शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

Jagannath Yatra 2025 : जगन्नाथाच्या गाभाऱ्यात समुद्राची गाज अडवण्यास हनुमंत ठरले कारणीभूत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 13:34 IST

Jagannath Yatra 2025 : आजपासून सुरू होणार्‍या जगन्नाथ रथ यात्रेच्या उत्सवानिमित्त मंदिराशी संबंधित ही अनोखी कथा जाणून घ्या!

आजपासून अर्थात आषाढ शुद्ध द्वितीयेपासून जगन्नाथ रथयात्रेला(Jagannath Rath Yatra 2025) सुरुवात झाली, त्यानिमित्त भगवान जगन्नाथ, भाऊ बलराम आणि बहीण सुभद्रा यांच्यासह लाखो भाविकांच्या उपस्थितीत रथावर आरुढ होऊन यात्रेत सहभागी होतील आणि नंतर विश्रांतीसाठी परत आपल्या गर्भगृहात येतील. मंदिराच्या बाजूला असलेला अथांग सागर आणि त्याची गाज जगन्नाथापर्यंत पोहोचून त्यांची झोपमोड होऊ नये म्हणून हनुमंताने काय क्लुप्ती लढवली ते पाहू. 

श्री जगन्नाथ मंदिराच्या वर स्थापित लाल ध्वज नेहमी नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकत असतो. याचे वैज्ञानिक कारण अद्याप कळले नसले, तरी त्यामागे पौराणिक कथा नक्कीच आहे. एवढा भव्य दिव्य ध्वज कोणाचेही लक्ष वेधून घेतो आणि विशेषतः प्रवाहाविरुद्ध असलेली त्याची गती सर्वांसाठी औत्सुक्याचे कारण ठरते. हे असे का घडत असावे, हे जाणून घेण्यासाठी आपल्याला पौरणिक कथा माहीत असणे गरजेचे आहे. ती कथा कोणती? चला पाहूया...

ही आख्यायिका हनुमंताशी संबंधित आहे. हनुमंत दहा दिशांचे रक्षण करतात. तिथल्या पावन भूमीशी संबधित अनेक हनुमंत कथा सांगितल्या जातात. त्यातील एक म्हणजे समुद्राजवळील मंदिराच्या आत समुद्राचा आवाज थांबवणे. हा आवाज थांबविण्यासाठी झेंड्याची दिशा बदलली गेली, अशी या कथेची परस्पर जोड आहे. 

जगन्नाथाच्या मूर्तीला डोळे, नाक आणि ओठ एवढेच अवयव का? त्यामागे आहे रहस्यमय कथा!

एकदा भगवान जगन्नाथांच्या दर्शनासाठी महर्षी नारद पोहोचले. तिथे त्यांना हनुमंत भेटले.  ते म्हणाले की आता भगवान विश्रांती घेत आहेत, तुम्हाला थांबावे लागेल. नारद दाराबाहेर जाऊन थांबले. थोड्या वेळाने, जेव्हा त्यांनी मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे पाहिले तेव्हा भगवान जगन्नाथ श्री लक्ष्मीसमवेत दुःखी बसले होते. त्यांनी परमेश्वराला दुःखाचे कारण विचारले तेव्हा जगन्नाथ म्हणाले, की समुद्राचा आवाज कुठे आराम करू देतो?

नारद बाहेर गेले आणि त्यांनी हनुमंताला भगवंताचे हे दुःख सांगितले. हनुमंत त्या आवाजाचा बंदोबस्त करण्यासाठी समुद्राला म्हणाले की, तू इथून निघून जा नाहीतर तू तुझा आवाज थांबव. तुझ्या आवाजामुळे माझे स्वामी विश्रांती घेऊ शकत नाही. हे ऐकून समुद्र देव प्रकट झाले आणि म्हणाले,' हे महावीर हनुमंता ! हा आवाज थांबविणे माझ्या आवाक्यात नाही. हा आवाज वा वाऱ्याच्या वेगामुळे येत आहे. वाऱ्याचा वेग जितका गतीने पुढे जाईल तितक्या वेगाने आवाजनिर्मिती होईल. वाऱ्याचा वेग वळवणे हे माझ्यापेक्षा तुमच्या हातात आहे. कारण मरुत अर्थात वारा हे तुमचे पिताश्री. तुम्ही त्यांना विनवणी करा . 

मग हनुमंतांनी त्यांचे वडील पवनदेव यांना बोलावले आणि सांगितले की तुम्ही मंदिराच्या दिशेने जाऊ नका. यावर पवन देव म्हणाले की मला हे शक्य नाही परंतु मंदिराच्या आवारात तू अशी वर्तुळनिर्मिती कर, जी वायुरहित असेल.'हे कळल्यावर हनुमंताने स्वतःच्या शरीराचे दोन भाग केले आणि ते वायुपेक्षा अधिक गतीने जगन्नाथ मंदिराच्या सभोवताली वर्तुळाकार फिरले. त्या मंडलामुळे वाऱ्याचा आवाज आत शिरू शकला नाही आणि जगन्नाथ स्वामी आराम करू शकले. 

म्हणून आजतागायत समुद्राद्वारे (मंदिराच्या आतून) कोणताही आवाज मंदिराच्या सिंहद्वारात पहिल्या पायरीवर प्रवेश केल्यावर ऐकू शकत नाही. आपण (मंदिराच्या बाहेरून) एक पायरी ओलांडली तर आपण ते ऐकू शकता. हे संध्याकाळी स्पष्टपणे अनुभवता येते. त्याचप्रमाणे, मंदिराच्या बाहेर स्वर्गीय दरवाजा आहे, जिथे मोक्ष मिळविण्यासाठी मृतदेह जाळले जातात, परंतु जेव्हा आपण मंदिरातून बाहेर पडतो, तेव्हाच तुम्हाला मृतदेह जाळल्याचा वास येईल, गाभर्‍यात नाही! आहे ना विलक्षण?

Gupta Navaratri 2025 : कामाख्या मंदिरात होत आहे तांत्रिकांची गर्दी कारण सुरु झाली आहे आषाढ गुप्त नवरात्र!

याच कारणामुळे मंदिर परिसरातील वाऱ्याची दिशा विरुद्ध असल्याने मंदिराच्या कळसावरील ध्वज विरुद्ध दिशेने फडकत राहतो. ते आश्चर्य पाहण्यासाठी अनेक भाविक जगन्नाथाच्या यात्रेत गर्दी करतात. 

टॅग्स :Jagannath Rath Yatraजगन्नाथ यात्राTempleमंदिरIndian Festivalsभारतीय उत्सव-सण