शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

Janmashtami 2024: आज जन्माष्टमी; जाणून घ्या जन्ममुहूर्त; कृष्णाचा पाळणा आणि पूजाविधी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 08:43 IST

Janmashtami 2024: कृष्णजन्माचा उत्सव शक्यतो मंदिरातच जल्लोषाने करावा, शिवाय घरीदेखील जन्माष्टमी कशी साजरी करता येईल ते जाणून घ्या. 

अंधःकारात प्रकाशाची वाट दाखवणारा, दैत्यांचा कर्दनकाळ ठरणारा, आपल्या बासुरीने सर्वांना मोहून टाकणारा आणि जगाला तत्वाज्ञाचे ज्ञानामृत पाजणारा भगवान श्रीकृष्ण याचा जन्मसोहळा अर्थात जन्माष्टमीचा उत्सव आपण दरवर्षी साजरा करतो. यंदाही २६ ऑगस्ट रोजी हा उत्सव 'गोविंदा रे गोपाळा' या गजरात पार पडणार आहे. 

श्रावण वद्य अष्टमीला पूर्वरात्री भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. रात्री १२ च्या मुहूर्तावर कृष्णाचा जयघोष करून जन्म झाला असे कथा कीर्तनातून घोषित केले जाते. फटाके फोडून, वाद्य वादन, टाळ-नामाचा गजर करून कृष्णजन्म (Janmashtami 2024) झाल्याची वर्दी दिली जाते. या वर्षी हा उत्सव २६ ऑगस्ट २०२४, रोजी सोमवारी रात्री साजरा केला जाईल. 

कृष्णाने संघटन शक्तीवर भर दिला होता. त्यामुळे हा उत्सव शक्यतो एकत्र येऊन साजरा करावा. अगदीच शक्य नसेल तर पुढे दिल्यानुसार घरच्या घरी विधिवत पूजा करावी. त्यासाठी जन्म मुहूर्ताचा काळ, पूजा विधी आणि पाळणा याबद्दल माहिती घेऊ. 

देवघरातल्या बाळकृष्णाला छोटासा पाळणा करून त्यात बाळकृष्णाला जन्माच्या मुहूर्तावर पाळण्यात जोजवले जाते. नवीन वस्त्र परिधान केली जातात. हार घातला जातो. लोणी किंवा दही साखरेची वाटी देवासमोर ठेवली जाते. गुलाल, फुलं उधळून कृष्णाचा जयघोष केला जातो. केळं, पेढे, पंजिरीचा नैवेद्य दाखवला जातो. अनेक भाविक या दिवशी उपास करतात व दुसऱ्या दिवशी गोपाळकाल्याचा प्रसाद ग्रहण करून उपास सोडतात. 

कृष्णजन्माचा मुहूर्त : 

१८ ऑगस्टच्या रात्री १२ वाजता कृष्ण जन्माचा उत्सव साजरा केला जाईल. यात पूजेचा कालावधी ४५ मिनिटांचा असेल. साधारण ११.३० ते १२.१५ पर्यंत सर्व पूजा विधी करावेत असे सांगितले जाते. 

कृष्ण जन्माचा पाळणा : 

बाळा जो जो रे कुळभूषणा । श्रीनंदनंदना ।निद्रा करि बाळा मनमोहना । परमानंदा कृष्णा ॥धृ॥

जन्मुनि मथुरेत यदुकुळी । आलासी वनमाळी ।पाळणा लांबविला गोकुळी । धन्य केले गौळी ॥१॥

बंदिशाळेत अवतरुनी । द्वारे मोकलुनी ।जनकशृंखला तोडुनी । यमुना दुभंगोनी ॥२॥

मार्गी नेतांना श्रीकृष्णा । मेघनिवारणा ।शेष धावला तत्क्षणा । उंचावूणी फणा ॥३॥

रत्‍नजडित पालख । झळके आमोलिक ।वरती पहुडले कुलतिलक । वैकुंठनायक ॥४॥

हालवी यशोदा सुंदरी । धरुनी ज्ञानदोरी ।पुष्पे वर्षिली सुरवरी । गर्जति जयजयकारी ॥५॥

विश्‍वव्यापका यदुराया । निद्रा करी बा सखया ।तुजवरि कुरवंडी करुनिया । सांडिन मी निज काया ॥६॥

गर्ग येऊनी सत्वर । सांगे जन्मांतर ।कृष्ण परब्रह्म साचार । आठवा अवतार ॥७॥

विश्‍वव्यापी हा बालक । दृष्ट दैत्यांतक ।प्रेमळ भक्तांचा पालक । श्रीलक्ष्मीनायक ॥८॥

विष पाजाया पूतना । येता घेईल प्राणा ।शकटासुरासी उताणा । पाडिल लाथे जाणा ॥९॥

उखळाला बांधता मातेने । रांगता श्रीकृष्ण ।यमलार्जुनांचे उद्धरण । दावानव प्राशन ॥१०॥

गोधन राखिता अवलिळा । कालिया मर्दीला ।दावानल वन्ही प्राशील । दैत्यध्वंस करी ॥११॥

इंद्र कोपता धांवून । उपटील गोवर्धन ।गाईगोपाळा रक्षून । करीन भोजन ॥१२॥

कालींदीतीरी जगदीश । व्रजवनितांशी रास ।खेळुनि मारील कंसास । मुष्टिक चाणुरास ॥१३॥

ऎशी चरित्रे अपार । दावील भूमीवर ।पांडव रक्षील सत्वर । ब्रह्मानंदी स्थिर ॥१४॥

टॅग्स :Janmashtamiजन्माष्टमीPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३Shravan Specialश्रावण स्पेशलchaturmasचातुर्मास