शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

Numerology: तुमची बर्थडेट ‘या’ ३ पैकी आहे? पैसे कमी पडत नाहीत! लक्ष्मी देवी-धनदेवता कुबेराची अपार कृपा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 07:07 IST

Numerology: या मूलांकाच्या व्यक्ती धाडसी, निर्भयी आणि मेहनती असतात. स्वबळावर यश कमावतात, असे सांगितले जाते. तुमचा मूलांक कोणता? जाणून घ्या...

Numerology: सन २०२३ चा फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे. सांस्कृतिक, धार्मिकदृष्ट्या हा महिना विशेष मानला गेला आहे. ज्योतिषशास्त्राला अनन्य साधारण महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्राच्या अनेकविध शाखा आहेत. या माध्यमातून एखाद्या व्यक्तीविषयी अंदाज बांधता येतात. पंचांग, नक्षत्र, ग्रह-तारे यांचे चलन, परिभ्रमण यांच्या अभ्यासातून मानवी जीवनावरील प्रभाव पाहिला जातो. केवळ जन्मकुंडली नाही, तर हस्तरेषा, स्वप्नशास्त्र, समुद्रशास्त्र, अंकशास्त्र यातूनही भविष्यकथन करता येते. यापैकी एक शास्त्र आहे अंकशास्त्र. अंकशास्त्रात जन्मतारखेवर आधारित मूलांकावरून व्यक्तीचा स्वभाव, वैशिष्ट्य, भविष्यकथन केले जाते. जसा प्रत्येक राशीचा स्वामी असतो, तसेच प्रत्येक मूलांकालाही ग्रहांचे स्वामित्व बहाल केलेले आहे.

फेब्रुवारी महिन्यात नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध दोन वेळा राशीबदल करत आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला आणि अखेरीस बुध रास बदलणार आहे. बुध ग्रह उत्तम बुद्धी, तर्कक्षमता कारक असल्याचे सांगितले जाते. अंकशास्त्रानुसार, ज्या व्यक्तींचा जन्म ५, १४ आणि २३ या तारखेला झाला आहे. त्यांचा मूलांक ५ आहे. बुध हा मूलांक ५ चा स्वामी आहे. मूलांक ५ असलेल्या व्यक्तींवर धनदेवता कुबेरांची विशेष कृपा असते. तसेच या मूलांकाच्या व्यक्तींना लक्ष्मी देवाची शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतात, असे म्हटले जाते. यामुळे पैशांची चणचण भासत नाही, आर्थिक स्थिती मजबूत राहू शकते. धनलाभ होऊ शकतात, असे सांगितले जाते. 

संवाद कौशल्य असते खूप चांगले

मूलांक ५ असलेल्या व्यक्ती खूप आकर्षक असतात. बुध वाणीचा कारक मानला गेला आहे. त्यामुळे आपल्या बोलण्याने वाणीमुळे समोरची व्यक्ती या व्यक्तींचा प्रभाव पडतो. मूलांक ५ असलेल्या व्यक्तींची तर्क करण्याची क्षमता आणि संवाद कौशल्य खूप चांगले असते. यांचा जनसंपर्क, मित्र परिवार खूप मोठा असतो. कौटुंबिक जीवनही आनंदी असते, असे म्हटले जाते. 

भाग्यवान, कामे करुन घेण्यात असतात पटाईत

मूलांक ५ असलेल्या व्यक्ती भाग्याच्या धनी मानल्या जातात. ते बुद्धिमान आणि मेहनती असतात. अगदी लहान वयात ते मोठ्या हुद्यावर पोहोचतात. काम करून घेण्यात या व्यक्ती पटाईत असतात. त्यांना जीवनातील सर्व सुख प्राप्त होते. त्यांना पैशाची कधीच कमतरता नसते. ते पहिल्यापासूनच त्यांच्या भविष्याबद्दल विचार करत असतात. यासोबतच नेहमी पुढे जाण्याचा मार्ग शोधत असतात. कामात कोणाची ढवळाढवळ त्यांना आवडत नाही. कारण त्यांना प्रत्येक गोष्ट त्यांच्या पद्धतीने करायला आवडते.

व्यापार, उद्योगात मिळवतात यश आणि प्रगती 

मूलांक ५ असलेले लोक नेहमीच आव्हानांना आव्हाने म्हणून स्वीकारतात आणि कोणत्याही परस्थितीत जिंकण्याचा प्रयत्न करतात. हे लोक नवीन योजनांवर काम करून नफा कमावतात. व्यवसायात जोखीम पत्करायला ते नेहमीच तयार असतात. हे लोक मनी माइंडेड आणि बिझनेस माइंडेड असतात. मूलांक ५ असलेल्या लोकांना व्यापार, उद्योगात चांगले यश मिळते. प्रगती साध्य करू शकतात. बँकिंग, शिक्षण, प्रशिक्षण या क्षेत्रात करिअर करू शकतात. या व्यक्तींना अर्थशास्त्र आणि संगीताचेही चांगले ज्ञान असते, असे सांगितले जाते. 

धाडसी, निर्भयी आणि मेहनती असतात

मूलांक ५ असलेल्या व्यक्तींचा स्वभाव मनमिळाऊ असतो. या मूलांकाचे लोक प्रतिभावान असतात. ते धाडसी, निर्भयी आणि मेहनती असतात. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला ते सामोरे जाण्यास तयार असतात आणि त्यात ते विजयही मिळवतात. ते कधीही हार मानत नाहीत आणि सर्व प्रकारच्या समस्यांना तोंड देण्यासाठी नेहमी तयार असतात, असे मानले जाते. 

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :numerologyसंख्याशास्त्रAstrologyफलज्योतिष