शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

'मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण'; वाचा मन प्रसन्न ठेवण्याच्या सोप्या ट्रिक्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 13:06 IST

मनशांती शोधायला जाऊ नका. मन शांतच असते. एखाद्या नदीच्या डोहाप्रमाणे. आपणच त्यात खडा टाकून त्यात अस्थिरता निर्माण करतो. ते शांत ठेवण्यासाठी हे चिंतन!

सद्यस्थितीत प्रत्येक व्यक्ती तणावग्रस्त आहे. तणाव त्यांना येतो, जे शरीराला, मनाला थोडीही विश्रांती देत नाहीत. स्वत:ला सतत कामात गुंतवून घेतात. कामात असणे केव्हाही चांगले, परंतु कामाचा अतिरिक्त ताण मनाला त्रासदायक ठरतो. याउलट संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात, 'मन करारे प्रसन्न | सर्व सिद्धीचे कारण' हे कळते पण वळत नाही. मन प्रसन्नतेकडे वळवण्यासाठी वापरून बघा पुढील ट्रिक्स आणि टिप्स!

कोणतेही काम करताना आनंद मिळत असेल, तर त्या कामाचा ताण येत नाही. याउलट ताण घेऊन केलेल्या कामातून कधीच आनंद मिळू शकत नाही. ज्ञान आणि ध्यान, काम आणि आराम हे जीवनरथाचे दोन चक्र आहेत. पैकी एकही चाक निकामी झाले, तर जीवनरथ चालणार नाही. परंतु, हे लक्षात न घेता अलीकडे एका रथावर जीवनरथ ओढण्याचा लोकांचा अट्टहास सुरू आहे. 

चंचल मनाला विषयात गुंतवून ठेवण्याचा आपण प्रयत्न करतो, परंतु अस्थिर मनाला शांत करण्यासाठी प्रयत्न करायला हवा. सगळे काही ठीक आहे, सुरळीत सुरु आहे, हे दाखवण्यासाठी लोक मुखवटे धारण करतात. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच असते. 

एकदा एक मनुष्य अशांत मनावर तोडगा काढण्यासाठी डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी त्याला विविध उपाय सांगितले. संगीत ऐक, पुस्तक वाच, चित्रपट बघ. तो मनुष्य म्हणाला, मी सगळे उपाय करून पाहिले, तरी मन रमेना. त्यावर डॉक्टर म्हणाले, जवळच्या नाट्यगृहात एक छान हास्यविनोदाचा कार्यक्रम सुरू आहे असे ऐकले आहे, तो ऐकून या, अनेक लोकांना त्याचा फायदा झाला असे ऐकले. तुम्हीही जाऊन या, तुम्हाला बरे वाटेल.' यावर तो मनुष्य डॉक्टरांना म्हणाला, `डॉक्टर, तो कार्यक्रम मीच सादर करतो.' तात्पर्य, हसणारे चेहरे आनंदी असतीलच असे नाही. म्हणून मन शांत असणे सर्वात महत्त्वाचे आहे. 

सद्यस्थितीत जगभरात सर्वात जास्त रुग्ण असतील, तर ते मानसकि आजाराचे. या आजारावर ठराविक औषधेही नाहीत. मानसोपचार तज्ज्ञ समजूत काढू शकतील, परंतु, मनाची जडण घडण ही प्रत्येकाला स्वत:लाच करावी लागते आणि ती केलीही पाहिजे. शरीर स्वास्थ्याची आपण काळजी घेतो, तशी मन:स्वास्थ्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

कोणतेही कारण आपले मन अस्थिर करू शकत नाही, जोवर आपण ते मनाला लावून घेत नाही. मात्र, बारीक सारीक गोष्टींचा विचार मन:शांती हिरावून घेऊ शकतो. मन अस्थिर तेव्हाच होते, जेव्हा एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडते. परंतु, दर वेळी आपल्या मनासारख्या गोष्टी घडणार नाहीत, हे आपल्यालाही माहित असते. तरीदेखील आपण अकारण अपेक्षा ठेवतो आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत, की खेद करतो. 

मनशांती शोधायला जाऊ नका. मन शांतच असते. एखाद्या नदीच्या डोहाप्रमाणे. आपणच त्यात खडा टाकून त्यात अस्थिरता निर्माण करतो. ती शांतता अबाधित ठेवण्यासाठी, कोणत्या विषयांना किती महत्त्व द्यायचे, कोणत्या आठवणी किती काळ मनात ठेवायच्या, कोणाचे बोलणे मनाला लावून घ्यायचे या गोष्टींची मनाशी आखणी करायला हवी. तरच, मन कायमस्वरूपी शांत आणि आनंदी राहू शकेल.

यासाठी छान गाणी ऐका, भरपूर माणसे जोडा, पुस्तक वाचा, आवडते चित्रपट बघा, फिरायला जा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या मनाला निक्षून सांगा, 'हे ही दिवस जातील!' आपोआप मनावरचा भार हलका होईल आणि मन प्रसन्न राहील!

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्य