शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

Mangal Astrology: मंगळ हा ग्रह कुंडलीत कोणत्या स्थानी आहे यावरून तो मंगल करणार की अमंगल ते ठरतं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 12:36 IST

Mangal Astrology: प्रत्येकाजवळ कुंडली असते, त्यात दिलेल्या तक्त्यानुसार तुमच्या राशीला आलेला मंगळ तुमच्यासाठी काय देणार आहे ते जाणून घ्या. 

>> ज्योतिषी सोनाली लिखितकर

मंगळ या ग्रहाची भीती वाटली नाही असा माणूस विरळा...लहान मुलं जन्माला आले रे आले की प्रथम त्याला मंगळ तर नाही ना; हे पाहून घेतले जाते. लग्नाकरिता मंगळ असलेल्या मुलीची कुंडली आली की झुरळ झटकावे तसे सर्व जण त्या कुंडलीला परिणामाने त्या मुलीला लगेच नकार कळवतात . का भितात सगळे जण या मंगळाला ? केवळ तांबूस दिसणारा हा ग्रह आपल्या सूर्यमालेतील एक ग्रहच आहे मग याची इतकी भीती का?  खरे पाहता याचे ज्योतिष शास्त्रीय विश्लेषण केलेतर मग बऱ्याच  जणाच्या मनातील गोंधळ  दूर होईल.लोकं उगाचच मंगळाची मुलगी किंवा मुलगा बाकी सर्व दृष्टीने चांगला असून केवळ मंगळ आहे म्हणुन नाकारणार नाहीत  हे नक्की .

तसे पाहीले तर कुंडलीमध्ये १२ स्थाने असतात त्यापैकी १ ,४ , ७ ,८ ,१२ या ठिकाणी मंगळ असेल तर त्या कुंडलीस मंगळाची कुंडली म्हणतात . आता ही स्थाने वगेरे समजणे जरा कठीण आहे .परंतु तरीही या प्रत्येक ठिकाणी मंगळ असण्याचा परिणाम पाहिला तर मग लक्षात येईल . १ या स्थानात जेव्हां मंगळ असतो   तेव्हा  व्यक्ती जरा तापट स्वभावाची असते .वागण्यात थोडी घाई असते .पण तरीही एक धैर्यवान व्यक्ती म्हणुन ही व्यक्ती संकट काळी डगमगत नाही .....मग अशी धैर्यवान व्यक्ती जोडीदार असायला काय हरकत आहे ?      ४ त्या स्थानी मंगळ असतो तेव्हा मंगळाच्या दृष्टी सप्तमावर पडते .त्यामुळे कधी कधी नवरा बायकोत वाद विवाद होतात ,आणि ते जरा उग्र रूप धरण करू शकतात . पण ४ त्या स्थानातला मंगळ व्यक्तीला मोठी जमीन जुमला ,घरे मिळवून देतो ,जे भल्या भल्यांना नशिबात नसते . ...,अग असा छान घर ,जमीन असणारा जोडीदार का नको........?      ७ व्या स्थानात मंगळ असतो तेव्हा देखील जोडीदार तापट असतो . आणि मंगळाच्या दृष्टीमुळे ही व्यक्ती ही वाद विवाद घालू लागते .तसेच काहीशी खर्चिक पण असते ...पण अशा व्यक्ती उत्तम व्यावसायिक ठरु शकतात . तसेच स्वतः जोडीदाराशी किती भांडोत पण आपल्या जोडीदाराकडे इतरांनी वाकडा डोळा करून पाहीले तर त्यांना सहन होत नाही . पण असा जोशपूर्ण जोडीदार का नको ...?    ८ व्या स्थानात मंगळ असताना व्यक्तीला  उष्णतेचे विकार होतात .पण या लोकांना वारसा हक्काने धन मिळणे ,किंवा गुप्त धन ,विना श्रमाचे धन सहज गत्या मिळते .  ...

   १२ व्या स्थानात मंगळ असेल तर लढवय्ये व्यक्तिमत्व असते ,सैन्य पोलीस खात्यात नोकरी असते ,पैसा जरा जास्त खर्च होतो .पण तो आला तरच खरच होणार म्हणूनच पैशाचा उपभोग  घेण्याची वृत्ती असते . मग काय हरकत आहे इथे मंगळ असला तरी ....   तर माझे सांगणे आहे की केवळ एकटा मंगळ पूर्ण पत्रिकेवर प्रभाव टाकू शकत नाही .बाकीचे ८ ग्रह देखील त्याच्याहून जास्त प्रभाव टाकत असतात .तर मग नवरा बायकोचे एकमेकांशी पटणे, हे केवळ मंगळ असणे या गोष्टीवर अजिबात अवलंबून नाही . म्हणुन  केवळ मंगळ आहे म्हणुन पत्रिका नाकारू नका . निष्णात आणि तरीही सदसदविवेक बुद्धी जागृत ठेवणाऱ्या ज्योतीषासच कुंडली दाखवा आणि त्यांच्या सल्ल्याने मग एखादी पत्रिका कशी आहे याचा अंदाज घ्या .केवळ अर्धवट माहितीच्या आधारे  स्वतःच्या किंवा इतरांच्या आयुष्याशी खेळू नका.

संपर्क : 9890447025

टॅग्स :Astrologyफलज्योतिष