शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
3
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
4
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
5
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
6
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
7
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
8
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
9
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
10
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
11
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
12
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
13
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
14
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
15
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
16
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
17
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
18
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
19
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
20
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी

संत नरसी मेहता यांनी लिहिलेले आणि महात्मा गांधींजींना प्रिय असलेले भजन आज आपणही आळवूया!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 08:00 IST

वैष्णव म्हणजे अशी व्यक्ती, जी नम्र राहून, सर्वांचा आदर करते. कोणाचीही निंदा करत नाही. ज्यांच्या वागण्या-बोलण्यात एकवाक्यता असते आणि कठीण प्रसंगातही जी निश्चल राहते.

एकदा, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, यांच्या हाती महात्मा गांधींचे एक इंग्रजी पुस्तक लागले. ते पुस्तक एका परदेशी लेखकाने लिहिले होते आणि मुखपृष्ठदेखील त्यांच्याच कल्पनेतून साकारले होते. मुखपृष्ठावर गांधीजींचा फक्त चेहरा होता, तोही पूर्ण नाही, तर कडेकडेचा हिस्सा कापला गेलेला. एवढे मोठे लेखक, भूलचुकीने असे मुखपृष्ठ नक्कीच छापणार नाहीत. यामागे नक्कीच काहितरी विचार असावा. त्या विचारावर बराच काळ विचार केल्यावर आणि पुस्तकातील संपूर्ण मजकूर वाचून झाल्यावर राज ठाकरे यांना लेखकाची संकल्पना लक्षात आली, की गांधीजींचे चरित्र 'चौकटीत' मावणारे नाही, त्याला अनुसरून लेखकाने मुखपृष्ठसजावट केली होती. 

महात्मा गांधी, हे खरोखरीच चौकटीत न मावणारे, किंबहुना वैचारिक चौकट मोडणारे व्यक्तीमत्त्व होते. 'अहिंसा परमो धर्म:' ही शिकवण देत त्यांनी समस्त भारतीयांना आपलेसे करून घेतले.  म्हणून जनतेने त्यांना आत्मियतेने 'राष्ट्रपिता' ही उपाधी दिली. समाजाच्या सर्व स्तरातील लोकांना ते प्रेमाने वागवत असत. ही चांगल्या आचरणाची आणि शुद्ध विचारसरणीची शिकवण त्यांना  संत नरसी मेहता यांच्या `वैष्णव जन' या भजनातून मिळाली होती. ते भजन गांधीजींना एवढे आवडत असे, की त्यांनी आपल्या नित्य प्रार्थनेत या भजनाचा समावेश केला होता. गांधी जयंती निमित्त आपणही त्यांच्या आवडीच्या भजनाची उजळणी करूया आणि महात्मा गांधींचे व पर्यायाने संत नरसी मेहतांचे उदात्त विचार अनुसरण्याचा प्रयत्न करूया. 

वैष्णव जन तो तेने कहिये जे पीड पराई जाणे रे,पर दु:खे उपकार करे तोये मन अभिमान न आणे रे ।

वैष्णव कोणाला म्हणावे, जे दुसऱ्यांचे दु:ख समजून घेतात आणि दुसऱ्यांच्या दु:खाने दु:खी होतात. एवढेच नाही, तर एखाद्याच्या कठीण प्रसंगी जे मदतीचा हात पुढे करतात, परंतु केलेल्या कार्याचा अभिमान बाळगत नाहीत. 

सकल लोकमां सहुने वंदे निंदा न करे केनी रे,वाच काछ मन निश्चल राखे धन धन जननी तेनी रे ।

वैष्णव म्हणजे अशी व्यक्ती, जी नम्र राहून, सर्वांचा आदर करते. कोणाचीही निंदा करत नाही. ज्यांच्या वागण्या-बोलण्यात एकवाक्यता असते आणि कठीण प्रसंगातही जी निश्चल राहते. 

समदृष्टि ने तृष्णा त्यागी, परस्त्री जेने मात रे,जिव्हा थकी असत्य न बोले, परधन नव झाले हाथ रे ।।

सर्वांकडे समदृष्टीने पाहणारी व्यक्ती विरळाच. परंतु, अशी व्यक्तीच सर्वांना समान न्यायाने वागवू शकते. लिंग, जाती, वर्ण, रंग, क्षेत्र, भाषा अशा कोणत्याही बाबींमध्ये भेदभाव करत नाही. परस्त्रीला मातेसमान वागवतो. दुसऱ्यांची संपत्ती पाहून ज्यांच्या मनात लालसा निर्माण होत नाही आणि जे सत्याची कास कधीच सोडत नाहीत, त्यांना वैष्णव जन म्हणावे. 

मोह माया व्यापे नहि जेने, दृढ़ वैराग्य जेना मनमां रे,रामनाम शुं ताली रे लागी, सकल तीरथ तेना तनमां रे।

मोह-मायेत अडकलेली व्यक्ती दुसऱ्याच्या सुख-दु:खाचा विचार करू शकत नाही. त्यासाठी शरीराने नाही, तर मनाने वैराग्य स्वीकारले पाहिजे. तरच, मोह-मायेत अशा व्यक्तीचा पाय अडकणार नाही. रामनाम आणि रामकाम हेच त्यांच्या आयुष्याचे ध्येय असते. अशी व्यक्ती जिथे जाते, त्या ठिकाणालाच तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त होते. 

वणलोभी ने कपटरहित छे, काम क्रोध निवार्या रे,भणे नरसैयो तेनु दरसन करतां, कुल एकोतेर तार्या रे।

भगवद्गीतेत श्रीकृष्णांनी म्हटले आहे, इच्छेतून लोभ निर्माण होतो, लोभातून मत्सर, मत्सरतेतून क्रोध आणि क्रोधातून सर्वनाश. मात्र, जे वैष्णवपंथी असतात, त्यांच्या मनात कोणाबद्दलही राग, असूया, द्वेष नसतो. उलट दुसऱ्यांच्या मनातील राग, द्वेष, मत्सर अशा भावनांचा ते निचरा करतात. अशी व्यक्ती सापडणे दुर्मिळ, मात्र ती सापडली, तर तिच्यासमोर नतमस्तक व्हायला विसरू नका आणि तिच्यासारखे बनण्याचा प्रयत्न जरूर करा.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी