शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

Chandra Grahan 2025: या वर्षाचे पहिले खग्रास चंद्रग्रहण तेही होळीला; गर्भवतींसाठी काळजीचे कारण? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 11:20 IST

Lunar Eclipse 2025 : यंदा १४ रोजी खग्रास चंद्रग्रहण लागणार आहे, पण ते भारतातून दिसणार का? गर्भवतींना काळजीचे कारण आहे? कोणते नियम पाळावेत ते जाणून घ्या!

या वर्षीचे पहिले चंद्रग्रहण मार्च महिन्यात होणार आहे. ग्रहण या शब्दाला नकारात्मक छटा आहे. कारण ग्रहण अर्थात ग्रासून टाकणे.  ग्रहणाच्या दिवशी राहू आणि केतू हे पाप ग्रह अधिक सक्रिय होतात आणि त्यांचा प्रभाव वाढतो. अशा परिस्थितीत या वर्षातील पहिले चंद्रग्रहण केव्हा होईल आणि ते कुठे दिसेल हे जाणून घेऊया.

या वर्षातील पहिले चंद्रग्रहण लवकरच होणार आहे. धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून ग्रहणाचे विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार जेव्हा जेव्हा ग्रहण लागते तेव्हा ग्रहणासंबंधी नियम पाळले जातात. मात्र येत्या चंद्रग्रहणाचा प्रभाव भारतावर पडणार का आणि पडल्यास त्याबाबतीत कोणती सतर्कता बाळगावी लागणार ते पाहू. 

२०२५ चे पहिले चंद्रग्रहण कधी होईल?

२०२५ चे पहिले चंद्रग्रहण मार्चमध्येच होणार आहे. होळीच्या (Holi 2025) दिवशी म्हणजेच फाल्गुन पौर्णिमा (Falgun Purnima 2025) तिथीला अर्थात  १४ मार्चला चंद्रग्रहण (Lunar Eclipse 2025) असणार आहे. हे आंशिक चंद्रग्रहण असेल.

वर्षातील पहिले चंद्रग्रहण भारतात दिसणार का?

हे ग्रहण भारतात दिसणार नाही. हे ग्रहण उत्तर अमेरिका (कॅनडा, अमेरिका), दक्षिण अमेरिकेत खग्रास आकारात पाहता येईल. युरोपातील बहुतेक देशांमध्ये (ब्रिटन, इटली, फ्रान्स, जर्मनी, आयर्लंड, पोर्तुगाल, स्पेन इ.), पूर्व दक्षिण अमेरिका आणि बहुतेक पश्चिम आफ्रिकेमध्ये हे ग्रहण चंद्रास्ताच्या वेळी आंशिक स्वरूपात दिसेल. तर बहुतेक ऑस्ट्रेलिया (मेलबर्न, सिडनी इ.), पूर्व आशिया (जपान, दक्षिण कोरिया), फिजी इत्यादी देशांत हे ग्रहण चंद्रोदयाच्या वेळी खंडग्रास स्वरूपात पाहता येईल. हॉलंड, नॉर्वे, पोलंड, पोर्तुगाल, रोमानिया, उत्तर रशिया, स्पेन, सुरीनाम, स्वीडन, स्वित्झर्लंड, युक्रेन, अमेरिकेचा पूर्व भाग (न्यूयॉर्क इ.), आणि इंग्लंड इ. खग्रास ग्रहण दिसेल. 

गर्भवतींसाठी विशेष सूचना :

हे ग्रहण भारतात दिसणार नसल्याने त्यासंदर्भात कोणतेही नियम पाळणे बंधनकारक असणार नाही. त्यामुळे स्वाभाविकच होळीच्या सणावर, आनंदावर त्याचे विरजण पडणार नाही. केवळ गर्भवतींनी या काळात आरोग्याची काळजी घ्यावी, मन शांत ठेवावे  ज्योतिषी सांगतात. ग्रहण काळात निसर्गात होणाऱ्या बदलांचा मनुष्याच्या शरीरावर परिणाम होत असतो. त्यात गर्भवती स्त्रिया दोन जीवांचा सांभाळ करत असतात. बाह्य स्थितीचा त्यांच्या तना-मनावर परिणाम होतो, म्हणून त्यांनी विशेष काळजी घ्यावी असे सुचवले जाते. 

२०२५ च्या चंद्रग्रहणाची वेळ : भारतीय वेळेनुसार चंद्रग्रहण दुपारी २:२१ वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी ६:१४ वाजता संपेल. ग्रहणाचा मधला काळ दुपारी ४:१७ मिनिटांनी असेल.

खग्रास चंद्रग्रहण म्हणजे काय?

खग्रास चंद्रग्रहण म्हणजे ज्या ग्रहणात चंद्राचा काही भाग झाकोळलेला दिसतो, अशा ग्रहणाला खग्रास चंद्रग्रहण म्हणतात.

टॅग्स :Holiहोळी 2024Lunar Eclipseचंद्रग्रहण