शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

Janmashtami 2022: श्रीकृष्ण जयंती कधी आहे? जाणून घ्या, गोकुळाष्टमी व्रताचरणाची सोपी पद्धत, महत्त्व आणि मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 08:36 IST

Janmashtami 2022: श्रीकृष्ण जयंती जन्माष्टमी, गोकुळाष्टमी आदी विविध नावांनी देशाच्या विविध भागात अनेकविध पद्धतीने साजरी केली जाते.

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥ परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥... श्रावण महिन्यातील पौर्णिमेनंतर सर्वांना वेध लागतात, ते गोकुळाष्टमीचे. श्रावण वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला. श्रीकृष्ण हा श्रीविष्णूंचा आठवा अवतार मानला जातो. बाललीला, नीती, मुसद्देगिरी, राजकारण, भगवद्गीता, मित्रत्व, प्रेम, त्याग अशा अनेक गोष्टींसाठी श्रीकृष्णांचे नेहमीच स्मरण केले जाते. महाभारतकालीन अनेक गोष्टी, संदर्भ, व्यक्ती, प्रसंग, घटनांवर आजच्या काळातही संशोधन केले जात आहे. श्रीकृष्णांचे आचार, विचार, तत्त्वज्ञान हा नेहमीच संशोधनाचा विषय राहिलेला आहे. सन २०२२ मधील श्रीकृष्ण जयंती म्हणजेच जन्माष्टमी वा गोकुळाष्टमी कधी आहे? या दिवशी व्रताचरण कसे करावे? जाणून घ्या... (Krishna Janmashtami 2022)

श्रीकृष्णांचा जन्माष्टमी उत्सव भारतभर साजरा केला जातो. श्रावण वद्य अष्टमी यंदा गुरुवार, १८ ऑगस्ट २०२२ रोजी साजरी केली जाणार आहे. श्रीकृष्ण जयंती जन्माष्टमी, गोकुळाष्टमी आदी विविध नावांनी देशाच्या विविध भागात अनेकविध पद्धतीने साजरी केली जाते. (Krishna Janmashtami Dates 2022)

श्रावण वद्य अष्टमी प्रारंभ: गुरुवार, १८ ऑगस्ट २०२२ रोजी रात्रौ ०९ वाजून २० मिनिटे.

श्रावण वद्य अष्टमी समाप्ती: शुक्रवार, १९ ऑगस्ट २०२२ रोजी रात्रौ १० वाजून ५८ मिनिटे.

श्रीकृष्ण जन्मोत्सव: १८ ऑगस्ट २०२२ रोजी रात्रौ १२ वाजता.

‘असे’ करा गोकुळाष्टमीचे व्रत

जन्माष्टमीचे व्रत हे अष्टमीच्या दिवशी एकभुक्त राहून करावे. मध्यरात्री शुचिर्भूत होऊन संकल्प करावा. यानंतर बाळकृष्णाची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करावी. यानंतर सपरिवार श्रीकृष्णाची षोडशोपचार पूजा करावी. धूप, दीप, नैवेद्य दाखवावा. श्रीकृष्णाची आरती करावी. पूजा करून पुरुषसूक्त, विष्णूसूक्ताचे स्तवन करावे. वाद्यांचा घोष, गीतांचे मंगल स्वर, पुराण, इतिहासातील निरनिराळ्या सत्कथा ऐकत रात्री जागरण करावे. गोकुळातील कृष्णजन्माच्या लीला श्रवण करावे. यावेळी पूजन करताना बाळकृष्णाला लोणी आणि साखर एकत्र करून त्याचा नैवेद्य दाखवावा. (Shri Krishna Jayanti Vrat Puja Vidhi)

व्रताची सांगता कशी करावी? 

जन्माष्टमीच्या व्रताची दुसऱ्या दिवशी सांगता करावी. या दिवशी पंचोपचार करून उत्तरपूजा करावी. बाळकृष्णाला महानैवेद्य अर्पण करावा. याच दिवशी काला करावा. पोहे, ज्वारीच्या लाह्या, धानाच्या लाह्या, लिंबू व आंब्याचे लोणचे, दही, ताक, चण्याची भिजविलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी आदी घालून केलेला एक खाद्यपदार्थ म्हणजे काला. हा कृष्णाला फार प्रिय होता. श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असत व वाटून खात असत, असे मानले जाते. देशभरात प्रांताप्रमाणे व्रचारणाची पद्धत वेगवेगळी असू शकते. आपापल्या पद्धतींनुसार व्रताचरण करावे, असे सांगितले जाते.

​देशभरातील जन्माष्टमी उत्सव

श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा केला जातो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, जगन्नाथ पुरी या ठिकाणी गोकुळाष्टमी विशेष साजरी केली जाते. ओरिसामध्ये दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा साजरी केली जाते. गुजराथमध्ये 'सातम' म्हणजे सप्तमीच्या दिवशी विविध पद्धतीचे खेळ खेळले जातात आणि रात्री बारा वाजता कृष्णजन्माचा उत्सव साजरा करतात. मध्य प्रदेशात आणि उत्तर भारताच्या बऱ्याचशा भागात पौर्णिमान्त महिना असलेले पंचांग वापरात असल्याने या दिवशी तेथे भाद्रपद कृष्ण अष्टमी येते. या दिवशी अनेकांच्या घरी गोकुळ, वृंदावनाचा देखावा तयार करून जन्मोत्सव साजरा करतात. वृंदावनात दोलोत्सव असतो. या दिवशी रासलीलांचे सादरीकरण केले जाते. 

टॅग्स :Janmashtamiजन्माष्टमीReligious programmeधार्मिक कार्यक्रम