शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
2
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
3
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
4
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
5
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
6
टेन्शन वाढलं! ताप, डोकेदुखीसह भूक लागत नाही?; 'हा' धोकादायक व्हायरस करू शकतो अटॅक
7
आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video 
8
T20 World Cup भारत जिंकणार नाही; दिग्गजाने जाहीर केले ४ सेमी फायनलिस्ट
9
‘’उबाठा गटाची अवस्था ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’ अशी झालीय, मनसेची बोचरी टीका 
10
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
11
Breaking: सलमान खानवर गोळीबार प्रकरण; आरोपींपैकी एकाची पोलिस कोठडीत आत्महत्या
12
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियंका, काय म्हणाल्या मनेका गांधी?
13
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी
14
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
15
सिंधुदुर्गात ठाकरे गटाचं बळ वाढणार, राणेंना आव्हान देणारा जुना शिवसैनिक घरवापसी करणार 
16
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
17
Fact Check: नेपाळ संसदेत पंतप्रधान मोदींवर झाली नाही टीका; जाणून घ्या व्हायरल Videoचे 'सत्य'
18
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
19
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
20
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला

शाकंभरी नवरात्रीनिमित्त महिषासुरमर्दिनी स्तोत्रातील श्लोकांचा भावार्थ! (भाग २)  

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: January 22, 2021 9:00 AM

महिषासुर मर्दिनी स्तोत्र आपण आजवर बऱ्याचदा ऐकले असेल. त्याची लयबद्ध रचना आपल्याला भुरळ पाडते. परंतु त्याचा अर्थ समजून घेतला, तर स्तोत्र ऐकण्याचा आनंदही द्विगुणीत होईल. शाकंभरी नवरात्रीनिमित्त येत्या आठ दिवसात रोज तीन प्रमाणे चोवीस श्लोकांचा भावार्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूया. 

महिषासुर मर्दीनी स्तोत्राच्या तीन कडव्यांचा अनुवाद काल पाहिला, आता पुढील तीन श्लोकांचा अर्थ समजावून घेऊया. 

अयी शतखंड विखंडित रुण्ड वितुंडीत शूण्ड गजाधिपते, रिपुगज दगण्ड विदारण चंड पराक्रम शण्ड मृगाधिपते | निजभुज दंड निपातित चंड विपातित मुंड भटाधिपते, जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलस्तुते ||४||

हे चंडिके माते, तू युद्धात शत्रूंच्या अवाढव्य हत्तींचे शिर  व धड व सोंडेचे सहजपणे तुकडे तुकडे करतेस, त्यामुळे तू प्रचंड पराक्रमी आहेस हे दिसून येते, तसेच महाविक्राळ अशा सिंहावर बसून सवारी करत असतेस, एक वेळ तर अशी आली की तू तुझ्या बलशाली बाहूंनी चंड राक्षसाची मुंडीच आवळलीस व मुंड राक्षसालाही दुसर्‍या हाताने सहज पराजित केलेस. त्यामुळे ह्या अचाट पराक्रमाला दिपून मी तुझा भक्त, अनन्यभावे हे महिषासुरमार्दिनी, जी आपल्या सुंदर केश संभाराने सर्वांना आकर्षित करते, त्या गिरिजेला माझा साष्टांग नमस्कार असो, व तुझा जयजयकार असो.

अयी रण दुर्मद शत्रू वधोद्यत दुर्धर निर्जर शक्तिभृते, चतुर विचार धुरीण महा हव दूत कृत प्रमथाधिपते | दुरित दुरीह गुहाशय दुर्मति दानव दूत दूरस्तगते, जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलस्तुते ||५||

युद्धात तू तुझ्या अनेक रूपांची जागृत अशा तेजस्वी स्त्री देवींचे संघटन करून शक्ति एकवटून त्या शक्तीशाली दुर्मद राक्षसाचा वध केलास. किती चतुरता आहे ही तुझ्यात, हे चतुरस्त्र अष्टवधानि सदा सावध अशी गिरिजे, शिवालाही महायुद्धात तू तुझे सहकारी पद देऊन त्यांचीहि मदत घेतलीस, आणि अत्यंत वाईट अशा स्वभावाचे, वाईट कर्तुत्वाने भरलेले, वाईट आशा व हेतु धरून, कायम दुसर्‍यांच्या नाशाचीच इच्छा धरणारे असे राक्षसी वृत्तीच्या लोकांचे शिरोमणि राजे शुंभ जे तुला कायम यमदूत समजतात, अशा हे महिषासुर्मर्दिनीला माझा साष्टांग नमस्कार असो,व तुझा जय जयकार असो.

आई शरणागत वैरि वधूवर वीरवरा भयदायी करे, त्रिभुवन मस्तक शूल विरोधी शिरो धी कृतमाळ शूल करे | दुमी दुभितामर दुंदुमी नाद महो मुखरि क्रूत तिग्म करे, जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलस्तुते ||६||

हे आई तू दयाळू आहेस, पराजित राक्षसांच्या बायका मुलांनाही कोणतेही कपट मनात न धरता,शत्रुत्व कायमचे न धरता त्यांचेही रक्षण,पालन पोषण करतेस व त्यांना अभय देतेस, खरोखरीच तू धन्य आहेस. कायम कोणी शत्रू नसतो व कायम कोणी मित्र नसतो हे खरे आहे. त्रैलोक्याला सत्ता व संपत्ति च्या आधाराने हैराण केलेल्या राक्षसी वृत्तींच्या राज्यकर्त्याना तू आपल्या त्रिशूळाने घायल करून शरण यावयास भाग पाडलेस, त्यावेळेचे ते युद्ध भूमीवरचे डमरू नाद व दुदुंभी आम्हाला आनंदित करते व युद्धास प्रवृत्त करते,''विनाशायच दुष्कृताम” हा संदेश खरा ठरतो. ह्या लढवय्या गुणी महिषर्सुर्मर्दिनीला माझा साष्टांग नमस्कार असो,व तुझा जय जयकार असो. 

आई जगदंबे, शाकंभरी देवी, आम्हा सर्वांना तुझा आशीर्वाद कायम ठेव, नमोस्तुते. 

शाकंभरी नवरात्रीनिमित्त महिषासुरमर्दिनी स्तोत्रातील श्लोकांचा भावार्थ! (भाग १)

टॅग्स :Navratriनवरात्री