शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

महाकुंभमेळ्याची कधी सांगता होणार? शेवटचे शाही स्नान कधी? जाणून घ्या, शुभ योग अन् मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 11:54 IST

Maha Kumbh Mela 2025: आतापर्यंत सुमारे ४५ कोटींहून अधिक भाविक महाकुंभमेळ्यात सहभागी झाल्याचे सांगितले जात आहे.

Maha Kumbh Mela 2025: कोट्यवधी भाविक ज्याकडे डोळे लावून बसले होते, त्या प्रयागराज महाकुंभाचा १३ जानेवारी रोजी शंखनाद झाला. जगभरातून लक्षावधी भाविकांची पावले या पर्वणीकडे पडताहेत. १४४ वर्षांनी येणाऱ्या या महाकुंभाला हजेरी लावून आध्यात्मिक अनुभूतीची आस सगळ्यांनाच आहे. अनेक सेलिब्रिटी, उद्योजक, दिग्गज मंडळी, कलाकार यांसह देश-विदेशातील भाविकांनी आवर्जून हजेरी लावली. आतापर्यंत जवळपास ४५ कोटींपेक्षा जास्त भाविक, पर्यटक महाकुंभमेळ्यात सहभागी झाल्याचे सांगितले जात आहे. अनेक विश्वविक्रम रचले जात आहेत. महाकुंभमेळा कधीपर्यंत आहे? शेवटचे शाही स्नान कधी आहे? याबाबत जाणून घेऊया...

 महाकुंभमेळा सुरू झाल्यापासून पौष पौर्णिमा,  मकर संक्राती आणि मौनी अमावास्येच्या दिवशी अमृत शाही स्नान झाले. यानंतर वसंत पंचमी, माघ पौर्णिमा या दिवशी शाहीस्नान झाले. या सर्व सोहळ्यांना अद्भूत प्रतिसाद मिळाला. कोट्यवधी भाविक, पर्यटक सहभागी झाले. याशिवाय साधु-संत, महंत, विविध आखाडे यांनीही या पवित्र, पुण्यफलदायी शाही स्नानात सहभाग घेतला. माघ पौर्णिमेनंतर पुढील शाही स्नान महाशिवरात्रीला होणार आहे. पंचांगानुसार, यावर्षी महाशिवरात्री २६ फेब्रुवारी २०२५ रोजी साजरी केली जात आहे. धार्मिक मान्यतेनुसार, भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह या दिवशी झाला होता, म्हणून हा दिवस खूप शुभ मानला जातो. या दिवशी लाखो भाविक शाही स्नान करण्यासाठी संगम येथे पोहोचतील. या शुभ दिवशी देशभरातील शिव मंदिरांमध्ये विशेष प्रार्थना केली जाणार आहे. 

महाकुंभमेळ्याची कधी सांगता होणार? शेवटचे शाही स्नान कधी?

महाशिवरात्रीला शाही स्नान करण्याचा शुभ मुहूर्त पहाटे ०५ वाजून ०९ मिनिटांपासू ते ५ वाजून ५९ मिनिटांपर्यंत आहे. तर प्रदोष काळात शिवपूजेचा शुभ काळ सायंकाळी ६ वाजून १९ मिनिटांपासून ते रात्री ९ वाजून २६ मिनिटांपर्यंत मानला गेला आहे. २६ फेब्रुवारी २०२५ रोजी शाही स्नान झाल्यानंतर महाकुंभमेळ्याची सांगता होणार आहे. माघ कृष्ण चतुर्दशी २७ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ०८ वाजून ५४ मिनिटांनी समाप्त होणार आहे. महाकुंभ केवळ एक धार्मिक सोहळा नाही तर भारतीय संस्कृती आणि परंपरेचे प्रतीक आहे. दर १२ वर्षांनी होणाऱ्या या महान उत्सवात संत, महात्मा, नागा साधू आणि सामान्य लोक संगमावर येतात. पुण्य कमावतात. महाकुंभमेळ्याची सांगता जवळ आली आहे. महाशिवरात्रीला होणारे शाही स्नान हे सर्वांत खास मानले जात आहे. या दिवशी संगमावर भाविकांची मोठा जनसागर येईल आणि महादेवांचे पूजन केले जाणार आहे.

दरम्यान, आयआयटी बाबा, रुद्राक्षांच्या माळा विकणारी मोनालिसा, अभिनेत्री ममता कुलकर्णी हिला प्रदान करण्यात आलेले महामंडलेश्वर पद, मॉडेल असलेली पण दीक्षा घेतल्याचा दावा करणारी हर्षा रिछारिया यांमुळे महाकुंभमेळा चांगलाच गाजला. याशिवाय विविध आखाड्यातील संत-महंत, नागा साधू तसेच आखाड्यांच्या विविध पद्धती, वेषभूषा यांसारख्या अनेक कारणांमुळे २०२५चा महाकुंभमेळा विशेष संस्मरणीय ठरला. 

 

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाspiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिकMahashivratriमहाशिवरात्री