शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

Navratri 2022 Dates: नवरात्रोत्सव: कधी आहे घटस्थापना? यंदाचा शुभ मुहूर्त, तिथी, शुभ योग आणि महत्त्व जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 15:17 IST

Navratri 2022: यंदाच्या वर्षी संपूर्ण नऊ दिवस नवरात्र साजरे केले जाणार असून, घटस्थापनेसाठी शुभ मुहूर्त, महत्त्व आणि मान्यता जाणून घ्या...

चातुर्मासातील गणेशोत्सवानंतर महत्त्वाचा उत्सव म्हणजे नवरात्रोत्सव. नवरात्रात दुर्गा देवीच्या विविध स्वरुपांचे पूजन केले जाते. देवीचे पूजन, नामस्मरण, भजन उपासना करण्यासाठी नवरात्राचा काळ सर्वोत्तम मानला जातो. वास्तविक पाहता संपूर्ण मराठी वर्षात चार नवरात्र साजरी केली जातात. पैकी दोन नवरात्र गुप्त पद्धतीने केली जातात. मात्र, दोन मोठ्या प्रमाणावर साजरी केली जातात, त्यापैकी एक अत्याधिक महत्त्व असलेले नवरात्र म्हणजे शारदीय नवरात्र. यंदा २०२२ रोजी २६ सप्टेंबर ते ०४ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्र साजरे केले जाणार आहे. यंदाच्या नवरात्राचे विशेष, शुभ मुहूर्त, शुभ तिथी आणि शुभ योग कोणते, याबाबत जाणून घेऊया... (Navratri 2022 Dates)

यावर्षी शारदीय नवरात्र २६ सप्टेंबरपासून सुरू होत असून, ०५ ऑक्टोबरला विजयादशमी म्हणजेच दसऱ्याने नवरात्रीची सांगता होईल. ०४ ऑक्टोबर रोजी नवमी पूजन केले जाणार आहे. यंदा अतिशय विशेष आणि शुभ मानल्या जाणाऱ्या नवरात्रीमध्ये असा योगायोग घडला आहे, तो म्हणजे नवरात्र संपूर्ण ९ दिवस साजरे केले जाणार आहे. नवरात्रात एकही तिथी क्षय होणार नाही. जेव्हा नवरात्र ९ दिवस साजरे केले जाते, ते कल्याणकारी, शुभ ठरणारे असते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.  याशिवाय नवरात्रीच्या ९ दिवसांत अनेक शुभ योगही तयार होत आहेत. (ghatasthapana 2022 shubh muhurat)

घटस्थापनेसाठी शुभ मुहूर्त 

नवरात्राच्या पहिल्या दिवशी कार्याच्या संपन्नतेसाठी प्रार्थना करून घटस्थापना करण्याची प्राचीन परंपरा आणि पद्धत आहे. देशातील कोट्यवधी घरांमध्ये घटस्थापना करण्याची पद्धत रुढ आहे. तर काही ठिकाणी मोठ्या मंडळांमध्येही दुर्गादेवीसह घटस्थापना केली जाते. घरातील सुख, शांतता समृद्ध होण्यासाठी नवरात्रातील संपूर्ण दिवस घटस्थापना करून दुर्गा देवीचे पूजन केले जाते. 

घटस्थापना: सोमवार, २६ सप्टेंबर २०२२

प्रतिपदा आरंभ: पहाटे ०३ वाजून २३ मिनिटे

राहुकाळ: सकाळी ०७ वाजून ३० मिनिटे ते ०९ वाजेपर्यंत.

अमृत चौघडिया मुहूर्त: सकाळी ०६ वाजून ११ मिनिटे ते ०७ वाजून ४१ मिनिटे. 

शुभ चौघडिया मुहूर्त: सकाळी ०९ वाजून १२ मिनिटे ते १० वाजून ४२ मिनिटे. 

अशा परिस्थितीत सकाळी ०६ वाजून ११ मिनिटांपासून ते ०७ वाजून ३० मिनिटे आणि पुन्हा सकाळी ०९ वाजून १२ मिनिटे ते १० वाजून ४२ मिनिटांपर्यंत नवरातरी घटस्थापना करणे खूप शुभ राहील. जर या विशेष शुभ मुहूर्तावर कलश बसू शकत नसेल तर अभिजित मुहुर्तावर म्हणजे सकाळी ११ वाजून ४८ मिनिटे ते दुपारी १२ वाजून ३६ मिनिटे या वेळेत कलशपूजन केले जाऊ शकते. 

नवरात्रोत्सवात अनेक शुभ योग

या वेळी नवरात्रात अश्विन शुक्ल प्रतिपदा तिथीला सकाळी सूर्योदयाच्या वेळी सर्वार्थ सिद्धी नामक शुभ योग होईल. यासोबतच अमृत सिद्धी योगही प्रभावी होणार आहे. या सर्वांमध्ये उत्तम योगायोग असा की, या दिवशी हस्त नक्षत्र संपूर्ण दिवस राहील. यंदाच्या वर्षी दुर्गा देवी हत्ती वाहनावर आरुढ होऊन पृथ्वीवर येईल. याच वाहनावर आरुढ होऊन दुर्गा देवी परत जाईल, असे सांगितले जात आहे. दुर्गा देवीचे हत्ती वाहन अतिशय शुभ मानले जात असून, याचा अत्यंत सकारात्मक परिणाम देश-दुनियेवर पाहायला मिळू शकेल, असे सांगितले जात आहे. 

टॅग्स :Navratriनवरात्रीReligious programmeधार्मिक कार्यक्रम