शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Navratri 2021 : परिपूर्ण आत्मसमर्पण करणाऱ्याला देवी कात्यायनी दर्शन देतेच; वाचा तिचा महिमा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 12:37 IST

Navratri 2021 : ही शक्ती साधकाला विज्ञानाकडून ज्ञानाकडे आणि ज्ञानाकडून पारलौकिक ज्ञानाकडे घेऊन जायला साधकाला मदत करते.

>> आचार्य विदुला शेंडे

या देवी सर्वभुतेषु शक्तिरूपेण संस्थितः नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः ||

अश्विन शुद्ध षष्टी म्हणजे घटाची सहावी माळ, या दिवशी दुर्गेचे कात्यायानी देवीम्हणून पूजन केले जाते. परिपूर्ण आत्मज्ञान समर्पण करणाऱ्याला ही देवी नक्कीच दर्शन देते, या देवीचे शक्तीस्थान हे "आज्ञाचक्र". जे दोन भुवयांमध्ये अंतस्थ खोलवर आहे. यामुळे योग साधनेत या शक्ती आराधनेला खूप महत्व आहे.

कात्यायानीहे नाव या शक्तिरूपाला का दिले याची पुराणात एक कथा आहे. कत नावाचे ऋषी त्यांना कात्य नावाचा पुत्र व या कात्या च्या गोत्रात , कात्यायनाने जन्म घेतला व त्याने जगन्माता पार्वतीची आराधना केली, आणि देवीने त्यांच्या घरी जन्म घ्यावा अशी इच्छा व्यक्त केली . आणि ही पराम्बा महिशासुराच्या विनाशासाठी ब्रह्मा-विष्णू-महेश यांच्या तेजामधून उत्पन्न झाली तिची कात्यायनाने सप्तमी-अष्टमी आणि नवमी अशी तीन दिवस पूजा केली आणि दहाव्या दिवशी तिने महिशासूर राक्षसाचा वध केला. कात्यायनानेतिची पूजा केली म्हणूनसुद्धा तिला कात्यायानी देवीअसे नाव पडले.

या शक्तीची पूजा कालिंदीच्या तीरी ब्रज गोपिकांनी श्रीकृष्णाला पती रूपात प्राप्त करण्यासाठी केली म्हणून तिला ब्रज मंडळाची अधिष्ठात्री देवी असेही म्हणतात. अत्यंत तेजपपुंज , दैदिप्यमान असे तेज असलेली ही चतुर्भूजु देवी आहे. जिच्या उजव्या वरच्या हाताची अभय मुद्रा व खालच्या हाताची वरदमुद्रा व डाव्या वरील हातातील तलवार व खालच्या हातात कमळ आहे.

या देवीचे विज्ञान युगात खूप महत्व आहे. कारण ही संशोधनाची देवता आहे. त्यामुळे साधक आत्मसंशोधन करून आपल्या गंतव्य स्थानाकडे ध्येयाकडे वाटचाल करतो..कात्यायानी शक्तीच्या आराधनेने भक्तांना धर्म, अर्थ, काम, मोक्ष सरळपणे प्राप्त होतात.या भूलोकात राहून साधक अलौकिक, तेजस्वी, दिसू लागतो कारण ही शक्ती अंतर्गत जागृतीने भक्ताला " स्व " च्या संशोधनाकडे नेते व आत्मोन्नतीची जाणीव होते..

या शक्तीचे स्थान आज्ञाचक्र असल्यामुळे साधकांमध्ये समत्व येण्यासाठी मदत होते. प्रत्येक गोष्ट साक्षीभावाने पाहण्यास साधक उद्युक्त होतो. सगळ्या गोष्टींचा मुलामा भासमान रूप लक्षात घेऊन खरे रूप प्रकट होते मग ती व्यक्ती किंवा वस्तू काहीही असू देत साधकाच्या मनातील भय, शोक, मनःस्ताप नष्ट होऊन जन्म जन्मतारीचे कर्मभोग नष्ट होतात असे ऋषी मुनींनी सांगितले आहे. दिल्लीमध्ये छत्तरपूर या ठिकाणी या देवीचे मंदिर आहे.

ही शक्ती साधकाला विज्ञानाकडून ज्ञानाकडे आणि ज्ञानाकडून पारलौकिक ज्ञानाकडे घेऊन जायला साधकाला मदत करते. त्यामुळे या भक्तांमध्ये दूरदर्शीपणा आणि काळाची पावले ओळखण्याची ताकद निर्माण होते. या कात्यायानी देवी  शक्तीचा बीजमंत्र व श्लोक पुढील प्रमाणे-

मंत्र - ऊँ क्लिं श्रीं त्रिनेत्राय नम:

 श्लोक- कंचनाभा वराभयं पद्मधरां मुकुटोज्जवलंस्मेरमुखीं शिवपत्नी कात्यायनी नमोस्तुते।

टॅग्स :Navratriनवरात्री