शहरं
Join us  
Trending Stories
1
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
2
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
3
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
4
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
5
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
6
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
7
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
8
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
9
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
10
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
11
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
12
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
13
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
14
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
15
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
16
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
17
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
18
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
19
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
20
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!

Navratri 2021 : घटस्थापना कशी करावी आणि नवरात्रीचे उत्थापन कसे करावे, याची शास्त्रशुद्ध माहिती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 16:50 IST

Navratri 2021 : देवीची घटस्थापना आणि घटाचे उत्थापन कसे करावे, कधी करावे याची सविस्तर माहिती.

आश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्र सुरू होते. यंदा ७ ऑक्टोबर रोजी नवरात्रीस प्रारंभ होत आहे. नवरात्रीनिमित्त अनेक घरात घटस्थापना करण्याचा कुळाचार आहे. अनेक जणींना घटस्थापना करण्याची इच्छा असते, परंतु शास्त्रशुद्ध पद्धत माहित नसते. चला तर जाणून घेऊया घटस्थापनेचा आणि नवरात्री उत्थापनाचा शास्त्रशुद्ध विधी!

घटस्थापना विधी : 

घट बसतेवेळी देवीची पूजा करावी. पूजा केलेला टाक घ्यावा. अभिषेक करावा नंतर स्थापना करावी. स्थापना करण्यापूर्वी प्रथम पाट घ्यावा. त्यावर गहू पसरून पाण्याने भरलेला कलश ठेवावा. पाण्यात पैसे, सुपारी घालावी. तांब्यावर गव्हाने भरलेले लहान ताम्हन ठेवावे. त्यात देवीचा टाक ठेवावा. 

हळद-कुंकू गंध, फुल यांनी पूजा करावी. या दिवशी गव्हाचे महत्त्व जास्त असते. पाटापुढे शंख, घंटा ठेवावी. खाली पत्रावळ ठेवून पत्रावळीवर चाळलेली काळी माती टाकून गहू, पुन्हा माती, पुन्हा गहू पेरावेत. असे दोन तीन वेळा करावे. मध्ये पेल्यासारखे भांडे ठेवून त्यांची पूजा करावी. 

यात पाणी, हळद, कुंकू वाहून फुलांची माळ करून त्यावर सोडावी. कलशाची पूजा करावी. पाटावर रांगोळी काढावी. कारळ्याच्या फुलांची किंवा झेंडुच्या फुलांची माळ करावी. ही फुले मिळाली नाहीत, तर अन्य कोणत्याही सुवासिक फुलांची माळ नवरात्रीत नऊ दिवस घटावर रोज एक याप्रमाणे बांधावी. 

शक्य झाल्यास नवरात्रीत नऊ दिवस चोवीस तास समई तेवत ठेवावी. ज्या दिवशी एका तिथीचा क्षय असेल त्या दिवशी दोन वेळा माळा घालून नऊ दिवसांच्या माळा पूर्ण कराव्यात. रोज आपण फराळाचे जिन्नस करतो, त्यांचा नैवेद्य दाखवून नंतर फराळ करावा. रोज सायंकाळी देवीची आरती, जप, पोथीवाचन करावे.

Navratri 2021: आश्विन मास सुरू होत आहे, जाणून घेऊया दुर्गापूजेच्या विविध पद्धती!

नवरात्र उत्थापन  विधी : 

रावणाशी युद्ध करण्यापूर्वी त्यात यश मिळावे म्हणून श्रीरामांनीदेखील नवरात्र व्रत केले होते. रावणवध दशमीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी केला. म्हणून काहीजणांकडे नवरात्र दसऱ्याच्या दिवशी उठवण्यात येते. तर काही जणांकडे दसऱ्याच्या आदल्या दिवशी म्हणजे नवमीला सायंकाळनंतर उठवण्यात येते.

नवरात्र उठते वेळी प्रथम देवीची पूजा करून घटाला माळ घालून करावी. नंतर माळ वर खुंटीवर ठेवावी. टाक ताम्हनात घेऊन अभिषेक करावा. धुवून पुसून देवघरात स्थापना करावी व पूजा करावी. 

जेवणाचा नैवेद्य दाखवून, पुरणाचे दिवे तयार करून पुरणाची आरती करावी. पुरणाचे दिवे नऊ, पाच, सात असे करावेत सर्व दिवे लहान करावेत एक दिवा मोठा करावा. सर्व दिव्यात तूप आणि वात घालावी, मोठ्या दिव्यात हाताने केलेल्या दोरीच्या पाच वातीचा एक जुडगा लावावा. पुरणाची आरती करावी.

कलशातील पाणी घराच्या चारही दिशांना शिंपडून घ्यावे आणि बाकीचे तुळशीत ओतावे. दाराला आंब्याचे तोरण लावावे. दूध साखरेचा नैवेद्य दाखवून नवरात्रीचे उत्थापन करावे. 

जगदंब उदयोस्तु...!

टॅग्स :Navratriनवरात्री