शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

कार्तिकी एकादशी २०२५: १ नोव्हेंबरला एकादशी तिथी प्रारंभ; पण उपास नेमका कधी? वाचा अचूक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 13:21 IST

Kartiki Ekadashi 2025: यंदा १ आणि २ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी विभागून आल्यामुळे भाविकांच्या मनात उपास कधी करावा याबाबत संभ्रम आहे, म्हणून ही माहिती.

Prabodhini Ekadashi 2025 Date:  वर्षभरात २४ एकादशी येतात, पैकी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला विशेष महत्त्व आहे. यंदा १ आणि २ नोव्हेंबर रोजी कार्तिकी तथा प्रबोधिनी एकादशी विभागून आल्यामुळे भाविकांच्या मनात उपास कधी करावा याबाबत संभ्रम आहे. तो दूर व्हावा म्हणून हा लेखनप्रपंच!

या शुभ दिनाचे व्रत (उपवास) कसे करावे, त्याचे महत्त्व काय आहे आणि पारणे (उपवास सोडणे) कधी करावे, याबद्दलची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. त्याआधी हे व्रत नेमके कधी करावे ते जाणून घेऊ. 

दिनदर्शिकेवर पाहिले असता १ नोव्हेंबर रोजी प्रबोधिनी (स्मार्त) एकादशी आहे आणि २ नोव्हेंबर रोजी भागवत एकादशी आहे. त्यामुळे व्रताचरण कधी करावे याबाबत भाविकांच्या मनात गोंधळ निर्माण झाला आहे. त्यासाठी स्मार्त आणि भागवत यातील फरक जाणून घेऊ. 

स्मार्त एकादशी म्हणजे काय?

दशमी संपून एकादशी सुरू होताना त्या तिथीने सूर्योदय पाहिला नाही पण तो दिवस नव्या तिथीच्या नावे सुरू झाला असेल तर त्याला स्मार्त तसेच दर्श असा उल्लेख केला जातो. म्हणजे तिथी सुरू झाली पण तिथीशी संबंधित व्रत सूर्योदय पाहिलेल्या दिवशीच करायचे यासंबंधी ती सूचना असते. म्हणून ती स्मार्त एकादशी! शैव पंथीय स्मार्त तिथी पालन करतात तर वैष्णव भागवत तिथी पालन करतात. 

भागवत एकादशी : 

जी तिथी सूर्योदय पाहते ती तिथी आपल्याकडे ग्राह्य धरली जाते. म्हणजेच एकादशी तिथी आदल्या दिवशी सुरू झालेली असली तरी तिने जर दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय पाहिला असेल तर ती तिथी पाळली जाते आणि दिन दर्शिकेवर देखील सूर्योदय पाहिलेल्या तिथीवर भागवत धर्माचे ध्वजचिन्ह दिसून येते. भागवत धर्म पाळणारे वारकरी बांधव त्यालाच भागवत एकादशी म्हणतात. वैष्णव उदय तिथी मानतात. स्मार्त वाले जिथून तिथी सुरू झाली ती तिथी मानतात आणि व्रत सुरु करतात. हा तो फरक. 

स्मार्त म्हणजे जे लोक वेंदांवर, श्रुती स्मृती, पुराण यांना प्रमाण मानतात, ज्यांना वैदिक धर्माचं ज्ञान आहे, ते स्मार्त एकादशी पाळतात. थोडक्यात ऋषी, मुनी तसेच कर्मकांड करणारे योगी स्मार्त एकादशी करतात. तर वैष्णव म्हणजे जे विष्णू भक्त आहेत, संसारी आहेत, जे सूर्योदय पाहणारी तिथी ग्राह्य धरतात ते भागवत एकादशीचे व्रत करतात. म्हणून विष्णू भक्तांनी स्मार्त एकादशीला विष्णू पूजा करावी मात्र एकादशी व्रताचे पालन भागवत एकादशीला करावे असे शास्त्र सांगते.

त्यानुसार २ नोव्हेंबर रोजी कार्तिकी तथा प्रबोधिनी(Prabodhini Ekadashi 2025 Date) एकादशीचे व्रताचरण केले पाहिजे असे शास्त्र सांगते. याच तारखेपासून तुलसी विवाहास आणि घरोघरी साखरपुडा, लग्न, मुंज यांसारख्या शुभ कार्यास सुरुवात होते. यंदा २ ते ५ नोव्हेंबर अर्थात त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत(Tripuri Purnima 2025) तुलसी विवाह(Tulasi Vivah Date 2025) करता येईल. 

कार्तिकी एकादशी व्रत करण्याची पद्धत : एकादशीचे व्रत करण्याचे नियम दशमी तिथीपासून (एक दिवस आधी) सुरू होतात आणि द्वादशी तिथीला (दुसऱ्या दिवशी) पारण केल्यानंतर पूर्ण होतात.

१. दशमी तिथीचे नियम (एक दिवस आधी) :

सात्विकता: दशमी तिथीच्या संध्याकाळपासूनच तामसिक भोजन (लसूण, कांदा, मांसाहार) वर्जित असते.जेवण: दशमीला सूर्यास्तापूर्वी भोजन करावे. रात्री भोजन करू नये.ब्रह्मचर्य: एकादशीच्या व्रताचे पालन करणाऱ्यांनी दशमी तिथीपासूनच ब्रह्मचर्याचे पालन करावे.

२. एकादशी तिथीचे नियम (व्रत दिनी) : 

सकाळची तयारी: ब्रह्म मुहूर्तावर (सकाळच्या वेळी) उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे.संकल्प: हातात पाणी आणि अक्षता घेऊन 'मी हे व्रत पूर्ण श्रद्धेने करत आहे, ते निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे' असा संकल्प करावा.

पूजा:

  • घरात किंवा मंदिरात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करावी.
  • देवाला पंचामृत (दूध, दही, तूप, मध, साखर) आणि गंगाजलाने स्नान घालावे.
  • देवाला चंदन, हळद, कुंकू, तुळशीची पाने अर्पण करावीत. तुळशीची पाने अर्पण करणे अनिवार्य मानले जाते.
  • 'ॐ नमो भगवते वासुदेवाय' या मंत्राचा जप करावा.
  • कार्तिकी एकादशीची कथा वाचावी किंवा ऐकावी.
  • संध्याकाळी पुन्हा देवाची पूजा करावी आणि तुपाचा दिवा लावावा. तुळशी विवाहाचा कार्यक्रम करावा.

उपवास (आहार नियम):

  • या दिवशी पाणी पिऊन किंवा फलाहार करून उपवास केला जातो.
  • अन्नधान्य (भात, गहू, डाळी) आणि मीठ (साधे मीठ) पूर्णपणे वर्जित असते.
  • उपवासाच्या आहारात साबुदाणा, राजगिरा, शेंगदाणे, बटाटे, रताळे, फळे, दूध, दही आणि शेंदा मीठ (सेंधा नमक) वापरू शकता.
  • दिवसभर भगवत चिंतन करावे.

३. द्वादशी तिथीला पारण (उपवास सोडणे)

  • एकादशीचे व्रत द्वादशी तिथीला 'पारण' केल्यानंतरच पूर्ण मानले जाते.
  • पारण वेळ: पारण नेहमी द्वादशी तिथी संपण्यापूर्वी आणि एकादशी पारण वेळेत (ज्योतिषांनी दिलेल्या वेळेत) करावे लागते.
  • दान: पारण करण्यापूर्वी एखाद्या गरजूंना किंवा ब्राह्मणाला अन्न (धान्य) आणि दक्षिणा दान करावी.
  • पारण भोजन: पारण नेहमी धान्याचे (गहू किंवा तांदूळ) एक कण खाऊन करावे. प्रथम तुलसीचे पान खाऊन नंतर साधे भोजन (भात किंवा पोळी, भाजी) करून उपवास सोडावा. हे व्रत पूर्ण करून द्वादशीला उपवास सोडावा, अन्यथा व्रताचे पुण्य मिळत नाही, असे शास्त्र सांगते. 

या विधीनुसार कार्तिकी एकादशीचे व्रत केल्यास भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपादृष्टी नेहमी तुमच्यावर राहते.

English
हिंदी सारांश
Web Title : Kartiki Ekadashi 2025: Date, significance, fasting rules, and complete details.

Web Summary : Kartiki Ekadashi falls on November 2nd in 2025. Vaishnavas observe it, commencing auspicious events like Tulsi Vivah. Follow fasting rules from Dashami, worship Vishnu, and break the fast on Dwadashi for blessings.
टॅग्स :ekadashiएकादशीPuja Vidhiपूजा विधीTraditional Ritualsपारंपारिक विधीIndian Festivalsभारतीय उत्सव-सण