शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

Nag Panchami 2023: महाकालेश्वराचा तिसरा दरवाजा उघडतो फक्त नागपंचमीच्या दिवशी; जाणून घ्या कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 11:19 IST

Nag Panchami 2023: श्रावण मासात महाकालेश्वराची पूजा ठरलेली असते, नागपंचमीच्या निमित्ताने त्याच्या तिसऱ्या दारामागचे रहस्यही जाणून घेऊ. 

उज्जयिनीचे महाकालेश्वर मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. त्रिपुरासुर माजला होता. त्याचा वध शिवशंकरांनी केला. याचाच अर्थ त्रिपुरासुरावर विजय मिळवला. म्हणून या ठिकाणाचे नाव उज्जयिनी आहे. तिथे शिव शंकरांची आपल्या परिवारासह शेषावर विराजमान झालेली अद्भुत मूर्ती आहे. अशा मूर्तीचे दर्शन अन्यत्र  कोठेही घडत नाही. हे मंदिर ज्योतिर्लिंगासाठी प्रसिद्ध आहे . परंतु या मंदिराच्या तीन भागांपैकी सर्वात वरचा भाग तो म्हणजे नाग चंद्रेश्वर मंदिराचा भाग हा केवळ नागपंचमीच्या (Nag Panchami 2023) दिवशी २४ तास खुला असतो आणि त्याच दिवशी या सुंदर मूर्तीचे दर्शन घेता येते. 

महाकालेश्वर मंदिर तीन भागात विभागले आहे. गर्भगृहात अर्थात तळ घरात महाकालेश्वर विराजित आहेत. मधल्या भागात ओंकारेश्वर विराजित आहेत आणि वरच्या भागात नाग चंद्रेश्वर विराजित आहेत. या मंदिरात माता सतीचे कोपर गळून पडले होते म्हणून हे एकावन्न शक्तिपीठांपैकी एक मानले जाते व तिथे देवीच्या कोपराची पूजा केली जाते. गर्भ गृह आणि मध्य गृह दर्शनासाठी नेहमी खुले असतात, परंतु नाग चंद्रेश्वराचा भाग दर्शनासाठी केवळ नागपंचमीलाच खुला केला जातो. 

नाग चंद्रेश्वर मंदिरात असलेली मूर्ती अकराव्या शतकातली आहे असे म्हटले जाते. ही मूर्ती नेपाळवरून आणली असल्याचे पुरावे आहेत. आपण नेहमी विष्णूंना शेष शय्येवर विराजमान झालेले पाहतो, परंतु याठिकाणी समस्त शंकर कुटुंबीय शेष शय्येवर विश्रांती घेत असलेले दिसतात. ही प्रतिमा केवळ अद्भुत आहे. या मंदिरात असलेल्या नागमूर्तींच्या दर्शनाने सर्व प्रकारचे सर्पदोष नष्ट होतात अशी श्रद्धा आहे, म्हणून नागपंचमीच्या दिवशी भाविक मोठ्या प्रमाणात तिथे दर्शनासाठी गर्दी करतात. 

कोव्हीड मुळे सलग दोन वर्षे भाविकांना दर्शन घेता आले नाही, परंतु प्रथेमध्ये आजतागायत खंड पडलेला नाही. नागपंचमीच्या दिवशी तिथे त्रिकाल पूजा केली जाते. पहिली पूजा नागपंचमीची तिथी सुरु होते तेव्हा, दुसरी सूर्योदयाला आणि तिसरी सूर्यास्ताला केली जाते. आज नागपंचमीच्या निमित्ताने आणि श्रावण मासाच्या निमित्ताने आपणही नाग चंद्रेश्वराचे आणि महाकालेश्वर तसेच ओंकारेश्वराचे चित्रमय दर्शन घेऊन पावन होऊया. हर हर महादेव! 

टॅग्स :Nag PanchamiनागपंचमीShravan Specialश्रावण स्पेशल