शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
3
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
4
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
5
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
6
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
8
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
9
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
10
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
11
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
12
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
13
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
14
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
15
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
16
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
17
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
18
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
19
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
20
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!

Lokmanya Tilak Jayanti: शिवजयंतीच्या उत्सवात लोकमान्यांनी अनुभवला गजानन महाराजांचा चमत्कार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 13:04 IST

Lokmanya Tilak Jayanti: लोकमान्य टिळक हे केवळ राजकरणातलेच नाही तर अध्यात्मातलेही अधिकारी पुरुष होते, २३ जुलै रोजी त्यांची जयंती; त्यानिमित्त त्यांना आलेला गुरुअनुभव वाचुया!

लोकमान्य टिळक म्हणाले होते, 'मी राजकरणात आलो नसतो तर कीर्तनकार झालो असतो.' एवढी त्यांची आध्यात्मिक बैठक पक्की होती. त्यामुळेच की काय, त्यांना खुद्द गजानन महाराजांच्या चमत्काराची प्रचिती आली. कशी ते पहा.

अकोल्यास शिवजयंतीस लोकमान्य टिळकांना अध्यक्ष म्हणून आणायचे ठरले. लोकमान्यांनीही ते मान्य केले. या उत्सवास शेगावच्या गजानन महाराजांना आणूया म्हणून ठरले. खापर्डे कोल्हटकर यांना आनंद झाला. ते महाराजांना या उत्सवाचे आमंत्रण देण्यास गेले. तेव्हा महाराज म्हणाले, 'अकोल्यास शिवजयंतीच्या उत्सवास आम्ही जरूर येऊ, तुम्ही निर्धास्त राहा. आमच्यामुळे तिथे कोणतेही संकट येणार नाही.'

शिवजयंती उत्सवास लोक लांबलांबून आले. भव्य मंडप भरून गेला. महाराज व्यासपीठावर विराजमान झाले. लोकमान्य टिळक सिंहासनाच्या अग्रभागी बसले. त्यांच्याजवळ अप्पासाहेब पटवर्धन, गणेश खापर्डे, दामले, कोल्हटकर, भावे, व्यंकटराव देसाई इ. पुढारी व्यासपीठावर बसले होते.लोकमान्य टिळकांनी उद्गार काढले,

दिवस आजचा धन्य धन्य, आहे पहा हो सज्जनस्वातंत्र्यासाठी ज्याने प्राण, खर्चिले आपुले पूर्वकाली,त्या धनुर्धर योध्याची, वीर गाजी शिवाजीचीजन्म जयंती आहे साची, म्हणून आपण मिळालो।त्या रणगाजी शिवाजीला, रामदासे हाती धरिला,म्हणून त्याचा बोलबाला, झाला भारतखंडामध्ये।।तेवीच आज येथे झाले, आशार्वाद द्याया आले,श्री गजानन साधु भले, आपुलीया सभेस।।

महाराज सभेला बैठकीवर बसलेले सर्वांनी पाहिले. परंतु ते कोठून आणि कसे आले, हे कोणालाच कळले नाही. असे हे स्वामी महाराज कधी, कोणास, कशी भेट देतील माहित नाही. म्हणून मनात भाव शुद्ध असावा आणि ओठांवर महाराजांचा नित्य जप असावा...गण गण गणात बोते...!

टॅग्स :Lokmanya Tilakलोकमान्य टिळकGajanan Maharajगजानन महाराज