शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

Kalidas Din 2025: करंगळीच्या बाजूच्या बोटाला 'अनामिका' नाव मिळण्यामागे आहे कालिदासांचा संदर्भ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 15:18 IST

Kalidasa Ring Finger Story: २६ जून रोजी आषाढाचा पहिला दिवस आहे, जो महाकवी कालिदास दिन म्हणून ओळखला जातो; त्यानिमित्ताने ही रोचक माहिती जाणून घ्या!

२६ जून रोजी आषाढ मास सुरू होत आहे. हा दिवस महाकवी कालिदास दिन (Mahakavi Kalidas Din 2025) म्हणून ओळखला जातो. महकवी कालिदास यांचे वाङमय प्रसिद्ध असले, तरीदेखील त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही. मेघदूत हे त्यांचे अतिशय प्रसिद्ध काव्य. त्याच्या सुरुवातीला पहिल्या ओळीत `आषाढस्य प्रथम दिवसे' असे वर्णन केलेले असल्यामुळे हा दिवस महाकवी कालिदास यांना समर्पित करण्यात आला आहे. म्हणून हीच तिथी त्यांची स्मृती तिथी म्हणूनही ओळखली जाते. कालिदास यांच्याबद्दल पुरेशी माहिती उपलब्ध नसूनही त्यांच्या गत आयुष्याबद्दल अनेक रोचक कथा सांगितल्या जातात. जसे की-

एक अशिक्षित, मूर्ख माणूस धनाच्या लोभापायी एका राजकन्येची फसवणूक करून तिच्याशी विवाह करतो. दिसायला सुंदर असल्यामुळे त्याचे अज्ञान त्याच्या रूपाआड लपते. परंतु ते सोंग फार काळ टिकत नाही आणि राजकन्येला त्याचे मूळ रूप कळते. तो गयावया करतो, पण राजकन्या त्याचा पाणउतारा करून त्याला हाकलून देते. पश्चात्ताप होउन तो जीव देण्यासाठी निघून जातो. वाटेत एक कालिमातेचे देऊळ लागते. तिथे गेल्यावर त्याची समाधी लागते आणि सात दिवसानंतर कालिमाता प्रसन्न होऊन त्याला दृष्टांत देते, `तू मरणाचा विचार सोडून दे. शिक्षण घे. कष्ट कर. सर्व कलांमध्ये, शास्त्रांमध्ये पारंगत हो आणि साहित्यनिर्मिती करून राजकन्येशी सुखाचा संसार कर.'

Chaturmas 2025: २६ जून ते ६ जुलै घ्या आषाढ तळणीचा आनंद, नंतर मात्र चातुर्मासाचे पाळा बंधन!

देवीच्या सांगण्यानुसार तो एका गुरुंना शरण जातो, त्यांच्याकडे सेवा करून ज्ञानार्जन करतो आणि बारा वर्षांच्या खडतर ज्ञानतपश्चर्येनंतर शिक्षणात परिपूर्ण होऊन विद्वत्तसभांमध्ये जातो. करता पाहता सासऱ्यांच्या राज्यात येतो, तिथेही विद्वतसभा जिंकतो. सासरे आणि त्याची पत्नी त्याला ओळखत नाहीत. तो स्वत:ची ओळख करून देत क्षमा मागतो. त्याची विद्वत्ता पाहून पत्नीही खुश होते आणि त्यांचा संसार पूर्ण होतो. असा तो विद्वान माणूस कालिमातेचा भक्त म्हणून `कालिदास' नावाने ओळखला जातो.

अनामिकेचा आणि कालिदासांचा संदर्भ : 

आपल्या करंगळीच्या बाजूच्या बोटाला अनामिका नाव पडण्यामागे कवि कालिदास कारणीभूत आहेत असे म्हणतात. कारण, ज्या वेळेस विद्वानांच्या नावांची यादी करायची ठरली, तेव्हा पहिले नाव कालिदासाचे घेतले गेले, त्यानंतर त्यांच्या तोडीस तोड विद्वान कोणता याचा विचार होऊ लागला, पण तेवढी साहित्यिक ऊंची कोणाही साहित्यिकाला गाठता आली नाही, म्हणून ती यादी तिथेच थांबली आणि करंगळीच्या बाजूचे बोट विद्वानाच्या नावासाठी पारखे राहिले, म्हणून ती ठरली अनामिका!

आषाढारंभ:आषाढापासून ४ महिने आध्यात्मिक वातावरण आणि सण, उत्सव, व्रत, वैकल्याची रेलचेल!

महाकवी कालिदास यांचे साहित्य : 

कालिदास हे संस्कृतमधील सर्वश्रेष्ठ कवी. रघुवंश, कुमारसंभव ही महाकाव्ये. शाकुंतल, मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशिय ही नाटके, मेघदूत हे खंडकाव्य आणि ऋतूसंहार हे आणखी एक काव्य. याशिवाय अनेक ग्रंथनिर्मितीत कालिदासाचा हातभार लागला असण्याची शक्यता आहे. हे मूळ साहित्य संस्कृतात असले, तरीदेखील अनेक मराठी साहित्यिकांनी त्याचा मराठीत रसाळ भावानुवाद केलेला आहे. त्यामुळे या साहित्यपर्वणीचा लाभ आपण अवश्य घेतला पाहिजे. 

टॅग्स :Indian Festivalsभारतीय उत्सव-सणliteratureसाहित्यmarathiमराठी