महादेवाचे एक रूप म्हणजे कालभैरव. दैत्य विनाशासाठी त्यांनी कार्तिक अष्टमीला कालभैरवाचा अवतार घेतला. म्हणून दर महिन्यात अष्टमीची तिथी महादेवाच्या उपासनेची तिथी अर्थात कालाष्टमी या नावे साजरी केली जाते. मात्र कार्तिक अष्टमीला अर्थात यंदा १२ नोव्हेंबर रोजी कालभैरव जयंती (Kalbhairav Jayanti 2025) आहे. या औचित्याने काल भैरवाची उपासना जाणून घेऊ.
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
भैरव हा शक्तिपीठाचा रक्षक आहे. त्यामुळे सर्वच शक्तिपीठांच्या ठिकाणी भैरवाचे स्थान असते, असे सांगितले जाते. कालाष्टमीच्या दिवशी काळभैरवांचा जन्म झाला होता. त्यामुळे कार्तिक महिन्यातील अष्टमीला काळभैरव अष्टमी असे देखील म्हटले जाते. प्रत्येक महिन्याच्या कृष्णपक्षातील अष्टमी ही काळभैरवला समर्पित आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्यात "कालाष्टमी" असते. पण या सर्वात महत्वाची कार्तिक महिन्याची अष्टमी असून हा दिवस पापी, अत्याचारी व अन्यायी लोकांना शिक्षा देण्याचा दिवस म्हणून मानला जातो, अशी आख्यायिका आहे. मान्यतेनुसार काळा कुत्रा हा काळभैरवचे प्रतीक मानला जातो. या दिवशी काळभैरवाष्टक तसेच महाकाळभैरवाष्टक म्हणावे. व काळभैरवाची स्तुती करावी.
कालभैरवाष्टकम्
देवराज्य सेव्यमान पावनाघ्रिपंकजम्।व्यालयज्ञ सूत्रमिंदू शेखरं कृपाकरम्।नारदादि योगिवृंद वंदितं दिगंबरम्।काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे ।।१।।
भानुकोटिभास्वरं भवाब्दितारकं परं।नीलकण्ठमीप्सिथार्थ दायकं त्रिलोचनम।कालकाल मम्बुजाक्ष मक्षशूलमक्षरं।काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे।।२।।
शूलटंक पाशदण्ड पाणिमादिकारणं।श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयम।भीमविक्रम प्रभुं विचित्र तांडवप्रियं।काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे।।३।।
भुक्तिमुक्ति दायकं प्रशस्तलोकविग्रहं।भक्तवस्तलं स्थितं समस्तलोकविग्रहं।विनिकण्वन्मनोज्ञ् हेम् किंकिणीलस्तकटिं।काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे।।४।।
धर्मसेतू पालकं अधर्ममार्ग् नाशकम्।कर्मपाशमोचकम् सुशर्मदारकम् विभुम्।स्वर्णवर्ण शेष् पाश शोभितांगमण्डलं।काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे।।५।।
रत्नपादुकाप्रभाभिराम पाद युग्मकम्।नित्यमद्वितीयमिष्ट दैवतं निरंजनम्।मृत्युदर्प नाशनं करालदंष्ट्र मोक्षणम्।काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे।।६।।
अट्टहास भिन्नपद्म जाण्ड् कोश संततिं।दृष्टिपात नष्टपाप जालमुग्र शासनं।अष्टसिद्धिदायकं कपालमालिकन्धरं।काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे।।७।।
भूतसंघनायकं विशालकिर्तीदायकं।काशिवास लोकपुण्यपापशोधकं विभुम्।नितिमार्गकोविदम् पुरातनम् जगत्पतिं।काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे।।८।।
कालभैरवाष्टकम् पठन्ति ये मनोहरं।ज्ञानमुक्ति साधनम् विचित्रपुण्यवर्धनम्।शोक मोह दैन्य लोभ कोपतापनाशनम्।ते प्रयान्ति कालभैरवांघ्रिसन्निधिम् धृवम् ।।९।।
इति श्रीमत् शंकराचार्यविरचितं कालभैरवाष्टकम् संपूर्णम्।
Web Summary : Kalbhairav Jayanti on November 12, 2025, celebrates Lord Shiva's fierce form. Observe Kala Ashtami by worshipping Kalbhairav, the protector of Shaktipeethas. Recite Kalbhairavashtakam for blessings, as it destroys sins and grants prosperity. It is believed that black dogs are symbolic of Kalbhairav.
Web Summary : 12 नवंबर, 2025 को कालभैरव जयंती मनाई जाएगी। इस दिन भगवान शिव के उग्र रूप, कालभैरव की पूजा करें। शक्तिपीठों के रक्षक कालभैरव को समर्पित कालाष्टमी पर कालभैरवाष्टक का पाठ करने से पापों का नाश होता है और समृद्धि आती है। मान्यता है कि काला कुत्ता कालभैरव का प्रतीक है।