शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

International Yoga Day 2022: 'योगा से होगा' म्हणत रामदेव बाबांनी योगसाधनेला दिलं 'ग्लॅमर'; मोदींनी नेलं जागतिक स्तरावर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 12:00 IST

International Yoga Day 2022: भारतीय योगसाधनेचा योग पुनश्च भारतात रुजवण्याचे श्रेय या द्वयींना दिले पाहिजे!

वर्ष होते २००३. आस्था चॅनेल नुकतेच सुरू झाले होते. त्यावर योगगुरु रामदेव बाबा यांनी योगाभ्यास टीव्हीवर आणला. त्यांच्यासमोर पटांगणात बसलेले हजारो आणि घरोघरी त्यांना पाहणारे लाखो प्रेक्षक रामदेव बाबांचे अनुकरण करू लागले. तेव्हापासून देशभरातच नाही तर जगभरात योग चळवळ नव्याने सुरू झाली.  ही पार्श्वभूमी तयार असताना २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ जून 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून घोषित केला योगसाधनेची प्रतिष्ठा अधिकच वाढली व पारंपरिक योगसाधनेला ग्लॅमरही मिळाले! (International Yog Day 2022)

योगसाधना ही भारतीय ऋषीमुनींनी जगाला आरोग्य संजीवनी आहे. रामदेव बाबांच्या आधी योगसाधनेचा जगभरात प्रसार झाला नव्हता असे नाही. परंतु आस्था चॅनेलने आणि रामदेव बाबांनी ज्या पद्धतीने योगसाधनेचे महत्त्व लोकांच्या मनात बिंबवले ते परदेशातील लोक योगाभ्यासाचे प्रशिक्षण घेऊ लागले आणि त्यांच्यामुळे आपल्या देशातही योगसाधनेचे महत्त्व सर्वसामान्य लोकांना पटू लागले. 

रामदेव बाबांच्या आधी योग शिक्षक धीरेंद्र ब्रह्मचारी यांनी दूरदर्शन वाहिनीवरून योगाभ्यासाचा प्रसार केला होता. शाळा महाविद्यालयातून योगाभ्यासाचे धडे, हिंदी-इंग्रजीतून पुस्तकांचे लिखाण करत त्यांनी योग विषयात आपले योगदान दिले. बीकेएस अयंगर यांनी  'अयंगर योग' नावे गुरुकुल सुरु केले. २००४ मध्ये टाईम मासिकाने त्यांना जगातील पहिल्या १०० प्रभावी लोकांपैकी एक म्हणून घोषित केले होते. कृष्णा पट्टाभी जोइस यांनी अष्टांग विन्यास योग शैली विकसित केली. तिरुमलाई कृष्णामचार्य यांना 'आधुनिक योगाचे जनक' म्हटले जाते. हठयोग आणि विन्यासला पुनरुज्जीवित करण्याचे सर्व श्रेय त्यांना जाते. परमहंस योगानंद यांनी पाश्चिमात्य लोकांना योग आणि ध्यानधारणा शिकवली. ''शिवानंद योग वेदांत स्वामी शिवानंद सरस्वती यांनी आपले संपूर्ण जीवन योग साधनेला समर्पित केले. महर्षि महेश योगी यांच्या हाताखाली अनेक सेलिब्रेटींनी योगसाधनेचे प्रशिक्षण घेतले. या सर्वांमध्ये रामदेव बाबांनीही (Ramdev Baba Yoga) आपले योगदान दिले.

या योगचळवळीचा परिणाम असा झाला की गल्लोगल्ली योगवर्गाचे पेव फुटू लागले. अनेकांच्या नशिबात या जोरावर श्रीमंत होण्याचाही योग जुळून आला. विश्व विद्यालयातून योग विषयात पदवी, पदव्युत्तर प्रशिक्षण घ्यावे, सर्टिफिकेट कोर्स करावा असे अनेकांना वाटू लागले. जिमकडे जाणारी पावले योगा मॅटकडे वळली. रामदेव बाबांसारखे आपलेही पोट सपाट व्हावे असे अनेकांना वाटू लागले. मुख्य म्हणजे यात सातत्य राहिले, याचे श्रेय रामदेव बाबा आणि पंतप्रधान मोदींना द्यायला हवे, नाही का? 

टॅग्स :International Yoga Dayआंतरराष्ट्रीय योग दिनNarendra Modiनरेंद्र मोदीBaba Ramdevरामदेव बाबाYogaयोगासने प्रकार व फायदे