शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Narasimha Jayanti 2022: श्री नृसिंह जयंतीनिमित्त जाणून घ्या भगवान विष्णूंच्या या अवतारामागचे प्रयोजन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 06:34 IST

Narasimha Jayanti 2022: 'धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे' हे गीतेत दिलेले वचन भगवंतांनी वेळोवेळी कसे पूर्ण केले आहे, हे सांगणारी नृसिंह अवताराची कथा जाणून घ्या!

भगवान नृसिंह हा भगवान विष्णूचा अवतार मानला जातो. नृसिंह जयंती हा दिवस वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशीला साजरा केला जातो. यंदा १४ मे रोजी नृसिंह जयंती आहे. या दिवशी भगवान नृसिंहाने स्तंभ फोडून आपला भक्त प्रल्हाद याचे रक्षण करण्यासाठी अवतार घेतला. त्या प्रसंगाची आठवण म्हणून हा सोहळा साजरा केला जातो. नृसिंह जयंतीच्या दिवशी, भगवान नृसिंहाच्या बीज मंत्राचा जप केल्याने शत्रूंचा नाश होतो तसेच शत्रूवर सर्वतोपरी विजय मिळवता येतो. 

हिरण्यकशिपुने मागितलेल्या वरानुसार, `पशू, मानव, देव किंवा दानव यांच्याकडून मृत्यू होणार नव्हता. तसेच रात्र किंवा दिवस आणि बारा मास अशा कालावधीत त्याला मृत्यू येणार नव्हता. म्हणून नृसिंह अवतार घेऊन भगवान विष्णूंनी  अर्धा पशु, अर्धा मानव असा देह धारण केला. आकाश आणि जमीन यांचा मध्य म्हणून उंबरठ्यावर बसून, सायंकाळी आपल्या तीक्ष्ण नखांनी हिरण्यकशिपुचा वध केला. 

नृसिंह अवताराची सविस्तर कथा :

आपणा सर्वांनाच भक्त प्रल्हाद माहित आहे. हिरण्यकशिपु नावाच्या दैत्याच्या उदरी जन्म घेऊनसुद्धा प्रल्हादावर देव-धर्माचे संस्कार झाले. कारण, प्रल्हादाची आई गर्भवती असताना महर्षि नारदांच्या आश्रमात होती. नारदांकडून तिने दैवी विचारांचे श्रवण केले होते. परिणामी असूर कुळात जन्माला येऊनही प्रल्हादाच्या मुखी नारायणाचे नाव होते. 

याच गोष्टीचा राग येऊन हिरण्यकशिपुने अनेकदा प्रल्हादाला नारायणाचे नाव न घेण्याची तंबी दिली. परंतु प्रल्हादाने खूप परिश्रम करून भारतीय संस्कृतीचा अभ्यास केला होता़ भगवंताचे नावच शाश्वत आहे. त्यातच चिरंतन सुख आहे, हे लक्षात घेऊन त्याने बालवयातच तत्कालीन राजसत्तेच्या विरूद्ध बंडाचे निशाण उभारले. त्यामुळे त्याला जन्मदात्या पित्याचा रोष सहन करावा लागला. 

उंच पर्वतावरून खाली फेकले, विषारी सर्प डसविले, उकळत्या तेलात टाकले, तरी प्रल्हादाला कोणतीच इजा होत नाही पाहून, त्याच्या वडिलांचा आणखीनच संताप झाला. त्यांनी विचारले, `तुला कोण वाचवतो?' त्यावर प्रल्हाद म्हणाला, `सर्वव्यापी परमेश्वर. नारायण.' खांबाकडे करांगुली दाखवत, हिणवत हिरण्यकशिपुने विचारले, `यातही आहे का तुझा नारायण?' त्याने होकारार्थी मान डोलावताच त्या खांबातून अक्राळ-विक्राळ रूप धारण करत नससिंह प्रगट झाला आणि त्यानेच सर्व जनतेचा छळ करणाऱ्या हिरण्यकशिपुचा वध केला. 

अर्धा नर अर्धा पशु, अशा नृसिंह अवताराचे कारण काय असेल? - पांडुरंगशास्त्री आठवले 

पांडुरंग शास्त्री आठवले, 'दशावतार' या पुस्तकात, नृसिंह अवताराचा युक्तीवाद करताना म्हणतात, `एखाद्या समाजातून हा सिंहासारखा वीर उभा राहतो आणि त्याच्या बोलण्याने संपूर्ण समाजात एकप्रकारची उत्तेजना पसरते. शेकडो लोक त्याच्या पाठिशी उभे राहतात. सिंहासारखा क्रूर बनलेला, यशापयशाचा विचार न करता हा अविवेकी असंघटित समाज हिरण्यकशिपुवर तुटून पडला आणि त्याने त्याला मारून टाकले. नराचे प्रेम आणि सिंहाचे अविवेकी कार्य! नर आणि सिंह दोघांचे गुण एकत्र झाल्यावर नृसिंह अवतरित झाला आणि हिरण्यकशिपु मारला गेला. खांबाप्रमाणे निर्जिव असलेल्या एका स्तंभातून चैतन्य उसळून आले आणि भक्त प्रल्हाद  व समस्त जनता भयमुक्त झाली.'

त्यामुळे आपल्यालाही भयमुक्त व्हायचे असेल, तर विष्णूभक्ती शिवाय कोणताही पर्याय नाही.