शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

दु:खाचे मूळ जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 04:28 IST

आज जगभरात शेकडो विपश्यना केंद्रे आहेत. तेथे विपश्यना विद्या शिकविली जाते. ही विद्या शिकण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. दान पद्धतीवर विपश्यना केंद्रांची व्यवस्था चालते.

- फरेदुन भुजवालाभगवान गौतम बुद्ध यांनी सांगितले आहे की, जितके भौतिक पदार्थ आहेत, ते कलापांपासून बनलेले आहेत़ कलाप अणूपेक्षाही छोटा भौतिक घटक आहे, ज्याचा स्वभाव आहे उत्पन्न होणे व नष्ट होणे़ कलाप उत्पन्न होताच नष्ट होण्याची क्रिया आरंभ होते़ प्रत्येक कलापात आठ आधारभूत पदार्थ आहेत - पृथ्वी, वायू, जल, अग्नी तसेच वर्ण, गंध, रस आणि ओज़ यांना वेगळे केले जाऊ शकत नाही़ हे सर्व एक साथ उत्पन्न होऊन नष्ट होतात, म्हणजे सतत परिवर्तनशील आहेत़ यांपैकी प्रथम चार मूलभूत गुण आहेत व इतर गौण आहेत़ जेव्हा हे आठ एकत्र येतात, तेव्हाच कलाप बनतो़ दुसऱ्या शब्दात कलाप समूह त्याला म्हणतात, जेव्हा ही आठ आधारभूत तत्त्वं एक साथ मोठ्या संख्येने चिकटलेली असतात़ तेव्हाच ते मनुष्य वा अन्य प्राणी अथवा पदार्थांच्या रूपाने दिसतात़ कलाप क्षणभरासाठी राहतो आणि पापणीची उघडझाप व्हावी तेवढ्या वेळात अब्जो-खर्बो कलाप उत्पन्न आणि नष्ट होतात़ हे कलाप सतत परिवर्तनशील आहेत़ मनुष्याचे शरीर तसे ठोस नाही जसे दिसते, तर हे नाम-रूपाचा समुच्चय आहे़ हे शरीर असंख्य कलापांनी बनलेले आहे, जे सतत परिवर्तनशील आहे़ कलाप प्रत्येक क्षणी नष्ट होतो आणि तयार होतो़ याचे नष्ट होणे आणि बनणे दु:खच तर आहे़ हेच दु:ख सत्य आहे़ जेव्हा आपण अनित्यतेला दु:ख समजू लागतो, तेव्हाच आपण दु:ख सत्याला खºया अर्थाने समजतो, आपण स्वत: अनुभव करतो. विपश्यनाचार्य सत्यनारायण गोएंका यांचे गुरू सयाजी उ बा खिन यांनी प्रवचनात वारंवार याचा उल्लेख केला आहे़ सयाजी उ बा खिन यांच्याकडून विपश्यना विद्येचा सखोल अभ्यास शिकल्यानंतर सत्यनारायण गोएंका यांनी जगभरात याचा प्रचार आणि प्रसार केला. आज जगभरात शेकडो विपश्यना केंद्रे आहेत. तेथे विपश्यना विद्या शिकविली जाते. ही विद्या शिकण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. दान पद्धतीवर विपश्यना केंद्रांची व्यवस्था चालते.