शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
4
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
5
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
6
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
7
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
8
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
9
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
10
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
11
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
12
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
13
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
14
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
15
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
16
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
17
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
18
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
19
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
20
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास

Kartik Purnima 2022: त्रिपुरी पौर्णिमेची नेमकी तिथी कोणती? त्याच तिथीला होणार तुलसी विवाह व कार्तिक स्नान समाप्ती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 13:49 IST

Tripuri Purnima 2022: आज आणि उद्या पौर्णिमेची तिथी विभागून आल्यामुळे हरी हर उपासनेची संधी दवडू नका, सविस्तर वाचा!

कार्तिक महिन्याला अधिक मसाइतकेच महत्त्व असते. कारण त्याला दामोदर मास असेही म्हणतात. कार्तिक महिना अत्यंत पवित्र महिना मानला जातो. कारण, या महिन्यात अनेक धार्मिक विधी, सण, उत्सव पार पाडले जातात. उत्तम स्वास्थ्य, कौटुंबिक सुख, वैयक्तिक आणि सामाजिक प्रगती, तसेच ईश्वरी कृपा मिळवण्यासाठी कार्तिक महिना अतिशय अनुकूल असतो, असे वर्णन स्कंद पुराण, नारद पुराण आणि पद्म पुराणातही केले आहे. या महिन्यात भगवान श्रीकृष्णाचा विवाह त्याच्या अत्यंत प्रिय असलेल्या तुळशीबरोबर लावून दिला जातो, म्हणून श्रीकृष्णाचा या महिन्यावर आत्यंतिक जिव्हाळा असतो. याच कारणाने, कार्तिक मासाला दामोदर मास असेही म्हणतात. 

कार्तिक पौर्णिमेची तिथी: यंदा ७ आणि ८ नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमेची तिथी विभागून आली आहे. त्यामुळे नेमकी कोणती तिथी गृहीत धरायची याबद्दल  अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. ७ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजून १६ मिनिटांनी पौर्णिमा सुरु होणार असून ८ तारखेला ४ वाजून ३१ मिनिटांनी ही तिथी संपणार आहे. हिंदू पंचांगानुसार जी तिथी सूर्योदय पाहते ती तिथी ग्राह्य धरली जाते. यानुसार ७ तारखेला पौर्णिमा सुरू होणार असली तरीसुद्धा ८ तारखेचा सूर्योदय पाहणार असल्यामुळे कार्तिक पौर्णिमेचा उत्सव ८ तारखेला केला जाईल. 

तुळशी विवाह : घराघरातील विवाह सोहळा सुरू होण्याआधी ज्येष्ठ कन्येच्या विवाहाला प्राधान्य दिले जाते. ही ज्येष्ठ कन्या म्हणजे आपल्या अंगणाची शोभा वाढवणारी तुळशी. श्रीकृष्णाशी तिचा विवाह लावून दिला, की त्या दोहोंच्या आशीर्वादाने घरातील शुभकार्याची सुरुवात होते. कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी तुलसी विवाह करण्याचीप्रथा असली, तरी प्रामुख्याने कार्तिक शुद्ध द्वादशीला तुलसी विवाह करतात. त्रिपुरी पौर्णिमेला तुलसी विवाह मुहूर्त समाप्ती होणार आहे. 

तुलसी विवाहा इतकेच कार्तिक मासात महत्त्व असते, कार्तिक स्नानाला! पुराणानुसार जे फळ सामान्य दिवसात हजारो वेळा गंगा स्नान केल्याने किंवा प्रयाग मध्ये कुंभ स्नानाच्या वेळी गंगेच्या स्नानाचे मिळते, तेच फळ कार्तिक महिन्यात सूर्योदयाच्या पूर्वी कोणत्याही नदीत स्नान केल्यानं मिळते. शास्त्रानुसार कार्तिक महिन्यात स्नानाची सुरुवात शरद पौर्णिमेपासून सुरू होते आणि कार्तिक पौर्णिमेला संपते.  पद्म पुराणानुसार जी व्यक्ती संपूर्ण कार्तिक महिन्यात सूर्योदयापूर्वी उठून नदी किंवा तलावात स्नान करते आणि भगवान विष्णू यांची पूजा करते, भगवान श्री विष्णूची कृपा त्याला मिळते. पद्मपुराणाच्या कथेनुसार कार्तिक स्नान आणि पूजेच्या पुण्याने सत्यभामाला श्रीकृष्ण यांची पत्नी होण्याचे सौभाग्य मिळाले आहेत. 

कार्तिक महिन्यात स्नान आणि दानाचे महत्त्व -हा महिना धार्मिक कार्यांसाठी उत्तम मानला गेला आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जपत केलेला दानधर्म श्रीकृष्णाच्या चरणी पोहोचतो. म्हणून या मासात गरजूंना शक्य तेवढी मदत जरूर करावी.