शहरं
Join us  
Trending Stories
1
"साधुग्राम, तपोवन हवा पण भाजपाच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नाही", आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
2
"आमच्या बॅगा कुठायत? घराची चावी त्यात आहे, भिकारी वाटलो का..."; मुंबई एअरपोर्टवर तुफान राडा
3
'रुपयाबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही..,' घसरत्या चलनावर निर्मला सीतारमण काय म्हणाल्या?
4
IND vs SA : जड्डूच्या गोलंदाजीवर फसला बावुमा! कॅच घेतल्यावर कोहलीनं अशी घेतली मजा (VIDEO)
5
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; कॅन्सरसह 'या' आजारांचा धोका, आताच बदला सवय
6
अमेरिका सोडून भारतात परत का आली माधुरी दीक्षित? म्हणाली, "बऱ्याच गोष्टी घडल्या..."
7
'कल्कि'च्या सीक्वेलमध्ये दीपिका पादुकोणच्या जागी प्रियंका चोप्रा?, 'देसी गर्ल'नेही ठेवली 'ही' अट
8
२०२५ ची शेवटची संकष्ट चतुर्थी: ५ उपाय अवश्य करा, चिंतामुक्त व्हा; बाप्पाची अपार कृपा लाभेल!
9
Video - गेमर नवरा! विधी राहिल्या बाजुला 'तो' फोनमध्ये मग्न: लग्नमंडपात खेळत होता फ्री फायर
10
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: विशेष व्रत करा; वर्षभर पुण्य-लाभ, विनायक कल्याण-मंगल करेल!
11
Travel : लग्नानंतर मालदीवला फिरायला जायचा प्लॅन करताय? राहणं, खाणं आणि फिरण्यासाठी किती खर्च येईल?
12
इंडिगोच्या गोंधळामध्ये वाढत्या विमान भाड्यांवर सरकारची कडक कारवाई, घेतला 'हा' मोठा निर्णय
13
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: उपास सोडताना ‘या’ चुका होत नाही ना? अन्यथा उपासना वाया; पाहा
14
Zepto IPO ला मिळाला हिरवा झेंडा; शेअरहोल्डर्सच्या मंजुरीनंतर कंपनी तयार, केव्हा होणार लिस्टिंग?
15
रात्रभर गोळीबार! पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर तणाव, युद्धबंदी तुटली; नेमकी चूक कोणाची?
16
  द ग्रेट खलीच्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा, तहसीलदारांनी हेराफेरी केल्याचा आरोप
17
"मला सवत आणलीस...", निमिष कुलकर्णीच्या लग्नानंतर शिवाली परबची प्रतिक्रिया चर्चेत
18
AUS vs ENG 2nd Test : आधी गोलंदाजीत कहर! मग अर्धशतकी खेळीसह मिचेल स्टार्कनं केली विक्रमांची 'बरसात'
19
इन्कम टॅक्स नंतर आता 'या' मोठ्या बदलावर सरकारचा फोकस; अर्थमंत्र्यांनी दिले संकेत
20
डीएसएलआरला टक्कर! २०२५ मध्ये गाजले 'हे' टॉप ५ सेल्फी फोन; क्वालिटी पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
Daily Top 2Weekly Top 5

मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: विशेष व्रत करा; वर्षभर पुण्य-लाभ, विनायक कल्याण-मंगल करेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 14:25 IST

Paush Sankashti Chaturthi December 2025 Moonrise Time: डिसेंबरमधील सन २०२५ची शेवटची मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी तिथीला चंद्रोदय वेळ कधी? जाणून घ्या...

Margashirsha Sankashti Chaturthi December 2025 Vrat Vidhi In Marathi: गीतेमध्ये दहाव्या अध्यायात विभूतीयोग सांगताना भगवंतांनी ‘मासानां मार्गशीर्षोऽहम’ म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात मी असतो, असे म्हटले आहे. मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाला अतिशय प्रिय आहे. मार्गशीर्ष मास हा केशव मास म्हणूनही ओळखला जातो. याच अतिशय शुभ मार्गशीर्ष महिन्यातील संकष्ट चतुर्थी विशेष मानली गेली आहे. २०२५ चा डिसेंबर शेवटचा महिना आहे. त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातील संकष्ट चतुर्थी २०२५ मधील शेवटची संकष्ट चतुर्थी आहे. या संकष्ट चतुर्थीला विशेष व्रत केल्यास वर्षभराचे पुण्य संचय करू शकता, असे म्हटले जात आहे. जाणून घेऊया...

गणपती बाप्पा हे अबालवृद्धांचे आराध्य दैवत! गणपती ही वैश्विक देवता आहे. गणपती बुद्धीची देवता आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोड-धोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे. प्रत्येक संकष्टीला गणेशभक्त आपापल्या परिने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत-पूजत असतात. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो, अशी मान्यता आहे. मार्गशीर्ष महिन्यातील संकष्ट चतुर्थी ही रविवार, ०७ डिसेंबर २०२५ रोजी आहे. या दिवशी चंद्रोदय वेळ कधी?

मार्गशीर्ष महिन्यातील संकष्ट चतुर्थी व्रताचा सोपा विधी

संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. यानंतर फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणपती बाप्पाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे.

संकष्ट चतुर्थीला चंद्राला अर्घ्य अवश्य द्यावे

रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप, दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य  द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा. संकष्टीच्या दिवशी गणेशाला जास्वंदाचे फूल आणि दुर्वांची जुडी अवश्य अर्पण करावी, असे सांगितले जाते. अगदी काहीच शक्य नसल्यास एकदा तरी भक्तिभावाने अथर्वशीर्ष म्हणावे अथवा श्रवण करावे. चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपास सोडू नये, असे म्हटले जाते. 

मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी चंद्रोदयाची वेळ काय?

डिसेंबरमधील सन २०२५ची शेवटची मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी रविवार, ०७ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ०६ वाजून २५ मिनिटांनी सुरू होत असून, सोमवार, ०८ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ०४ वाजून ०३ मिनिटांनी समाप्त होणार आहे. राज्यातील प्रमुख शहरातील चंद्रोदयाची वेळ पाहुया...

संकष्ट चतुर्थी डिसेंबर २०२५ विविध शहरांतील चंद्रोदय वेळ (Sankashti Chaturthi 2025 Moonrise Time)

शहरांची नावेचंद्रोदयाची वेळ
मुंबईरात्रौ ०८ वाजून ३४ मिनिटे
ठाणेरात्रौ ०८ वाजून ३३ मिनिटे
पुणेरात्रौ ०८ वाजून ३१ मिनिटे
रत्नागिरीरात्रौ ०८ वाजून ३७ मिनिटे
कोल्हापूररात्रौ ०८ वाजून ३४ मिनिटे
सातारारात्रौ ०८ वाजून ३२ मिनिटे
नाशिकरात्रौ ०८ वाजून २८ मिनिटे
अहिल्यानगररात्रौ ०८ वाजून २६ मिनिटे
धुळेरात्रौ ०८ वाजून २१ मिनिटे
जळगावरात्रौ ०८ वाजून १८ मिनिटे
वर्धारात्रौ ०८ वाजून ०६ मिनिटे
यवतमाळरात्रौ ०८ वाजून ०९ मिनिटे
बीडरात्रौ ०८ वाजून २२ मिनिटे
सांगलीरात्रौ ०८ वाजून ३२ मिनिटे
सावंतवाडीरात्रौ ०८ वाजून ३७ मिनिटे
सोलापूररात्रौ ०८ वाजून २४ मिनिटे
नागपूररात्रौ ०८ वाजून ०३ मिनिटे
अमरावतीरात्रौ ०८ वाजून ०९ मिनिटे
अकोलारात्रौ ०८ वाजून १३ मिनिटे
छत्रपती संभाजीनगररात्रौ ०८ वाजून २२ मिनिटे
भुसावळरात्रौ ०८ वाजता १७ मिनिटे
परभणीरात्रौ ०८ वाजून १७ मिनिटे
नांदेडरात्रौ ०८ वाजून १४ मिनिटे
धाराशीवरात्रौ ०८ वाजून २३ मिनिटे
भंडारारात्रौ ०८ वाजून ०१ मिनिटे
चंद्रपूररात्रौ ०८ वाजून ०५ मिनिटे
बुलढाणारात्रौ ०८ वाजून १७ मिनिटे
मालवणरात्रौ ०८ वाजून ३८ मिनिटे
पणजीरात्रौ ०८ वाजून ३८ मिनिटे
बेळगावरात्रौ ०८ वाजून ३४ मिनिटे
इंदौररात्रौ ०८ वाजून १३ मिनिटे
ग्वाल्हेररात्रौ ०७ वाजून ५४ मिनिटे

॥ गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ॥

 

English
हिंदी सारांश
Web Title : Margashirsha Sankashti Chaturthi 2025: Observe fast for blessings, prosperity all year!

Web Summary : Devotees can gain year-long blessings by observing the Margashirsha Sankashti Chaturthi fast on December 7, 2025. The article details puja rituals, importance of moon sighting, and moonrise timings across various cities.
टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थीPuja Vidhiपूजा विधीganpatiगणपती 2025spiritualअध्यात्मिकGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीGanpati Festivalगणपती उत्सव २०२५Moonचंद्र