Surya - Chandra Grahan 2026: अवकाशात घडणाऱ्या खगोलीय घटनांचा आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होत असतो. पुढील १५ दिवसांत दोन मोठी ग्रहणे एकामागून एक येत असून, असा दुर्मिळ योग तब्बल १८ वर्षांनंतर जुळून आला आहे. या 'कॉस्मिक अलर्ट'बद्दल आणि पाळावयाच्या नियमांबद्दलचा सविस्तर जाणून घ्या.
ब्रह्मांड आपल्याला एक मोठा संकेत देत आहे. येत्या १५ दिवसांच्या अंतरात दोन महत्त्वाची ग्रहणे होणार आहेत. १७ फेब्रुवारीला होणारे 'सूर्यग्रहण' आणि त्यानंतर ३ मार्चला होणारे 'चंद्रग्रहण' यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात ऊर्जेचे बदल जाणवणार आहेत. विशेषतः होळीच्या दिवशी येणारे चंद्रग्रहण अत्यंत प्रभावी मानले जात आहे.
१. सूर्यग्रहण (रिंग ऑफ फायर) - १७ फेब्रुवारी
वेळ: दुपारी ०३:२६ ते रात्री ०७:५७ पर्यंत.
विशेष: हे 'कंकणाकृती' सूर्यग्रहण असेल.
भारतातील स्थिती: हे ग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे येथे सुतक काळ पाळण्याची गरज नाही. पण ग्रहण काळातील आवश्यक गोष्टी करायच्या आहेत. जसे की नामजप, अन्न, पाणी झाकून ठेवणे, अन्नग्रहण न करणे, देव झाकून ठेवणे ई.
२. चंद्रग्रहण (ब्लड मून) - ३ मार्च (होळीच्या दिवशी)
हे ग्रहण भारतात दिसणार असल्यामुळे याचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व अधिक आहे.
वेळ: दुपारी ०३:२० ते सायंकाळी ०६:४५ पर्यंत.
सुतक काळ: ३ मार्च रोजी सकाळी ०६:२० वाजता सुतक काळ सुरू होईल (ग्रहणाच्या ९ तास आधी).
३ मार्चसाठी अत्यंत महत्त्वाच्या सूचना (CRITICAL WARNINGS):
१. होलिका दहन नियम:
यंदा होळीच्या दिवशीच ग्रहण असल्याने, सायंकाळी ०६:४५ पूर्वी होळी पेटवू नका. ग्रहण पूर्णपणे सुटल्यानंतर आणि शुद्धीकरण केल्यानंतरच होलिका दहनाचे विधी करावेत.
२. गर्भवती महिलांसाठी सावधानता:
ग्रहण काळात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जास्त असतो. त्यामुळे गर्भवती महिलांनी या काळात घराबाहेर पडू नये. तसेच कात्री, चाकू, सुई यांसारख्या अणकुचीदार किंवा धारदार वस्तूंचा वापर टाळावा.
३. अन्न आणि पाण्याची सुरक्षा:
सुतक काळ सुरू होण्यापूर्वी (सकाळी ६:२० च्या आधी) घरातील सर्व अन्नाचे डबे आणि पाण्याच्या भांड्यांमध्ये तुळशीची पाने टाकावीत. यामुळे अन्नावर ग्रहणाच्या दूषित किरणांचा परिणाम होत नाही.
Solar Eclipse 2026: ग्रहणकाळात केलेला 'हा' उपाय दूर करतो वास्तू-व्यवसायातली निगेटिव्हिटी?
प्रभावी उपाय आणि शुद्धीकरण
मंत्र जप: ग्रहण काळात "ॐ नमो भगवते वासुदेवाय" या मंत्राचा सातत्याने जप करा. यामुळे मनातील भीती आणि नकारात्मकता दूर होते.
शुद्धीकरण: ग्रहण सुटल्यानंतर (सायंकाळी ६:४५ नंतर) संपूर्ण घरात गंगाजल शिंपडावे आणि स्वतः स्नान करून देवाची पूजा करावी.
दान: ग्रहणानंतर गरजूंना दान केल्याने ग्रहणाचे अशुभ परिणाम कमी होतात.
Web Summary : Two eclipses, solar on February 17th and lunar on March 3rd, are coming within 15 days. The lunar eclipse falls on Holi. Precautions are advised for pregnant women. Follow remedies and purification rituals after the eclipse.
Web Summary : 17 फरवरी को सूर्य ग्रहण और 3 मार्च को चंद्र ग्रहण, 15 दिनों के भीतर दो ग्रहण आ रहे हैं। चंद्र ग्रहण होली पर है। गर्भवती महिलाओं के लिए सावधानी बरतने की सलाह दी जाती है। ग्रहण के बाद उपाय और शुद्धिकरण करें।