमस्तक होऊया.

 

टॅग्स :Navratriनवरात्रीNavratri Mahotsav 2025शारदीय नवरात्रोत्सव २०२५spiritualअध्यात्मिकchaturmasचातुर्मास