शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

Numerology: ‘या’ ३ तारखांना जन्मलेल्या लोकांवर असते मंगळाची मंगलमय कृपा; शुभ-लाभ, पैसा कमी पडत नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2022 12:36 IST

Numerology: तत्त्वांवर ठाम असलेल्या या व्यक्तींना सासरच्या मंडळींकडून चांगला फायदा होतो, असे सांगितले जाते. जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्र हे असे शास्त्र आहे, ज्याच्या अनेकविध शाखा आहेत. या शाखांच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीविषयी अंदाज बांधता येतात. आपल्याकडे अगदी प्राचीन परंपरा, संस्कृतीमध्ये ज्योतिषशास्त्राला अनन्य साधारण महत्त्व आहे. नक्षत्र, ग्रह-तारे यांचे चलन, परिभ्रमण यांच्या अभ्यासातून मानवी जीवनावरील प्रभाव पाहिला जातो. केवळ जन्मकुंडली नाही, तर हस्तरेषा, स्वप्नशास्त्र, अंकशास्त्र, समुद्रशास्त्र यातूनही भविष्यकथन करता येते. यापैकी एक शास्त्र म्हणजे अंकशास्त्र अंकशास्त्रात जन्मतारखेवर आधारित मूलांकावरून व्यक्तीचा स्वभाव, वैशिष्ट्य, भविष्यकथन केले जाते. जसा प्रत्येक राशीचा स्वामी असतो, तसेच प्रत्येक मूलांकालाही ग्रहांचे स्वामित्व बहाल केलेले आहे. 

ऑक्टोबर महिन्यात काही अत्यंत महत्त्वाचे ग्रह विद्यमान रास बदलून दुसऱ्या राशीत विराजमान होणार आहेत. यापैकी विशेष मानला जाणारा राशीबदल म्हणजे मंगळाचा मिथुन राशीतील प्रवेश. शुक्राचे स्वामित्व असलेल्या वृषभ राशीतून बुधाचे स्वामित्व असलेल्या मिथुन राशीत मंगळ ग्रह प्रवेश करत आहे. मंगळ ग्रह एका राशीत साधारण ४५ दिवस विराजमान असतो, अशी मान्यता आहे. मंगळ धैर्य, पराक्रम, शौर्य, ऊर्जा, नेतृत्व, भावंड यांसह अनेक गोष्टींचा कारक मानला गेला आहे. अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचा जन्म ९, १८ किंवा २७ तारखेला झाला आहे. त्यांचा मूलांक ९ आहे. मंगळ हा मूलांक ९ चा स्वामी आहे. अंकशास्त्रानुसार हे लोक ऊर्जावान असतात. तसेच धैर्यवान आणि निर्भय असतात. प्रत्येक संकटाला ते धैर्याने सामोरे जातात.

पद, पैसा, प्रतिष्ठा कमावतात

मूलांक ९ असलेल्या लोकांच्या आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचे तर ते खूप पैसे खर्च करतात. पण रिअल इस्टेटच्या बाबतीत या व्यक्ती भाग्यवान ठरतात. सासरच्या मंडळींकडूनही त्यांना पैसे मिळतात. हे लोक धोका पत्करून पैसे कमवतात. एकूणच त्यांची आर्थिक स्थिती चांगली असते. मूलांक ९ असलेल्या लोकांना सामान्यतः अभियंता, डॉक्टर, राजकारण, पर्यटन किंवा वीज संबंधित कामात यश मिळते, असे म्हटले जाते.

शिस्तप्रिय आणि तत्त्वांवर ठाम

मूलांक ९ असलेल्या व्यक्ती शिस्तप्रिय आणि तत्त्वांवर ठाम असतात. त्यांचे जीवन काहीसे संघर्षमय असते. पण या लोकांमध्ये सर्व प्रकारच्या समस्यांना तोंड देण्याची ताकद असते. लोक कलात्मक स्वभावाचे असतात. हे लोक शैक्षणिक क्षेत्रात आघाडीवर असतात. त्यांना कला आणि विज्ञानात जास्त रस असतो. या व्यक्तींच्या आयुष्यात चढ-उतार येत असतात. मात्र, ते खंबीरपणे सामोरे जातात. वैवाहिक जीवन संमिश्र स्वरुपाचे असते. सदर माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, तुमच्या मूलांकाविषयी जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जाते. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :numerologyसंख्याशास्त्रAstrologyफलज्योतिष