शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Mahalaxmi Vrat 2024: मार्गशीर्ष अमावस्येला महालक्ष्मी व्रताचे उद्यापन करण्याबाबत पोथीत काय सांगितले आहे पहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 10:34 IST

Mahalaxmi Vrat 2024: ११ जानेवारी रोजी मार्गशीर्षातील गुरुवार आणि त्याच दिवशी महालक्ष्मी व्रताचे उद्यापन करायचे आहे, त्याबाबत माहिती जाणून घ्या. 

मार्गशीर्ष मासात केले जाणारे महालक्ष्मी व्रत अतिशय प्रचलित आहे. चार गुरुवार करायचे हे व्रत यंदा पाच गुरुवार करण्यास मिळाले आहे. मात्र या व्रताचे उद्यापन पाचव्या गुरुवारी करत असताना अमावस्या तिथी येत असल्याने अनेकांच्या मनात या व्रताशी संबंधित संभ्रम निर्माण झाला आहे. तो दूर करण्यासाठी व्रताची माहिती देणारी जी पारंपरिक पोथी आहे, त्यातून याबाबत खुलासा करून घेऊ! 

हे ही वाचा:  Margashirsha Guruvar 2023: महालक्ष्मीच्या पूजेत ठेवलेल्या नारळाला तडा जाणे 'शुभ' की 'अशुभ'? वाचा

'श्रीमहालक्ष्मीव्रत' या पोथीत लेखक द. शं. केळकर यांनी व्रतासंबंधी सविस्तर माहिती दिली आहे. हे व्रत सुख, शांती, धन-संपत्ती व श्रीलक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी करावयाचे आहे. व्रत करणारे स्त्री-पुरुष शरीराने व मनाने स्वच्छ व आनंदी असावेत. ह्या व्रताला कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी सुरुवात करता येईल. दर गुरुवारी श्रीमहालक्ष्मीव्रत पूजाविधीसह करावे. महालक्ष्मीव्रताची कथा व माहात्म्य वाचावे. अशा प्रकारे आठ गुरुवार हे व्रत आचरून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे. तसेच हे व्रत वर्षभरही करता येते. वर्षभर दर गुरुवारी आपल्या कुलदेवतेसमोर किंवा देवीच्या छायाचित्रासमोर बसून श्रीमहालक्ष्मीव्रतकथा व माहात्म्य ह्यांचे वाचन करावे. व्रताचे उद्यापनाचे दिवशी आठ सुवासिनींना अगर आठ कुमारिकांना घरी बोलवावे. प्रत्येकीला पाटावर किंवा आसनावर बसवून ती व्यक्ती महालक्ष्मीस्वरूप समजून तिला हळदकुंकू लावावे. पूजा व आरती संपल्यावर प्रसाद म्हणून फळ आणि यापोथीची एक प्रत प्रत्येकीला द्यावी व नमस्कार करावा. हेच ह्या व्रताचे उद्यापन. 

मार्गशीर्षात चार किंवा पाच गुरुवार आल्यास पहिल्या गुरुवारी हे व्रत सुरू करून चौथ्या किंवा पाचव्या गुरुवारी (अमावास्या असली तरीही) व्रताचे उद्यापन करावे. व्रताचे दिवशी उपवास करावा. केळी, फळे, दूध घ्यावे. उपाशी राहू नये. रात्री गोडाचे जेवण करून देवीला नैवेद्य दाखवून सर्वांसह भोजन घ्यावे. हे व्रत संसारी जोडप्यांसाठी पद्मपुराणात सांगितले आहे. काही कारणांनी हे व्रत करताना अडचण येते, तेव्हा त्यांनी दुसऱ्याकडून पूजा करवून घ्यावी. उपवास मात्र स्वतः करावा. तो गुरुवार मोजू नये. इतर कोणतेही उपवास असताना हे गुरुवार व्रत आले तरी हे व्रत करावे. रात्री पूजा करावी. वाटल्यास रात्री जेवू नये.ज्यांना हे व्रत दिवसा करता येत नसेल, त्यांनी रात्री करावे. फक्त दिवसा भोजन करू नये. निराहार राहू नये. या पोथीश्रवणाचा लाभ सर्वांना द्यावा. पोथी वाचताना एकाग्रता व शांतता असावी. पोथीवाचनाचे वेळी, महालक्ष्मीचे अस्तित्व गुप्त स्वरूपात जाणवेल. शांतता व मनाची एकाग्रता असणाऱ्यांना सुवासही जाणवेल.

१० जानेवारी रोजी रात्री ८ वाजून ११ मिनिटांनी अमावस्या सुरू होणार असून ११ तारखेला संध्याकाळी ५ वाजून २७ मिनिटांनी संपेल. अमावास्येची तिथी ११ तारखेचा सूर्योदय पाहणार असल्याने मार्गशीर्ष अमावस्या ११ तारखेला गृहीत धरली जाईल. शिवाय या व्रताला अमावस्येचा अडसर नाही. ज्याप्रमाणे आपण अश्विन अमावस्या लक्ष्मी पूजनाने साजरी करतो त्याप्रमाणे मार्गशीर्ष अमावस्येला या व्रताचे उद्यापन करता येते. त्यामुळे मनातील संभ्रम दूर करून वरील दिलेल्या माहितीनुसार व्रताचे उद्यापन करा आणि व्रतपूर्तीचे फळ मिळवा. 

टॅग्स :Puja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३