इच्छापूर्तीचा कानमंत्र ऐका आणि त्याचा दैनंदिन जीवनात वापर करा, डॉ. राजीमवाले यांच्या live चर्चासत्रात!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 08:00 AM2021-05-28T08:00:00+5:302021-05-28T08:00:02+5:30

कानमंत्र हा कानात सांगावा लागतो, तरच त्याचा प्रभाव टिकून राहतो. यासाठी आजचे चर्चासत्र कान देऊन ऐकायला विसरू नका. रात्री ८ वाजता लोकमत भक्ती युट्युब चॅनेलवर!

Listen to the kanmantra of wish fulfillment and use it in daily life, Dr. In Rajimwale's live discussion session! | इच्छापूर्तीचा कानमंत्र ऐका आणि त्याचा दैनंदिन जीवनात वापर करा, डॉ. राजीमवाले यांच्या live चर्चासत्रात!

इच्छापूर्तीचा कानमंत्र ऐका आणि त्याचा दैनंदिन जीवनात वापर करा, डॉ. राजीमवाले यांच्या live चर्चासत्रात!

Next

गणित कधी सुटते? जेव्हा आपल्याला त्या गणिताची उकल करण्याची पद्धत किंवा गणिताचे सूत्र माहीत असते. त्याचप्रमाणे आयुष्याचे गणित सोडवायचे असेल, तर आपल्याला मुख्य सूत्र माहीत असायला हवे. ते सूत्र अथवा मंत्र, जीवनपद्धती समजून घेण्यासाठी गरज असते ते संबंधित विषयातील जाणकारांची! यासाठीच डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले आजच्या live चर्चासत्रात 'जे हवं ते मिळवण्याचा' कानमंत्र देणार आहेत. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. 

डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले हे शिवपुरी अक्कलकोटचे परम सद्गुरु श्री गजानन महाराज यांचे नातू आहेत. तसेच ते अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ गुरूंच्या वंशातील आहेत. राजीमवाले कुटुंब मध्य भारतातील महाकोसल येथील राजेशाही कुटुंब म्हणून ओळखले जाते. १८०० सालापासून जनकल्याणासाठी झटण्याची परंपरा या कुटुंबाला लाभली आहे. 

अक्कलकोट येथे अग्निहोत्राच्या प्राचीन सर्वोत्तम प्रथेचे डॉ. पुरुषोत्तम यांनी पुनरुज्जीवन केले आणि उपचार, शांतीचा संदेश जगाला देण्यासाठी शिवपुरीच्या आश्रमाची स्थापना केली. त्यांनी आपले संपूर्ण बालपण अक्कलकोटच्या मठात आध्यात्मिकदृष्ट्या भारावलेल्या वातावरणात, महान योगी व संतांसोबत व्यतीत केले आहे. तसेच त्यांचे वडील श्रीकांतजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गुरु परंपरेनुसार प्राचीन विद्या आत्मसात केली. डॉ. पुरुषोत्तम यांच्या वडिलांनी संस्कृतमध्ये पीएचडी करताना वैदिक साहित्यात विशेषज्ञता प्राप्त केली होती. वडिलांकडून वेदाभ्यासाचे धडे घेत त्यांनी आयुर्वेद, योग ते तत्वज्ञान आणि वैदिक विज्ञान इ. विषयांचाही अभ्यास केला. समग्र दृष्टिकोन ठेऊन, निसर्गाच्या सानिध्यात राहत आरोग्य व निरोगी आयुष्य कसे जगायचे, याची प्राचीन शिकवणी त्यांनी घेतली.

कानमंत्र हा कानात सांगावा लागतो, तरच त्याचा प्रभाव टिकून राहतो. यासाठी आजचे चर्चासत्र कान देऊन ऐकायला विसरू नका. रात्री ८ वाजता लोकमत भक्ती युट्युब चॅनेलवर!

Web Title: Listen to the kanmantra of wish fulfillment and use it in daily life, Dr. In Rajimwale's live discussion session!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.