शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

धर्माचा त्याग करुन भगवंताला शरण जावे; श्रीकृष्णाने अर्जुनाला असा उपदेश का केला? वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 16:35 IST

भगवंताला शरण जाण्याबाबत अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण नेमके काय सांगतात? जाणून घ्या

मासानां मार्गशीर्षोहम् असे श्रीकृष्णाने भगवद्‌गीतेत म्हटले आहे. याच मार्गशीर्ष महिन्यात श्रीकृष्णाने ब्रह्मांडाला अमोघ, कालातीत भगवद्‌गीता दिली. गीतेचे ज्ञान अर्जुनाला दिले. भारतातील कोट्यवधी जनता अत्यंत श्रद्धेने आपापल्या आराध्य देवतेचे नामस्मरण करत असतात. जीवन जगत असताना माणूस काही ना काही धारणा घेऊन जगत असतो. त्याप्रमाणे आचार, विचार, व्यवहार करत असतो. या सर्वांचा समावेश ईश्वराची भक्ती करतानाही होतो. मात्र, भगवंताची भक्ती कशी करावी, ती कशी असावी, याबाबत सर्वांचा कळस ठरलेल्या भगवद्गीतेत सविस्तर विवेचन केलेले दिसते. ईश्वराला किंवा भगवंताला शरण जाण्याबाबत अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण नेमके काय सांगतात? पाहूया...

सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज।अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः।।१८.६६।।

याचा अर्थ सर्व धर्माचा त्याग करून मला शरण या. पापातून मुक्तता करण्यासाठी आणि मोक्ष प्रदान करण्यासाठी परमेश्वर कटीबद्द आहे, असा या श्लोकाचा साधा शब्दार्थ आहे. मात्र, धर्माचा त्याग करा म्हणजे नेमके काय करा? धर्म नावाचे जे काही आहे ते सोडून द्यायचं का? असे काही प्रश्न उपस्थित होतात. ज्यांचे अर्थ जो तो आपापल्यापरिने लावत असतो.

धर्म हा धृ धातूपासून बनलेला शब्द आहे. याचा अर्थ धारण करणे. धारयति इति धर्मः! म्हणजे जे काही चुकीचे किंवा बरोबर आपण धारण करू तो धर्म. थोडक्यात आपल्या धारणा हाच आपला धर्म असतो. धारणा चुकीच्या असू शकतात, तशा त्या बरोबरही असू शकतात. त्या असू शकतात किंवा नसूही शकतात. धारणांमध्ये गल्लत असू शकते. समजुती असू शकतात, तशा गैरसमजुतीही असू शकतात.

वास्तवात जे काही आहे, ते माझेच आहे. चांगले ही माझे आणि वाईट ही माझेच आहे. पाप ही माझेच आहे आणि पुण्य ही माझेच आहे. योग्य ही मीच आणि अयोग्य ही मीच आहे. तुम्ही धारणा बनवता, समजुती करून घेता, तथ्यांश तपासत राहता, धारणाच धारण करणे सोडून द्या, जे काही आहे ते मीच आहे, हे लक्षात घ्या. कर्ता मीच, क्रिया मीच, क्रियापद मीच आहे, हे एकदा लक्षात आले की, तुम्हांला यात टाकणारा मीच आहे आणि यातून बाहेर काढणाराही मीच आहे, हेही ध्यानात येईल. त्यामुळे कोणत्याही धारणा न ठेवता माझ्यावर प्रेम करा. जे काही कराल त्यात यश मिळवायला आणि परिणामी आयुष्य उत्तम जगायला एवढेही पुष्कळ आहे. 

टॅग्स :Mahabharatमहाभारत