शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

National Handwriting Day 2023: आज राष्ट्रीय हस्ताक्षर दिन, तुमच्या हस्ताक्षरावरून जाणून घ्या तुमचे व्यक्तिमत्त्व!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 11:09 IST

National Handwriting Day 2023: सद्यस्थितीत आपला लेखनाचा सराव सुटलेला असला तरी बालपणीचे तुमचे अक्षर आठवून दिलेले भाकित स्वभावाशी जुळते का बघा!

मोबाईल आणि कॉम्प्युटर आल्यापासून आपलाच काय पण विद्यार्थ्यांचाही लेखनाचा सराव सुटला आहे. कोव्हीड काळात तर जरा जास्तच! मध्यंतरी बातमी होती, की सगळा अभ्यास संगणकीय पद्धतीने झाल्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यात अडचणी येत आहेत. याचाच अर्थ लेखनाशी आपण किती दुरावलो आहोत ते पहा! बालपणी किती निगुतीने हस्ताक्षर रेखाटण्याचा आपण प्रयत्न केला असेल, परंतु आता कोणी काही लिहायला सांगितले, तर कागदावर जणू काही किडा मुंग्यांची पावले उमटतील. तर काही जणांचे अक्षर एवढे वाईट येते की त्यांना स्वतःलाही वाचता येत नाही. परंतु, अजूनही काही जणांचे अक्षर अगदी मोत्याच्या दाण्यासारखे रेखीव असते. लिखाणाचा सराव असो व नसो, परंतु आपल्या हस्ताक्षरावरून स्वभाव कळतो असे म्हणतात. याचे स्वतंत्र शास्त्र आहे आणि त्याचा सखोल अभ्यास करणारे अभ्यासकही आहेत. अशाच काही गोष्टींवरून आपण आपला आणि इतरांचा स्वभाव हस्ताक्षराशी मेळ खातोय का, ते पाहूया...!

>> छोटे अक्षर स्वार्थी, निग्रही व्यक्तिमत्त्वाचे लक्षण मानले जाते. याउलट मोठे अक्षर नेतृत्वाचे गुण दर्शवते. 

>> स्वभावाबरोबर हस्ताक्षर बदलते आणि हस्ताक्षराबरोबर स्वभाव बदलतो. 

>> स्वच्छ, टापटीप हस्ताक्षर असणारी व्यक्ती तिच्या राहणीमानाबाबतही टापटीप असते. 

>> ज्यांचे हस्ताक्षर ओळीच्या वर डोकावत राहते, ते लोक म्हत्त्वाकांक्षी असतात. ते आपले ध्येय जिद्दीने मिळवतात. 

>> ज्यांचे अक्षर वळणदार असते, ते लोक प्रत्येक बाबतीत गोपनीयता ठेवतात आणि कधीही कोणतीही खेळी खेळू शकतात. 

>> ज्यांचे अक्षर सुरुवातील मोठे आणि पुढे पुढे मुंगीच्या पावलांसारखे लहान लहान होत जाते, असे लोक अतिशय लबाड असतात.

>> ज्यांचे अक्षर सुरुवातील रेखीव आणि नंतर कोंबडीच्या पायासारखे असते, ते लोक आरंभशूर असतात. कामाची सुरुवात उत्साहाने करतात पण लगेचच त्यांचा उत्साह मावळत जातो. 

>> ओळीला जोडून काढलेले अक्षर हे वक्तशीरपणा, एकनिष्ठता आणि वचनाला पक्के असण्याची खूण आहे. असे लोक अतिशय प्रामाणिक असतात. 

>> ज्यांचे अक्षर सुरुवातीपासून शेवट्पर्यंत एकसारखे असते, असे लोक सरळ स्वभावाचे तसेच ईमानदार, उदार असतात.