शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Laxmi Pujan 2024: लक्ष्मी पूजेआधी 'हे' फोटो आधी घरातून बाहेर काढा; होऊ शकते आर्थिक नुकसान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 12:29 IST

Laxmi Pujan 2024: घरच्या संपत्तीत भर पडावी म्हणून आपण लक्ष्मी पूजन करतो, पण त्याआधी वास्तु शास्त्राने सांगितलेले नियम न चुकता फॉलो करा!

लक्ष्मीची पूजा आपण वर्षभर करतो. कारण तिच्या कृपेशिवाय आपला उदरनिर्वाह अशक्य आहे. सध्याचे जग तर प्रचंड व्यवहारी झाले आहे. इथे प्रत्येक जण लक्ष्मीचा उपासक आहे. असे असताना अश्विन कृष्ण अमावस्येची तिथी लक्ष्मीपूजेसाठी का योजली असावी ते जाणून घेऊ. यंदा १ नोव्हेंबर रोजी लक्ष्मी पूजन (Laxmi Pujan 2024) आहे.

दिवाळी हा हिंदूंचा सण असला, तरी लक्ष्मीपूजनाचे महत्त्व सर्वांनाच असते. प्रत्येकजण आपापल्या परीने भक्तीपूर्वक लक्ष्मीपूजन करतो. व्यापारी मंडळी आजच्या दिवशी पूजेनंतर वर्षभराचा जमा खर्च लिहिण्याची वही पूजेत ठेवतात. त्याला चोपडी पूजन म्हणतात. इतर अमावस्या शुभ कार्यासाठी योग्य मानल्या जात नाहीत, अपवाद असतो लक्ष्मीपूजनाचा! आपल्याही अंधारलेल्या आयुष्यात नवआशेचे, चैतन्याचे दीवे लावावेत व अंधारावर मात करत प्रयत्नपूर्वक लक्ष्मीकृपा प्राप्त करावी, हाच संदेश या सणातून मिळतो. आपल्या संपत्तीत भर पडावी म्हणून आणि असलेल्या संपत्तीचा ऱ्हास होऊ नये म्हणून दिलेल्या वास्तु टिप्स फॉलो करा. 

घर सजवण्यासाठी आपण सुंदर, सुबक, मनोवेधक चित्रांची निवड करतो. भिन्न रंगसंगतींनी घराची शोभा वाढवतो. परंतु घर सजवण्याच्या नादात आपण अनेकदा अशी चित्रे लावतो, ज्या डोळ्यांना छान दिसतात, परंतु वास्तुशास्त्राच्या दृष्टीने त्या घरासाठी बाधक असतात. म्हणून घरात सकारात्मक चित्रांबरोबरच वास्तुशास्त्राला अनुकूल ठरतील, अशा चित्रांची निवड करावी.

वास्तुशास्त्र आपल्या परिचयाचे, अभ्यासाचे नसेलही, परंतु चित्र निवड करताना त्याच्या पडसादाचा सामान्य विचार, तर्क आपल्याला नक्कीच करता येईल. म्हणून युद्धाचे, प्रसंग, वाळवंट, गरिबी, काटेरी झुडपं, जंगली श्वापदे यांची चित्र ठेवू नयेत. तसेच निसर्ग चित्रांचीही तार्किक बाजू लक्षात घेऊन निवड करावी. जसे की झरा, धबधबा, समुद्र, नदी हे देखावे निसर्गात जाऊन पाहणे जितके सुखावह ठरतात, तेवढे घरातल्या चार भिंतींच्या तसबिरीत आकर्षक वाटत नाहीत. त्यातही वास्तुशास्त्राच्या दृष्टीने पाहिले, तर त्याचे वाईट परिणाम लक्षात येतात. 

१.  कारंजे किंवा धबधब्याचे चित्र दिसायला सुंदर असते, परंतु असे मानले जाते की जसे पाणी वाहते तसेच आपले पैसे व्यर्थ कामांमध्ये खर्च होऊ शकतात. पैसा पाण्यासारखा वाहत जातो.

२. जलप्रपात किंवा कारंजेचे चित्र वास्तु शास्त्रज्ञांना विचारल्यानंतरच लावावे. ईशान्येकडील कोन निश्चित करण्यासाठी असे चित्र  बर्‍याचदा वापरले जाते, परंतु अन्य कोठे हे चित्र लावताना सल्ला जरूर घ्यावा. 

3. काही लोक मत्स्यालय ठेवतात किंवा त्या जागी माशाचे चित्र लावतात. परंतु तेही उचित जागेवर नसेल तर त्याचे अपाय आपल्या वास्तूवर पडतात. म्हणून कोणतीही गोष्ट घेताना ती केवळ शोभेची म्हणून वापरू नका, तर त्याचे घरावर, आरोग्यावर काय पडसाद पडतील, याची माहिती करून घ्या आणि मगच लावा. 

टॅग्स :Diwaliदिवाळी 2024Vastu shastraवास्तुशास्त्र