Maghi Ganesh Jayanti 2022: गणपती बाप्पाची पुण्यदायक ‘श्रीगणेश चालीसा’ म्हणा; सुख-समृद्धी, शुभलाभ मिळवा, पाहा, नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 01:17 PM2022-02-03T13:17:13+5:302022-02-03T13:18:42+5:30

Maghi Ganesh Jayanti 2022: गणपती बाप्पाचे मंत्र, स्तोत्र यांप्रमाणे श्रीगणेश चालीसाही अनन्य महत्त्व असून, पठणाचे नियम माहिती असणे गरजेचे आहे. जाणून घ्या...

maghi ganesh jayanti 2022 know about importance rules and auspicious benefits of shree ganesh chalisa | Maghi Ganesh Jayanti 2022: गणपती बाप्पाची पुण्यदायक ‘श्रीगणेश चालीसा’ म्हणा; सुख-समृद्धी, शुभलाभ मिळवा, पाहा, नियम

Maghi Ganesh Jayanti 2022: गणपती बाप्पाची पुण्यदायक ‘श्रीगणेश चालीसा’ म्हणा; सुख-समृद्धी, शुभलाभ मिळवा, पाहा, नियम

googlenewsNext

गणपती बाप्पाचे केवळ नाव उच्चारताच मन अगदी चैतन्यमय होऊन जाते. मराठी वर्षांत गणेशाचे तीन जन्म अगदी मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. गणेशाचे हे तीन अवतार समाजासाठी खूपच प्रेरणादायक मानले गेले आहेत. यातील एक महत्त्वाचा दिवस म्हणजे माघ महिन्यातील शुद्ध चतुर्थीला येणारी श्रीगणेश जयंती. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी माघी गणेशोत्सवही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यानिमित्ताने गणपती बाप्पाचे मंत्र, श्लोक, स्तोत्रे यांचे पठण केले जाते. गणपती अथर्वशीर्षाप्रमाणे गणेश चालीसाला तितकेच महत्त्व असल्याचे सांगितले जाते. 

कोणतेही शुभ व मंगल कार्य सुरू करण्यापूर्वी श्रीगणेशाची पूजा करणे हा नियम आहे, जेणेकरून सर्व कार्य निर्विघ्न पार पडतात. श्रीगणेशाची मनोभावे पूजा केल्याने घरात समृद्धी, व्यवसायात समृद्धी आणि प्रत्येक कामात यश मिळते. गणेश चालीसा स्तोत्राचे पठण शुभपुण्यदायक मानले गेले असून, यामुळे जीवनात सुख-समृद्धी मिळू शकते, असेही सांगितले जाते. मात्र, गणेश चालीसा पठणाचे काही नियम आवर्जुन पाळावे, असा सल्ला दिला जातो. 

गणेश चालीसा महत्त्व

गणेश चालीसा स्तोत्राचे प्रामाणिक अंतःकरणाने पठण केल्याने व्यक्तीच्या जीवनातील दुःख दूर होते आणि त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. श्रीगणेशाची आराधना केल्याने कुटुंबातील सर्व समस्या दूर होतात. गणेश चालीसा स्तोत्राचे नियमित पठण करणाऱ्या भक्तांना आयुष्यभर कशाचीही कमतरता भासत नाही आणि कुटुंबात सदैव सुख-शांती नांदते, अशी मान्यता आहे. 

गणेश चालीसा पठणाचे काही नियम

दररोज सकाळी आपापले कुळधर्म, कुळाचार याप्रमाणे गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर गणेश चालीसा पठण केले तरी चालते. यावेळी बसण्याची जागा आणि वस्त्र स्वच्छ असावे, असे सांगितले जाते. तसेच गणेश चालिसाचे पठण करताना कोणतेही वाईट विचार मनात येऊ देऊ नये. पाठ करताना नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करावे. भगवान गणेशाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी भगवान शिव आणि माता पार्वतीचेही ध्यान करावे. पठण करताना किंवा पठण झाल्यानंतर गणपतीच्या मूर्तीवर दूर्वा अर्पण करायला विसरू नये. तसेच गणेश चालीसा पठण करताना शक्य असल्यास तुपाचा दिवा देवासमोर लावावा, असे काही नियम सांगितले जातात. नित्यनेमाने गणपतीची आराधना करणाऱ्या भक्तांच्या जीवनातून दु:खाची छाया दूर होते. श्रीगणेश चालीसाचे यथायोग्य पठण केल्याने गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होतो आणि व्यक्तीला अपेक्षित फळ मिळू शकते, अशीही मान्यता असल्याचे सांगितले जाते. 
 

Web Title: maghi ganesh jayanti 2022 know about importance rules and auspicious benefits of shree ganesh chalisa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.