शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला
3
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
4
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
5
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
6
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
7
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
8
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
9
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
10
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
11
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
12
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
14
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
15
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
16
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
17
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
18
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
19
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
20
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...

Jyeshtha Amavasya 2022: ज्येष्ठ अमावस्या नक्की कधी? २८ की २९जून? गोंधळू नका, या दुर्लभ योगाविषयी सविस्तर वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 11:33 IST

Jyeshtha Amavasya 2022: ज्येष्ठ अमावस्या कधी त्याचबरोबर शिवलोकी नेणारे कोणते व्रत या तिथीला केले जाते, ते जाणून घ्या!

अलीकडच्या काळात पंचांग बघण्याचा आपला सराव मोडलेला आहे. भिंतीवरील नाहीतर मोबाईल ऍपवरील दिनदर्शिका हेच  आपले प्रमाण असते. परंतु जेव्हा एखादी तिथी दोन दिवसात विभागून येते, तेव्हा आपला गोंधळ होतो. तसेच काहीसे झाले आहे ज्येष्ठ अमावस्येच्या बाबतीत. दिनदर्शिकेवर २८ आणि २९ जून ज्येष्ठ अमावस्या दाखवत आहेत, मग नेमकी अमावस्येची तिथी कोणती धरायची? असा तुमचा संभ्रम झाला असेल तर पुढील माहिती वाचा. 

पाश्चात्य संस्कृतीनुसार त्यांचा दिवस रात्री १२ वाजता सुरू होतो तर हिंदू संस्कृतीनुसार तो सूर्योदयापासून सुरू होतो. म्हणून हिंदू पंचांगानुसार जी तिथी ज्या दिवशीचा सूर्योदय पाहते, ती त्या दिवसाची तिथी असते. मात्र अमावस्या-पौर्णिमा या तिथी सूर्याशी नाही तर चंद्राशी संबंधित असल्यामुळे ती चंद्रोदयाच्या वेळेवर अवलंबून असते. मात्र ज्येष्ठ अमावस्येची तिथी पाहिल्यास ती वेळ सूर्योदयाच्या आधी आल्यामुळे ज्येष्ठ अमावस्या २८ जून रोजी पहाटे ५.५१ वाजता सुरू होत असून ती २९ जून रोजी सकाळी ८ वाजून २१ मिनिटांपर्यंत असेल. याचाच अर्थ अमावस्यां तिथी आणि त्यासंबंधित नियम २८ जून रोजी पाळणे बंधनकारक ठरेल.  २८ तारखेला अमावस्या अहोरात्र आहे आणि २९ ला सकाळीदेखील सूर्योदयाची तिथी बघणार आहे, त्यामुळे हा दुर्लभ योग आहे असे म्हणता येईल! 

ज्येष्ठ अमावस्येला शिवलोकाकडे नेणारे एक व्रत केले जाते : 

ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी 'वृषभव्रत' नावाने एक सोहळा पार पाडला जातो, तो म्हणजे बैलपूजेचा. विधी सारखाच असला, तरी उद्दीष्ट वेगळे असते. हे व्रत आणखी एका प्रकारे केले जाते. त्यामध्ये आपल्या सोयीने कुठल्याही महिन्यात शुक्ल सप्तमीला उपवास करून अष्टमीला एका बैलाला दोन शुभ्रवस्त्रांनी वा झुलींनी तसेच गोंडे, मण्यांच्या माळा, फुलमाळा यांनी सजवून त्याची पूजा करून तो दान दिला जातो. भगवान शिवशंकरांना नंदी प्रिय आहे. त्यांचे वाहन बैल आहे. त्यामुळे या पूजेने त्यांना प्रसन्न केले जाते. आपला देश कृषिप्रधान असल्यामुळे बैलांना अतिशय महत्त्व आहे. त्यांच्याबद्दलची कृतज्ञता आपण बैलपोळ्याला त्यांची पूजा करून व्यक्त करतोच. परंतु येथे 'धर्म' मानून बैलांची पूजा करण्याच्या विधीमुळे ही पूजा वेगळी ठरली आहे. आताच्या काळात शहरात बैल दिसणे दुरापास्त आहे. त्यामुळे हा पुजाविधी करणे अवघड ठरते. यावर पर्याय म्हणून लाकडाच्या बैलांची पूजा सांगितली आहे. ही पूजा सामुहिकरित्यादेखील करता येते. त्यानिमित्ताने बैलांचे पालन पोषण करणाऱ्या एखाद्या शेतकऱ्याला दान किंवा आर्थिक मदतही करता येते. कालांतराने विधी-परंपरांचे स्वरूप बदलत असले, तरी धर्म टिकवण्याच्या आणि रुजवण्याच्या दृष्टीकोनातून या तिथींचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.