शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Janmashtami 2021 : कृष्णभक्त हरिवंशपुराण का वाचतात? त्यात नेमके काय आहे आणि त्यामुळे काय फळ मिळते; वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 14:16 IST

Janmashtami 2021 : गोपालकृष्णाशी समरस व्हायचे असेल, तर हरिवंशपुराण एकदा तरी मन लावून नक्की वाचा. 

ज्यांना कृष्णकथेच्या अनुशंगाने भगवान गोपाल कृष्णाला आणि त्याचा आठव्या अवतारामागील प्रयोजनाला समजून घ्यायचे असेल, त्याने हरिवंशपुराण वाचावे असे सांगितले जाते. ते वाचल्यामुळे काय फळ मिळते आणि काय शिकायला मिळते, ते जाणून घेऊ.

हरिवंश पुराणात भगवान गोपालकृष्णाच्या अनेकविध लीलांचे वर्णन असून यातील अनेक लीला कथा भागवत, नारदपुराण, पद्मपुराण इत्यादीमध्ये थोड्याफार फरकाने आल्या आहेत. भगवान विष्णूंनी पृथ्वीचा भूभार हलका करण्यासाठी यादवकुळात वसुदेव देवकीच्या पोटी श्रीकृष्णरूपाने अवतार घेतला इथपासून या ग्रंथाचा प्रारंभ होतो. 

Janmashtami 2021 : श्रावण वद्य अष्टमीला कृष्णजन्म सोहळा का आणि कसा साजरा करतात याची सविस्तर माहिती

यानंतर श्रीकृष्णाच्या गोकुळातील बालपणीच्या खोड्या, पूतना, तृणावर्त, धेनुकासुर, प्रलंब, अरिष्टासुर इत्या दैत्यांचा केलेला वध, गोकुळातील त्याची गोरस चोरी, यशोदेला घडवलेले विश्वदर्शन, इंद्रगर्वहरण, गोवर्धनोद्धार, कंस वध, जरासंधाशी युद्ध, कालयवनाचा वध इ. अनेक अद्भूतकथा आल्या आहेत. 

कृष्ण मोठा झाल्यावर द्वारकानिर्मिती, रुक्मिणीहरण, स्यमंतकमणिप्रकरण, त्याचे अनेक विवाह, सोळासहस्त्र गोपींची सुटका व त्यांच्याशी कृष्णाचा विवाह, कृष्णाच्या अष्टनायिका, त्याने केलेली युद्धे, शेवटी यादव कुळाचा संहार, उद्धवास उपदेश व शेवटी प्रभासक्षेत्री स्वात्म विसर्जन, अवतार समाप्ती इ. कथा आल्या आहेत. 

ग्रंथाच्या शेवटी हरिवंश पुराणाचे महात्म्य व फलश्रुती सांगितली असून या पुराणाचे पारायण कसे करावे, किती टप्प्यात करावे याचीही माहिती दिलेली आहे. हे हरिवंशपुराण ब्रह्मा-विष्णु-महेश स्वरूप असून याच्या श्रवण पठणाने सर्व पातकांचा नाश होतो व मनुष्याच्या सर्व पवित्र इच्छा पूर्ण होतात. सर्व संकटांचा परिहार होतो. सर्वांचे इह पर कल्याण होते व शेवटी मोक्षप्राप्ती होते असे फलश्रुतीत म्हटले आहे. 

श्रीकृष्ण हा आपला आयुष्यभराचा सोबती आहे. आकाशातला चंद्र जसा आपण चालताना आपल्याबरोबर चालतो असे वाटते, तसा गोपालकृष्ण सदैव आपल्या बरोबर चालत असतो. मग त्याचा विस्तृत परिचय नको का करून घ्यायला? गोपालकृष्णाशी समरस व्हायचे असेल, तर हरिवंशपुराण एकदा तरी मन लावून नक्की वाचा. त्याची अनेक भाषांमध्ये भाषांतरे उपलब्ध आहेत आणि इंटरनेटवर ती पीडीएफ स्वरूपातही सहज मिळू शकतील. कृष्ण जन्माच्या निमित्ताने आपणही मनाशी चंग बांधला, तर हरिवंशपुराण आपले सहज वाचून होईल!

Janmashtami 2021 : गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात का धुवू नयेत? या प्रथेमागची कथा!

टॅग्स :Janmashtamiजन्माष्टमीShravan Specialश्रावण स्पेशल