शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

शाकंभरी नवरात्रीनिमित्त महिषासुरमर्दिनी स्तोत्रातील श्लोकांचा भावार्थ! (भाग १)

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2021 9:00 AM

महिषासुर मर्दिनी स्तोत्र आपण आजवर बऱ्याचदा ऐकले असेल. त्याची लयबद्ध रचना आपल्याला भुरळ पाडते. परंतु त्याचा अर्थ समजून घेतला, तर स्तोत्र ऐकण्याचा आनंदही द्विगुणीत होईल. शाकंभरी नवरात्रीनिमित्त येत्या आठ दिवसात रोज तीन प्रमाणे चोवीस श्लोकांचा भावार्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूया. 

रवींद्र गाडगीळ 

महिषासुर मर्दीनी स्तोत्र ही पद्य पुष्पांजली संस्कृतात आहे. ऐकायला इतकी गोड आहे की तुम्ही गुणगुणायला लागता सुद्धा. कारण ह्यात जे यमक अलंकार आहेत ते एकच शब्द चार चारदा आले आहेत. परंतु गंमत म्हणजे त्या चारी शब्दांचे अर्थ मात्र वेगवेगळे आहेत. जगद्गुरु शंकराचार्यांच्या प्रत्येक रचनेत हे आपल्याला दिसून येईल. तसेच ह्या पुष्पांजलिचे रचयिते नेमके सांगता येणार नाही. परंतु शब्दरचना मात्र शंकरचार्यांशी जवळीक दाखवते. नवरात्रीत आपण देवीची विविध प्रकारे पुजा करीत असतो, त्यातलीच ही एक तालासुरावर भजनसेवा!!

अयि गिरी नंदिनी, नंदित मेदिनि, विश्व विनोदिनी नन्द्नुते, गिरीवर विंध्यशिरोधिनि वासिनि, विष्णु विलासिनि जिष्णुनुते | भगवती हे शितिकंठ कुटुंबिनि, भूरि कुटुंबिनि भुरिकृते, जय जय हे महिषासुर मर्दिनि रम्य कपर्दिनि शैलसुते ||१||

पर्वतांचा राजा जो हिमालय त्याची कन्या, संसारातल्या प्रत्येक जीवाला आनंदित करणारी देवी, आणि विश्वाला विनोद घडवून त्यांच्या मुखावर कायम हास्य निर्माण करणारी. नंदी वगैरे जे गण आसपास आहेत त्यांच्याकडून सन्मानित. विंध्य पर्वतावरच्या सर्वोच्च शिखरावर निवास करणारी तू, विष्णुंवर प्रसन्न होणारी,  देवेंद्राकडून पूजित, नीलकंठाची धर्मपत्नी, सकल विश्वाचा हा अवाढव्य व्याप सहज सांभाळणारी, अखिल विश्वाला कायम संपन्नता देणारी, मदोन्मत्त महिषासुराचा वध करून प्रसिद्ध पावलेली तू, आई भगवती, महिषासुरमर्दिनी, आपल्या सुंदर लांबसडक केशसंभाराने सर्वांना आकर्षित करून घेणार्‍या गिरिजे, तुला साष्टांग माझा दंडवत. तुझा विजय असो.

सुरवरवर्षिणि दुर्धरघर्षिणी दुर्मुखमर्षिणी हर्षरते, त्रिभुवनपोषिणी शंकरतोषिणी किल्विषमोषिणी घोषरते | दनुज निरोषीणी दितिसुतरोषीणी दुर्मदशोषिणी सिंधुसुते, जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्य कपर्दिनि शैलसुते ||२||

सुरवरांना सुद्धा इच्छित वर देणारी, दुर्धर व दुर्मुख अशा दुष्ट राक्षसांचा संहार करणारी, निंदा करणार्‍याप्रती दयाळूपणे क्षमाशील असणारी, कायम प्रसन्न मुद्रा ठेऊन वावरणारी, त्रैलोक्याची पालनकर्ती, शिवाला संतोष देणारी, पापांना दूर लोटणारी, वाईट कृत्यांपासून वाचवणारी, दानवांवर सदा क्रोधित होणारी, अहंकारी लोकांचा भ्रमनिरास करणारी, सागर कन्या जी शिवावर अनुरक्त असते, हे महिषासुरमर्दिनी, आपल्या सुंदर लांबसडक केशसंभाराने सर्वांना आकर्षित करून घेणार्‍या गिरिजे, तुला साष्टांग माझा दंडवत. तुझा विजय असो.

अयि जगदंब मदंब कदंबवनप्रियवासिनी हासरते, शिखरशिरोमणि तुंगहिमालय शृंगनिजालय मध्यगते, मधुमधुरे मधुकैटभ भंजिनी कैटभगंजिनी रासरते, जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्य कपर्दिनि शैलसुते ||३||

ह्या त्रैलोक्याची माता, माझे आई, कदंबच्या घनदाट वनात विहार करणारी, हसतमुख, हिमालयाच्या प्रांगणात वावरणारी, गोड हवाहवासा स्वभाव असलेली, मधु व कैटभ अशा महाकाय दुष्ट राक्षसांचा संहार करणारी, कैटभाचा गर्वहरण करणारी, रासक्रीडा खेळणारी, हे महिषासुरमर्दिनी, आपल्या सुंदर लांबसडक केशसंभाराने सर्वांना आकर्षित करून घेणार्‍या गिरिजे, तुला साष्टांग माझा दंडवत. तुझा विजय असो.

माता शाकंभारी,आपल्या सर्वांवर कृपावंत होवो. हा करोंनासुर विश्वातून निघून जावो. पुढील श्लोकांसह उद्या भेटूच.