शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Navratri 2021 : शरीर व मन कणखर, खंबीर करायचे असेल, तर 'अशी' करा देवी शैलपुत्रीची साधना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 17:43 IST

Navratri 2021 : देवी ऊर्जा रूपाने आपल्या शरीरामधे कुठे आहे, त्याची तत्त्व, स्थान काय आणि त्याची साधना, त्याच्या मंत्रासकट कशी करावी, हे आपण या लेखमालेमधून ज्ञात करून घेणार आहोत.

>> आचार्य विदुला शेंडे

नऊ दुर्गेची रूपे, तिने धारण केलेले शस्त्र, वस्त्र, त्याचा रंग व त्या पाठीमागचे शास्त्र, ही देवीची सगुण आराधना आपण करतो. तीच ऊर्जा रूपाने आपल्या शरीरामधे कुठे आहे, त्याची तत्त्व, स्थान काय आणि त्याची साधना, त्याच्या मंत्रासकट कशी करावी, हे आपण या लेखमालेमधून ज्ञात करून घेणार आहोत. चंद्र जसा अमावस्येपासून कलेकलेने पौर्णिमेपर्यंत वाढत जातो, त्या प्रमाणेच पहिले नऊ दिवस हे स्त्री तत्त्व शक्ती वाढत जाते व शारदीय नवरात्रात ते १००० पटीने वाढते. पहिली माळ म्हणजे अश्विन शुद्ध प्रतिपदा हा दिवस. देवीचे पहिले रूप म्हणजे 'शैलपुत्री!'

Navratri 2021 : नवरात्रीत देवीची केवळ पूजा नाही तर 'शक्तीची उपासना' करा! - प.पु. पांडुरंगशास्त्री आठवले

शैलपुत्री- मूलस्थित बीजमंत्र साधना-

शैल म्हणजे पाषाण आणि त्याची पुत्री म्हणजे मुलगी ही शैलपुत्री, ही हिमालयाची कन्या. पाषाण तत्त्व म्हणजेच मूळापासून धरेपासून आभाळाकडे जाणारे स्थिर तत्त्व म्हणजेच देवीच्या या रूपाची आराधना केली तर पाषाणासारखी अढळता आपल्या शरीरात व मनात येते आणि शरीर व मन कणखर, खंबीर, नीडर, शांत होते.

शैलपुत्रीचे वाहन वृषभ म्हणजेच शंकरासमोरील नंदी आहे. वृषभ जसा बलवान, कारण तो जमीन नांगरून तिला शतपट उपजाऊ करतो, तसेच ही शैलपुत्री ची साधना आपल्याला शतपटीने कार्यरत करते.

मूलाधार चक्र हे शैलपुत्री तत्त्वाचे आराध्य स्थान, जिथे ही शक्ती आपल्याला साधनेने आत्मविश्वास, सृदृढपणा, आरोग्य देते. ही शक्तीचालिनी लाल रंगाचे प्रतिक चार पाकळ्यांच्या कमळाच्या प्रतिकात आहे. जी शौर्य, वीरतेचे प्रतीक आहे. ही शक्ती आपल्याला रक्षण कसे करायचे हे सांगते. हीचा ग्रह चंद्र, जो मनाचा कारक आहे, त्यामुळे मानसिक स्थिती मजबूत करण्यासाठी हिची साधना करावी.

या देवीचे बीजमंत्र अगदी सोपे आहेत-

ऊँ देवी शैलपुत्रै नम: ऊँ ऐं ऱ्हीम क्लीं चामुण्डाय विच्चैऊँ शैलपुत्री दैव्यै नम:

मनुष्याची ध्येय व आकांक्षा उच्च असतात. त्याच्यासाठी मार्ग सुद्धा उच्च लागतो. कोणताही पर्वत चढणे सोपे नाही. अनेक संकटे, काटेकुटे यांना तोंड द्यावे लागते. तसेच ध्येय गाठणे सोपे नाही. त्यासाठी मार्ग दाखवायला ही शक्ती सहाय्य करते. पण मार्गक्रमण मात्र आपल्यालाच करायचे आहे. ध्येय गाठले की मात्र थकवा, शिणवटा दूर होतो व धन्यता वाटते. ती ही पहाड चढण्याची शक्ती, तनामनात व्यापून उरते. त्यामुळे आपण अचल ध्येयाबद्दलचा आत्मविश्वास, निर्भयता, कोणत्याही विपरित परिस्थितीवर मात करून अस्तित्त्व टिकवून ठेवण्यासाठी जी दिशा महत्त्वाची, महत्वाकांक्षा महत्त्वाची हेच ते जीवनाचे संरक्षित कवच म्हणजे शैलपुत्री शक्ती!

Navratri 2021 : पहिली माळ : स्वाभिमानी, तपस्विनी, व्रतस्थ अशा शैलपुत्रीची कहाणी!

शैलपुत्री या शक्तीच्या उजव्या हातात त्रिशूल आणि डाव्या हातात कमळ आहे. पाषाणाचे तुकडे झाल्यावर त्याची माती होऊन पाणी मिसळले की चिखल होतो पण त्यातूनच कमळ उगवते, तसेच आपल्यामधील विकारांचा नाश झाला की आपणही कमळासारखे शुद्ध, स्वच्छ, आनंदी होतो. जर हे विकार नष्ट होत नसतील, तर त्रिशुळाचा वापर करायचा, म्हणजे त्रिगुण वापरून नंतर गुणातीत व्हायचे. आपल्याला त्रिशुळ वापरून त्यांचा नाश करायला ही शक्ती सहाय्य करते. 

टॅग्स :Navratriनवरात्री