मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी महालक्ष्मीची उपासना केल्याने घरात सुख-समृद्धी, शांती आणि धन-धान्य नांदते अशी मान्यता आहे. या दिवशी 'महालक्ष्मी व्रत कथा' वाचून कलश आणि देवीची विधीपूर्वक पूजा केली जाते. या व्रतामध्ये नैवेद्यासाठी प्रामुख्याने लाह्या-फुटाणे आणि पुरणपोळी अर्पण करण्याची पद्धत आहे. तुम्ही हे व्रत पहिल्यांदाच करणार असाल तर मार्गशीर्षातले गुरुवार किती आणि कधी येणारेत ते पाहा आणि सविस्तर पूजाविधी जाणून घ्या.
Champashashthi 2025: २६ नोव्हेंबर चंपाषष्ठी, खंडोबाच्या षडरात्रोत्सवाची सांगता; 'अशी' करा पूजा!
मार्गशीर्ष गुरुवार २०२५(Margashirsha Guruvar Puja Vidhi 2025)
- पहिला गुरुवार मार्गशीर्ष शुक्ल पक्ष २७ नोव्हेंबर २०२५
- दुसरा गुरुवार मार्गशीर्ष शुक्ल पक्ष ०४ डिसेंबर २०२५
- तिसरा गुरुवार मार्गशीर्ष शुक्ल पक्ष ११ डिसेंबर २०२५
- चौथा गुरुवार मार्गशीर्ष शुक्ल पक्ष १८ डिसेंबर २०२५
मार्गशीर्षाचा पहिला गुरुवार: महालक्ष्मी व्रत, साहित्य आणि पूजा विधी
हिंदू धर्मात मार्गशीर्ष (Margashirsha) महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा महिना विशेषतः धन आणि समृद्धीची देवी माता लक्ष्मीला समर्पित असतो. या महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी व्रत केले जाते, ज्याला 'मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत' असे म्हणतात.
१. पूजेचे साहित्य (Required Items for Puja)
- मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी महालक्ष्मीची पूजा करताना खालील साहित्य आवश्यक असते.
- पूजा साहित्य: कलश, ताम्हण, पळी-पंचपात्र, तांदूळ(अक्षता), हळद-कुंकू, गुलाल, रांगोळी, कापूस, कापसाचे वस्त्र (वस्त्रमाळ), नवीन वस्त्र (साडी/ओटीचे), अत्तर.
- नैवेद्य: पुरणपोळी (किंवा घरात तयार केलेला गोड पदार्थ), शिरा, लाडू, फळे (केळी, सफरचंद इ.), प्रसाद म्हणून लाह्या व फुटाणे.
- फुलं: लाल किंवा गुलाबी रंगाची फुले (गुलाब, कमळ विशेष), हार, तुळस (वस्त्रमाळ झाल्यावर अर्पण करावी).
- कलश आणि सजावट: कलशासाठी पाणी, तांदूळ किंवा गहू (कलशाखाली ठेवण्यासाठी), आंब्याची पाने, श्रीफळ (नारळ), आरसा, फणी.
- इतर गोष्टी: देवीची मूर्ती किंवा प्रतिमा, चौरंग/पाट, आसन, सुपारी, विड्याची पाने, दीप (तेल किंवा तूप).
- कथा: मार्गशीर्ष गुरुवार व्रत कथा पुस्तक.
Ayodhya Ram Mandir: अयोध्येचे राम मंदिर होऊन वर्ष होत आले, मग ध्वजारोहण सोहळा आता का?
२. मार्गशीर्ष गुरुवार पूजा विधी (Detailed Puja Ritual)
- पहाटे लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करा. शक्य असल्यास पिवळ्या किंवा लाल रंगाची वस्त्रे परिधान करावी.
- घराच्या ईशान्य दिशेला किंवा पूजागृहात चौरंग किंवा पाट मांडा. त्यावर स्वच्छ वस्त्र अंथरा.
- एका कलशात पाणी घेऊन त्यात नाणे, सुपारी आणि हळद-कुंकू घाला. कलशाच्या तोंडावर आंब्याची पाने ठेवा आणि त्यावर श्रीफळ (नारळ) ठेवा.
- चौरंगावर कलशाखाली तांदूळ किंवा गहू ठेवून त्यावर कलश स्थापित करा. कलशाच्या पुढे किंवा बाजूला माता लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करा.
- चौरंगाभोवती आणि समोर रांगोळी काढा. कलशावर हळद-कुंकू आणि अक्षता वाहा. कलशाची वस्त्रमाळ (कापसाची) घाला आणि फुलांनी सजावट करा.
- देवीला हळद-कुंकू, अक्षता, फुले, अत्तर, वस्त्रासाठी कापूस अर्पण करा. विड्याच्या पानांवर सुपारी आणि दक्षिणा ठेवून अर्पण करा.
- तुपाचे किंवा तेलाचे निरांजन/दीप प्रज्वलित करा.
- 'मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत कथा' वाचा किंवा श्रवण करा. कथेचे वाचन केल्याशिवाय व्रत पूर्ण होत नाही, अशी मान्यता आहे.
- पुरणपोळी, शिरा, फळे आणि लाह्या-फुटाणे यांचा नैवेद्य दाखवा. नंतर माता लक्ष्मीची आरती करून कुटुंबासह प्रसाद ग्रहण करा.
Palmistry: भाग्य रेषा तुटलेली आहे की अखंड? 'या' स्थितीवरून उलगडते संपत्ति आणि नशिबाचे गूढ
३. मार्गशीर्षाचे महत्त्व
मार्गशीर्ष महिन्यात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आराधना करणे अत्यंत शुभ मानले जाते. हे व्रत केल्याने घरात धन-धान्य, सुख-समृद्धी वाढते आणि आर्थिक अडचणी दूर होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. हे व्रत सलग चार किंवा पाच गुरुवार (मार्गशीर्ष महिन्यातील) केले जाते आणि शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते. ते कसे करावे हे आपण शेवटच्या आठवड्यात पाहू.
Web Summary : Margashirsha Thursdays are dedicated to Mahalakshmi, bringing prosperity. The vrat involves worship with specific items like kalash, turmeric, and offering Naivedya (especially Puranpoli). The article details the puja vidhi and significance.
Web Summary : मार्गशीर्ष के गुरुवार महालक्ष्मी को समर्पित हैं, जो समृद्धि लाते हैं। व्रत में कलश, हल्दी जैसी विशिष्ट वस्तुओं से पूजा और नैवेद्य (विशेषकर पुरणपोली) चढ़ाना शामिल है। लेख में पूजा विधि और महत्व बताया गया है।