शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 12:21 IST

Life Lesson: संकटं कोणालाही नको असतात, साधं सोपं सुटसुटीत पण आनंदी जीवन असावं एवढीच प्रत्येकाची अपेक्षा असते, तरी अवघड वळणं का येतात? वाचा...

एखाद्या मोठ्या, गुळगुळीत आणि ट्रॅफिक नसलेल्या रोडवरून गाडी जात असेल तर प्रवास आनंदादायी होतो. मात्र तिथेही स्पीडब्रेकर असतात. वाहनाच्या वेगावर नियंत्रण राहावे यासाठी त्यांची रचना असते मान्य आहे, पण खाच खळगे, खड्डे, खडबडीत अरुंद रस्ते, ट्रॅफिक आले की प्रवासाच्या रंगाचा बेरंग होतो. हल्ली तर गुगल मॅपवर सुद्धा तो 'रेड, ऑरेंज, ग्रीन पॅच' दाखवतात. यावरून आपण पुढच्या रस्त्याचा अंदाज घेतो. पण त्यांच्या भीतीने प्रवास थांबवत नाही. आपले इप्सित ठिकाण गाठतो आणि सुटकेचा श्वास सोडतो. आयुष्याचा प्रवासही तसाच आहे... 

प्रेमानंद महाराज दुःख, संकटं, मनःस्ताप, मानहानी या आयुष्यात येणाऱ्या खाच-खळग्यांबद्दल बोलताना म्हणतात, ही सुद्धा आपला प्रवास अनुभवांनी समृद्ध व्हावा यासाठी केलेली योजना आहे. ते आलेच नाहीत तर आपल्याला गुळगुळीत रस्त्यांची सवय होईल आणि ते सगळीकडे मिळतीलच असे नाही. त्यामुळे प्रतिकूलतेत अनुकूलता शोधण्याचा प्रयत्न केला तर या अचानक आलेल्या संकटांचे ओझे वाटणार नाही. 

अधिक स्पष्टीकरण देताना ते म्हणतात, काच दोन प्रकारची असते, एक जी दगड मारला तरी फुटते, दुसरी ती जी बंदुकीची गोळी लागली तरी फुटत नाही, तिलाच आपण बुलेट प्रूफ काच म्हणतो. ती ही काचच, तरी ती कणखर कशी झाली? तर आगीत तापवून, त्यावर थंड पाण्याचा मारा करून, परत आगीत तापवून, पाण्याचा मारा करून ती कणखर बनली. भगवंतदेखील आपल्याला सुख-दुःखाचा ससेमीरा पाठीशी लावून कणखर बनवतो. जेणेकरून आपल्याला सुख दुःख पचवण्याची ताकद मिळेल. 

म्हणून सगळं काही सुरळीत सुरु असताना अचानक काही गडबड, गोंधळ झाला तर बावरून जाऊ नका, सुखाचे क्षण जसे उपभोगले तसे दुःखाचे क्षण परीक्षेचे आहेत, असे समजून देव आपल्याला कणखर बनवतोय हे ध्यानात ठेवा आणि आलेल्या संकटाला तोंड देण्यासाठी भगवंताकडेच बळ मागा, तो ते देईल आणि आयुष्य सुखकर होत आपले इप्सित ध्येय अर्थात आपला शेवट सुखकर होईल. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी