शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
4
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
5
महिलांमध्ये झपाट्याने वाढतेय फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण, प्रदूषण हेच मोठे कारण
6
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
7
"चांगलं बोलता येत नसेल तर तोंड बंद ठेवा", ऐश्वर्याच्या ट्रोलिंगवरुन भडकली रेणुका शहाणे
8
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
9
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
10
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
11
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
12
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता
13
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
14
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
15
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
16
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
17
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
18
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
19
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
20
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव

Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 10:47 IST

Kalbhairav Jayanti 2025: कालभैरव जयंती आपण साजरी करतो, मृत्यूवर मात करण्यासाठी शिवाच्या या रूपाची उपासना करण्यामागे प्रयोजन काय, ते जाणून घेऊ. 

>> योगेश काटे, नांदेड 

यंदा बुधवार, १२ नोव्हेंबर रोजी कालभैरव जयंती(Kalbhairav Jayanti 2025) आहे. हे रूप महादेवाचे, पण या अवतार कार्यामागे कथा काय आहे, हे स्वरूप कसे आहे, दर महिन्यात कालाष्टमी साजरी का केली जाते अशा विविध प्रश्नांची सविस्तर उत्तरे या लेखातून जाणून घेऊ. 

राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!

शिवाचे उग्र व भीषण असे एक रूप. पंचमुखी शिवाच्या दक्षिणेकडील मुखालाही भैरव म्हणतात तसेच भैरव हा शिवाचा एक प्रमुख गण असल्याचेही मानले जाते. पुराणांच्या मते कालिकापुराणाच्या मते पार्वतीच्या शापाने महाकाल हा गण भैरवाच्या रूपाने जन्मला, त्याचा जन्म रात्रीच्या चौथ्या प्रहरी झाल्याचे मानले जाते. कार्तिक वद्य अष्टमीला भैरवजयंती हे काम्यव्रत केले जाते.

गळ्यात नरमुंडमाला हातात नरमुंड अंगावर हत्तीचे कातडे सापाचे दागिने चार, आठ, बारा वा अधिक हातांतून तलवार, बाण, त्रिशूळ, दोरी इ. आयुधे ५ चेहरे इ. रूपांतील भैरव नावाप्रमाणेच उग्र भासतो. दांडगाई करणाऱ्या माणसाला ‘टोळभैरव’ म्हणतात, याचे कारणही भैरवाची उग्रताच होय.  ओरिसातील मूर्ती विश्वपद्मावर उभ्या  तेथील काही मूर्ती तीन डोळे व मिशा असलेल्या. राजस्थानातील प्रत्येक गावात शमी वृक्षाखाली त्याची मूर्ती वा तांदळा असतो. पंजाबात त्याला मृत्यूला भिवविणारा देव मानले जाते. भैरव कुत्र्याबरोबर असतो वा त्याच्यावर स्वार होऊन राहतो,  (कुत्रा हा ज्याचा घोडा म्हणजे वाहन आहे, तो) म्हणतात. तो शैवमंदिरांचा द्वारपाल व शक्तिपीठांचा संरक्षक आहे, भैरवाला वगळून शक्तीची पूजा केली, तर ती निष्फळ मानली जाते.

Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!

शेतकरी पेरणीच्या व कापणीच्या प्रसंगी त्याची पूजा करतात. त्याच्यामुळे भूतबाधा, सर्पदंश वगैरेंचा प्रभाव नष्ट होतो, असे ते  मानतात शैव आगमांनुसार एकूण ६४ भैरवांचे आठ वर्ग असून त्या वर्गांच्या आठ प्रमुखांना ‘अष्टभैरव’ म्हणतात. तंत्रग्रंथांनुसार ६४ भैरव हे ६४ योगिनींचे स्वामी असतात. अष्टभैरवांच्या नावांविषयी बरेच मतभेद आहेत.  शांतिकर्मात व शैव व्रताच्या उद्यापनात अष्टभैरवांना आहुती दिली जाते.

अष्टभैरवांपैकी कालभैरवाला काशीचा कोतवाल म्हटले जाते. त्याला पापभक्षण, आमर्दक, काळराज इ. नावेही आहेत. काशीत जाताना प्रथम त्याचे दर्शन घ्यावयाचे व परतताना त्याच्या नावाचा काळा गंडा बांधावयाचा, अशी प्रथा आहे. उज्जैनजवळील भैरवगढ या कोटात त्याचे भव्य मंदिर आहे. मार्गशीर्ष वद्य अष्टमी ही कालभैरवाष्टमी म्हटली जाते. आश्विन, कार्तिक व भाद्रपद वद्य अष्टमीला कालाष्टमी हे त्याचे व्रत केले जाते. शेंदूर व तूप यांनी संतुष्ट होणारा एक बालभैरवही आहे. नेपाळमधील नेवार लोक वीरभद्राचे रूप असलेल्या पाचलीभैरवाची पूजा करतात. सूर्य व शिव यांचे संयुक्त स्वरूप असलेल्या मार्तंडभैरवाची त्रिमुखी मूर्ती आढळली आहे. शिवाचे बटुकभैरव नावाचे एक तामसरूपही आढळते. दक्षिण भारतातील शैव मंदिरांची रक्षकदेवता असलेल्या क्षेत्रपालाला महाभैरव म्हणतात. राजस्थानात भूतपिशाचांना ताब्यात ठेवणारे काला व गोरा असे दोन भैरव असून माघ महिन्यात त्यांचा लोकोत्सव असतो.

Samudra Shastra: दातात फट असणारे श्रीमंत असतात? दाताच्या ठेवणीवरून वाचा भाकीत!

पुराणांच्या मते भैरवाने जन्मल्याबरोबर सर्व देवांचे दमन केले. म्हणून शिवाने त्याला वृक्ष होण्याचा शाप दिला. तोच दमनक वा तातिरी हा वृक्ष होय. त्याची पूजा केल्याखेरीज देवांच्या पूजेचे फल मिळणार नाही, असा शिवाने उःशाप दिला. ब्रह्मदेवाने शंकराचा अपमान केल्यावर त्याच्या क्रोधाग्नीतून काळ्या रंगाचा भैरव जन्मला, त्याने ब्रह्‌ग्याचे शिवनिंदा करणारे पाचवे मस्तक तोडले. सर्व तीर्थांना जाऊनही भैरवाचे ब्रह्महत्येचे पाप नष्ट झाले नाही. शेवटी काशीत त्याला पापमुक्ती मिळाली व त्याने ब्रह्‌म्याचे मस्तक जेथे ठेवले ते तेथे कपालमोचनतीर्थ बनले.

भीषण गोष्टींना भिवविणारा’ या अर्थाने विष्णू व शंकर यांना भैरवतर्जक म्हटले जाते. कालिकापुराणानुसार वारणासीचा राजा व खांडवनाचा निर्माता विजय हा भैरवाचा वंशज होता. भैरव हे नाव धारण करणारे भैरवपुराण, भैरवतन्य इ. ग्रंथ आढळतात. संगीतातील रागाला भैरव असे नाव आहे.

भैरवी हे भैरव या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप असून दुर्गेचे एक रूप, महाविद्यांपैकी सहावी देवी, शिवाच्या दहा शक्तींपैकी एक, आठ अबांपैकी एक, नित्य प्रलय घडवून आणणारी मृत्युशक्ती, दुर्गेच्या महोत्सवात दुर्गेचे काम करणारी १२ वर्षांची मुलगी, हिंदुस्थानी संगीतातील एक राग इ. अर्थांनी हा शब्द वापरला जातो. काशीला मरण पावलेल्या व्यक्तीला सद्‌गती मिळण्यासाठी भैरव ज्या यातना भोगावयास लावतो, त्यांना भैरवी यातना म्हणतात. भैरव शब्दाचे भैरवा असेही स्त्रीलिंगी रूप असून दुःखाची देवता निर्ऋती व अप्सरांचा एक वर्ग असे त्याचे अर्थ आहेत.

ll श्रीकृष्णार्पणमस्तु ll

English
हिंदी सारांश
Web Title : Kalbhairav Jayanti 2025: Significance, story, and worship of Lord Kalbhairav.

Web Summary : Kalbhairav Jayanti on November 12, 2025, celebrates Lord Shiva's fierce form. This article explores the mythology, symbolism, and worship practices associated with Kalbhairav, including the significance of Kala Ashtami and the reverence for the eight forms of Bhairava. He is protector and destroyer of sins.
टॅग्स :Lord Shivaमहादेवspiritualअध्यात्मिक