शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

Nag Panchami 2023: कालसर्प दोषातून मुक्ती मिळवण्यासाठी नागपंचमीला करा 'हे' प्रभावी उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2023 12:04 IST

Nag Panchami 2023: यावर्षी २१ ऑगस्ट २०२३ रोजी नामपंचमी साजरी केली जाणार आहे. या दिवशी कालसर्प दोष दूर करण्याचीही संधी असते. कशी ते जाणून घेऊ. 

श्रावण शुद्ध पंचमीचा दिवस नागपंचमी (Nag Panchami 2023)म्हणून साजरा केला जातो.  शास्त्रानुसार या दिवशी नागांची पूजा केल्याने व्यक्तीला कालसर्प दोषापासून (Kal Sarpa Dosha) मुक्ती मिळते. तसेच आध्यात्मिक शक्ती, संपत्ती प्राप्त होऊन अन्य इच्छा पूर्ण होतात. या दिवशी काही विशेष उपाय देखील फायदेशीर ठरतात. नागपंचमीच्या दिवशी, कालसर्प दोषाने पीडित लोक भगवान शंकराची विधिवत पूजा करतात आणि विशेष मंत्रांचा जप करतात. या पूजेचे फलित म्हणजे कालसर्प दोषातून सदर व्यक्तीची सुटका होते. परंतु कालसर्प पूजेसाठी तीर्थक्षेत्री जाणे, पूजा करणे सर्वांना शक्य होईलच असे नाही. तसेच परवडेलच असे नाही. यासाठी ज्योतिष शास्त्राने काही मंत्र दिले आहेत, त्यांचा जप विशेषतः नागपंचमीला करावा असे सुचवले आहे.

काल सर्प दोष किंवा राहूच्या शांतीसाठी उपासना करण्यासाठी 'ओम नवकुले विद्यामहे विषदन्तै धीमहि तन्नो सर्प: प्रचोदयात' या नाग गायत्री मंत्राचा जप कालसर्प दोष (Kal Sarpa Dosha) दूर करण्यात प्रभावी ठरतो. याशिवाय नागपंचमीला 'ओम नमः शिवाय' आणि 'ओम नागदेवताय नमः' या मंत्राचा जप देखील उपयुक्त ठरतो. या मंत्राचा जप दिवसातून १०८ वेळा करावा. 

कालसर्प आणि नागपंचमी यांचा परस्पर संबंध : 

श्रावण शुद्ध पंचमीला साजरी होणारी नागपंचमी ही नागांना समर्पित असून या दिवशी नागांची पूजा श्रद्धेने करावी. वेद आणि पुराणात नागांची उत्पत्ती कश्यप ऋषींपासून झाल्याचे मानले जाते. शास्त्रानुसार ब्रह्मा, विष्णू महेश यांचा नागावर लोभ दिसून येतो. पुराणात भगवान सूर्याच्या रथात बारा नागांचा उल्लेख आहे. भगवान श्रीकृष्णाचे शेषनागावरील प्रेम कुणापासून लपलेले नाही. ब्रह्मदेवांनी नागांना वरदान दिले आणि नागपंचमीला त्यांची पूजा केली जाईल असे सांगितले.  त्यामुळे नागपंचमीचा हा सण खूप महत्त्वाचा आहे. या सर्व देवतांचा नागाप्रती असलेला लोभ पाहता कुंडलीतील सर्प दोष दूर करण्यासाठी नागपंचमी (Nag Panchami 2023)या तिथीची निवड केली जाते. व त्या दिवशी वरील उपाय केले जातात. 

नागपूजेबरोबरच पुढील नियम पाळावेत : 

या दिवशी मातीपासून फुले, फळे, धूप, दिवे आणि इतर विविध रूपांनी साप बनवून त्यांची पूजा केली जाते. नागपंचमीच्या दिवशी विशेषत: संतानप्राप्तीसाठी, कालसर्प दोष, कुष्ठरोग, क्षयरोग दूर करण्यासाठी तसेच लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि कोणत्याही प्रकारच्या भयंकर दुःखापासून मुक्ती मिळावी यासाठी पूजा केली जाते.

नागपंचमीला हे उपाय करा

>>असे मानले जाते की ज्या लोकांच्या कुंडलीत कालसर्प योग आहे, त्यांनी श्रावण महिन्यात विशेषतः नागपंचमीच्या दिवशी रुद्राभिषेक करावा. त्यानंतर गरजू ब्राह्मणाला किंवा गरजू व्यक्तीला दान धर्म करावा. 

>>ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीत कालसर्प दोष असल्यास नाशिकचे पवित्र ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन नागपंचमीच्या दिवशी पूजा केल्यास काल सर्प दोषापासून मुक्ती मिळते.

>>जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत काल सर्प दोष असेल तर त्या व्यक्तीने गळ्यात ८, ९ आणि १० मुखी रुद्राक्ष धारण करावे. तसेच महामृत्युंजय मंत्राचा जप नियमितपणे करावा.

>>ज्यांना कालसर्प दोष शांती करणे परवडणार नाही, अशा लोकांनी काल सर्प दोष निवारण स्तोत्र नागपंचमीला म्हणावे, असे ज्योतिष शास्त्र सांगते. 

>>ज्योतिषशास्त्रानुसार, श्रावण महिन्यात राहु-केतूच्या मंत्रांचा नियमित जप केल्याने काल सर्प दोषाचा प्रभावही कमी होऊ शकतो.

टॅग्स :Nag PanchamiनागपंचमीAstrologyफलज्योतिष